तलवारी नाचवणाऱ्या तरुणांसाठी पोलिसांची गांधीगिरी, मुलं वाममार्गाला लागू नये म्हणून अनोखी शक्कल
सोशल मीडियावर काही तरुणांचा हातात तलवारी घेऊन नाचत असल्याचा एक व्हिडीओ समोर आला होता. पोलिसांनी संबंधित तरुणांना शोधून काढलं आहे (Thane Police organize meditation camp for youth who dance with sword).
कल्याण (ठाणे) : सोशल मीडियावर काही तरुणांचा हातात तलवारी घेऊन नाचत असल्याचा एक व्हिडीओ समोर आला होता. पोलिसांनी संबंधित तरुणांना शोधून काढलं आहे. हे तरुण आणे भिसोळ गावातील असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या तरुणांना कोणतीही शिक्षा न करता अनोखी योजना राबविली आहे. गावातील तरुण वाम मार्गाने दूर राहावेत. गावात वैमनस्य मिटावे आणि वाद संपावा यासाठी ठाणे पोलीस अधीक्षकांचा मार्गदर्शनाखाली टिटवाळा पोलिसांनी या गावात सतत तीन दिवस ध्यान साधना शिबीराचे आयोजन केले होते. पोलिसांच्या या अनोख्या उपक्रमा विषयी चांगली चर्चा सुरू झाली आहे (Thane Police organize meditation camp for youth who dance with sword).
नेमकं प्रकरण काय?
काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हीडीओमध्ये काही तरुण-तरुणी तलवार घेऊन नाचत होते. या व्हायरल व्हिडीओ प्रकरणी टिटवाळा पोलिसांनी तपास सुरु केला. या तपासात संबंधित व्हिडीओ हा कल्याण तालुक्यातील आणे भिसोळ या गावातील असल्याची माहिती समोर आली (Thane Police organize meditation camp for youth who dance with sword).
गावात दहशत, पण पोलिसांची सौम्य भूमिका
माघी गणोशोत्सवादरम्यान अतिउत्साहात तरुण-तरुणी तलवार घेऊन नाचत होते. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली. मात्र गावात एकच दहशत पसरली. या व्हिडीओमुळे पोलीस गावकऱ्यांना त्रास देणार. मोठी कारवाई केली जाईल. पण त्यांच्या कल्पनेच्या एकदम उलटे झाले. ठाणे ग्रामीणचे एसपी विक्रम देशमाने यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली टिटवाळ्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजू वंजारी यांनी एक अनोखा उपक्रम सुरु केला.
पोलिसांचा नेमका उपक्रम काय?
या उपक्रमांतर्गत आणे भिसोळ गावात सर्व तरुणांना एकत्रित करण्यात आले. इतकेच नाही तर गावात ज्यांच्या एकमेकांसोबत वाद आहे त्या लोकांना सुद्धा एकत्रित करण्यात आले. सतत 3 दिवस या गावकऱ्यांना एकत्रित करुन ध्यान साधना करण्यात आले. प्रत्येक दिवशी 40 मिनीटांचे पोलिस आणि गावकरी ध्यानसाधना करीत होते. या ध्यानसाधनेतून पोलिसांनी शांतीचा संदेश दिलाच, शिवाय गाव एकोप्याचे दर्शन घडविले.
पोलिसांनी या प्रकरणात पुढाकार घेतल्याने हा विषय चर्चेचा ठरला आहे. अनेक गावातून या उपक्रमाची मागणी केली जात आहे. कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव पाहता ही मोहिम करता येणे शक्य नाही. कोरोना प्रादूर्भाव कमी झाल्यावर या मोहिमेचा विचार केला जाईल.
हेही वाचा : वाढदिवशी जोशात नंग्या तलवारी नाचवल्या, बुलडाण्यात नगरपरिषद उपाध्यक्षांसह सहा जणांवर गुन्हा