ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, 15,000 रुपये बोनस जाहीर, लवकरच वितरण

ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना पालिकेने मोठी भेट दिली आहे. सन 2020 -2021 या आर्थिक वर्षासाठी दिवाळी सणानिमित्त रुपये 15 हजार 500 इतके सानुग्रह अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी आज केली.

ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, 15,000 रुपये बोनस जाहीर, लवकरच वितरण
Follow us
| Updated on: Oct 25, 2021 | 7:28 PM

ठाणे : ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना पालिकेने मोठी भेट दिली आहे. सन 2020 -2021 या आर्थिक वर्षासाठी दिवाळी सणानिमित्त रुपये 15 हजार 500 इतके सानुग्रह अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी आज केली.

बैठकीत महत्त्वाचा निर्णय

या संदर्भात राज्याचे नगर विकास मंत्री तथा ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॅा. जितेंद्र आव्हाड यांच्याशी चर्चा करण्यात आली होती. त्यानंतर आज महापौर नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

बैठकीस उपमहापौर सौ. पल्लवी पवन कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर, सभागृह नेते अशोक वैती, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते नजीब मुल्ला, शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के, भाजपा गटनेते मनोहर डुंबरे, गलिच्छ वस्ती निर्मूलन समिती अध्यक्षा साधना जोशी, जेष्ठ नगरसेवक राम रेपाळे, मिलिंद पाटणकर, अँड. विक्रांत चव्हाण, नारायण पवार, हणमंत जगदाळे, रमाकांत मढवी, नरेश मणेरा विकास रेपाळे, सिद्धार्थ ओवळेकर, कृष्णा पाटील, तसेच शासकीय अधिकारी उपस्थित होते.

15,500 रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय

या बैठकीमध्ये महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना यावर्षी 15,500 इतके सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे महापालिका आस्थापनेवरील कायम अधिकारी कर्मचारी 6,885 एकत्रित मानधनावरील कर्मचारी 314, शिक्षण विभागाकडील एकूण कर्मचारी 973 आणि परिवहन सेवेमधील 1897 कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे.

एकूण 16 कोटी इतका खर्च होणार

या निर्णयामुळे ठाणे महापालिकेस सानुग्रह अनुदानापोटी एकूण 16 कोटी इतका खर्च होणार आहे. सदर सानुग्रह अनुदान दिवाळीपूर्वी सर्व कर्मचाऱ्यांना  देण्यात येणार असल्याचे महापालिका आुयक्त डॅा. विपिन शर्मा यांनी सांगितले.

इतर बातम्या :

नागपुरातील प्रसिद्ध नगरसेवकाच्या घरी धाडसी चोरी, घरातील नोकर झोपले असताना चोरट्यांनी 32 लाखांचे दागिने लांबवले

‘समीर वानखेडे प्रकरणावर मुख्यमंत्र्यांसोबत जुजबी चर्चा, तक्रार दाखल झाल्यावर कारवाई करु’, गृहमंत्र्यांकडून स्पष्ट

‘शेतकर्‍यांना फुटकी कवडी नाही आणि नेत्यांच्या घरात पॅकेज जातं’, बिलोलीतून फडणवीसांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

(Municipal Corporation announced 1500 bonus to employees on diwali festival)

99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.