ठाण्यातील काही भागात येत्या बुधवारी पाणी पुरवठा बंद; ‘या’ भागात पाणी नाही
ठाणे महानगरपालिकेच्या पिसे येथील रॉ वॉटर पंपिंग स्टेशनमध्ये वाढीव क्षमतेच्या पंपिंग मशिनरी बसविण्यात येणार आहे. तसेच इतर अत्यावश्यक कामेही करण्यात येणार आहे. (Thane: No Water Supply For 24 Hours On september 22; Details Here)
ठाणे: ठाणे महानगरपालिकेच्या पिसे येथील रॉ वॉटर पंपिंग स्टेशनमध्ये वाढीव क्षमतेच्या पंपिंग मशिनरी बसविण्यात येणार आहे. तसेच इतर अत्यावश्यक कामेही करण्यात येणार आहे. त्यासाठी बुधवार 22 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते गुरुवार 23 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत ठाणे महापालिकेचा स्वतःच्या योजनेतील पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत फक्त स्टेम प्राधिकरणामार्फत होणारा पाणी पुरवठा सुरू राहणार आहे. (Thane: No Water Supply For 24 Hours On september 22; Details Here)
बुधवार 22 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत घोडबंदर रोड, पातलीपाडा, हिरानंदानी इस्टेट, ब्रम्हांड, विजयनगरी, गायमुख, बाळकुम, समतानगर, आकृती, सिद्धेश्वर, जॉन्सन, इंटर्निटी, कोलशेत तसेच आझादनगर या भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तसेच बुधवार 22 सप्टेंब रोजी सकाळी 9 ते गुरुवार 23सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत ऋतुपार्क, जेल, साकेत, रुस्तमजी, कळवा व मुंब्र्याच्या काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
दोन दिवस कमी दाबाने पाणी
दरम्यान या शटडाऊनमुळे पाणी पुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. तसेच नागरिकांनी पाण्याचा योग्यतो वापर करुन पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.
गणेशोत्सव शांततेत, पालकमंत्र्यांकडून आभार
सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त अनंत चतुर्थीच्या दिवशी गणेशमुर्तीं विसर्जनासाठी ठाणे महानगरपालिकेच्यावतीने तयार करण्यात आलेल्या श्रीगणेश विसर्जन व्यवस्थेची राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांच्यासमवेत प्रत्यक्षस्थळी जावून पाहणी केली. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने श्रीगणेश विसर्जनासाठी अत्यंत चोख व्यवस्था केल्याबद्दल संपूर्ण प्रशासनाचे एकनाथ शिंदे यांनी आभार मानले. तसेच ठाणेकरांनी शासनाने दिलेल्या कोरोना नियमावलीचे काटेकोरपणे पालन करत शिस्तबद्ध पद्धतीने यंदाचा गणेशोत्सव साजरा केल्याबद्दल त्यांनी ठाणेकरांचेही आभार मानले.
दरवर्षीप्रमाणे श्री गणेश मुर्तींचे विधिवत विसर्जन व्हावे यासाठी महापालिकेच्यावतीने एकूण 7 विसर्जन महाघाट, 13 कृत्रीम तलावांची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच ज्या भाविकांना विसर्जन घाट किंवा कृत्रीम तलावांच्या ठिकाणी श्री मुर्तींचे विसर्जन करता येणे शक्य नाही त्यांच्यासाठी 20 ठिकाणी श्री गणेश मुर्ती स्वीकार केंद्रे उभारण्यात आली होती. तसेच गणेशमूर्ती विसर्जनासाठी डिजीठाणे प्रणाली मार्फत ऑनलाईन टाइमस्लॉट बुकिंग सुविधेला देखील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. ठाणे महापालिका प्रशासनाने केलेल्या या चोख व्यवस्थेचे शिंदे यांनी कौतुक करत सर्वांचे आभार मानले.
हरित शपथ
अनंत चतुर्थी दिवशी शिंदे यांनी कोलशेत विसर्जन महाघाट, पारसिक रेतीबंदर, कोपरी, उपवन तलाव, रायलादेवी व मासुंदा तलाव येथील विसर्जन व्यवस्थेची पाहणी करून संपूर्ण यंत्रणेचा आढावा घेतला. दरम्यान सर्व विसर्जन महाघाट व कृत्रिम तलाव येथे शिंदे यांच्या उपस्थितीत भाविकांकडून पृथ्वी, जल, वायु, अग्नी आणि आकाश या पंचतत्वांचे रक्षण करण्यासाठी “हरित शपथ” घेण्यात आली. (Thane: No Water Supply For 24 Hours On september 22; Details Here)
Video | MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 1 PM | 20 September 2021#Mahafast100 | #News | #NEWSUPDATE https://t.co/xhhjV4X70U
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 20, 2021
संबंधित बातम्या:
मंडपातील वीज पुरवठा चेक करताना विजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू; दुर्देवी घटनेने कल्याणमध्ये हळहळ
VIDEO: खड्डे दुरुस्त न करता टोल वसुली; मनसेने भिवंडी-ठाणे रस्त्यावरील टोल नाका फोडला
(Thane: No Water Supply For 24 Hours On september 22; Details Here)