ठाण्यात राष्ट्रवादीला खिंडार?, जितेंद्र आव्हाड यांचा अत्यंत विश्वासू नेता शिंदे गटाच्या वाटेवर?; ‘त्या’ बॅनर्समुळे खळबळ

नजीब मुल्ला हे राष्ट्रवादीतून शिंदे गटात आल्यास राष्ट्रवादीला मोठं नुकसान होणार आहे. नजीब मुल्ला शिंदे गटात आल्यास मुंब्र्यातील राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला खिंडार पाडण्यास शिंदे गटाला यश मिळणार आहे.

ठाण्यात राष्ट्रवादीला खिंडार?, जितेंद्र आव्हाड यांचा अत्यंत विश्वासू नेता शिंदे गटाच्या वाटेवर?; 'त्या' बॅनर्समुळे खळबळ
najeeb mullaImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 20, 2023 | 8:38 AM

निखिल चव्हाण, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, ठाणे: ठाणे महापालिका निवडणुकीच्या ऐन तोंडावर ठाण्यातील राजकारणाला वेगळी कलाटणी मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ठाण्यातील आपला गट मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधी पक्षातील अनेक नेते आणि कार्यकर्तेही शिंदे गटात सामील होत आहे. मात्र, आता ठाण्यात शिंदे गटाच्या गळाला प्रथमच एक बडा नेता लागण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे अत्यंत जवळचे सहकारी आणि ठाणे महापालिकेतील राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला हे शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला हा मोठा झटका असणार असल्याचं सांगितलं जात असून ठाण्यातील राजकारण बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि जितेंद्र आव्हाड यांचे विश्वासू सहकारी नजीब मुल्ला यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे मुंब्र्यात मोठमोठे बॅनर्स लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हे बॅनर्स राष्ट्रवादीने लावलेले नाहीत तर ते शिंदे गटाने लावले आहेत. शिंदे गटाच्या बॅनर्सवर नजीब मुल्ला यांचा फोटो दिसत असल्याने मुंब्र्यापासून ते ठाण्यापर्यंत राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

हे सुद्धा वाचा

हॅपी बर्थडे नजीब मुल्ला, असं या बॅनर्सवर लिहिलं आहे. तसेच या बॅनर्सवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे फोटो आहेत. त्यामुळे नजीब मुल्ला हे शिंदे गटाच्या वाटेवर तर नाही ना? अशी चर्चा या निमित्ताने रंगली आहे.

शिंदे गटाचा प्लॅन

नजीब मुल्लाच नव्हे तर मुंब्रा परिसरातील आणखी काही नगरसेवक शिंदे गटाच्या गळाला लागण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षातील सक्रिय कार्यकर्ते उभे करण्याचा शिंदे गटाचा प्लॅन आहे. त्यामुळेच शिंदे गट आता मुंब्र्यात सक्रिय झाला असल्याचं सांगितलं जात आहे.

राष्ट्रवादीतील नाराजी उघड

मुंब्रा परिसरात नजीब मुल्ला यांच्या बॅनरमुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. नजीब मुल्ला हे फक्त जितेंद्र आव्हाडच नव्हे तर अजित पवार यांच्या जवळचेही मानले जात आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीत जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात नजीब मुल्ला यांना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यताही या निमित्ताने रंगली आहे.

नजीब मुल्ला यांची शिंदे गटात जाण्याची संमती असल्याशिवाय शिंदे गट ही बॅनरबाजी करणार नसल्याचं सांगितलं जात आहे. या निमित्ताने राष्ट्रवादीतील नाराजीही उघडपणे दिसून येत आहे.

आव्हाडांची डोकेदुखी वाढणार

नजीब मुल्ला हे राष्ट्रवादीतून शिंदे गटात आल्यास राष्ट्रवादीला मोठं नुकसान होणार आहे. नजीब मुल्ला शिंदे गटात आल्यास मुंब्र्यातील राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला खिंडार पाडण्यास शिंदे गटाला यश मिळणार आहे. तसेच नजीब मुल्ला यांच्या प्रवेशामुळे पहिल्यांदाच आव्हाड यांच्यासमोर तगडा उमेदवार मिळणार आहे. त्यामुळे आव्हाड यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.