AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पालिका अधिकाऱ्यांना खड्डे भोवले; ठाणे महापालिकेचे चार अभियंते निलंबित

गेल्या काही दिवसांपासून ठाण्यातील खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या खड्ड्यांचा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनाही बसला आहे. (Thane pothole menace: 4 engineers suspended)

पालिका अधिकाऱ्यांना खड्डे भोवले; ठाणे महापालिकेचे चार अभियंते निलंबित
thane municipal corporation
Follow us
| Updated on: Sep 25, 2021 | 3:17 PM

ठाणे: गेल्या काही दिवसांपासून ठाण्यातील खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या खड्ड्यांचा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनाही बसला आहे. त्याची दखल खुद्द पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली होती. शिंदे यांनी काल ठाण्यातील खड्डयांची पाहणी करून अधिकाऱ्यांना फैलावर घेतले होते. त्यानंतर आज या खड्ड्यांना जबाबदार असलेल्या पालिकेच्या चार अभियंतांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. (Thane pothole menace: 4 engineers suspended)

ठाणे महापालिकेने आज ही कारवाई केली. उथळसर प्रभाग समितीतील अभियंता चेतन पटेल, वर्तकनगर प्रभाग समितीतील अभियंता प्रशांत खडतरे, लोकमान्य नगर-वर्तक नगर प्रभाग समितीतील अभियंता संदीप सावंत आणि संदीप गायकवाड यांना निलंबित करण्यात आले आहे. रस्त्यावरील खड्डे कालमर्यादेत बुजविण्यात या अभियंत्यांना अपयश आल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, पालिकेने अभियंत्यांवर कारवाई केली. मात्र, कंत्राटदारांवर कारवाई कधी करणार असा सवाल या निमित्ताने केली जात आहे.

शिंदेंनी धारेवर धरले

दरम्यान, पालकमंत्री आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी काल ठाण्यातील खड्ड्यांची पाहणी केली होती. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. एकनाथ शिंदे यांनी तीन हात नाका सिग्नलसह शहरातील विविध रस्त्यांची पाहणी केली. यावेळी महापालिकेचे अधिकारी, एमएमआरडीए, एमएसआरडीसी, पीडब्ल्यूडी, वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांसह ठाणे आणि ग्रामीण पोलीसही त्यांच्यासोबत होते. यावेळी शिंदे यांनी रस्त्यांचे डांबरीकरण सुरू असलेल्या ठिकाणी भेट देऊन कामाच्या दर्जाचीही पाहणी केली. यावेळी रस्त्यांची चाळण झालेली पाहून शिंदे यांनी संताप व्यक्त करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. जे काम केले आहे ते चांगले काम करा. पावसाळ्यापूर्वी ज्या रस्त्यांची कामे करण्यास सांगितले होते ती कामे पूर्ण करा. रस्त्यावरील खड्ड्यांच्या रोज बातम्या येत आहेत. लोक वैतागत आहेत. त्यामुळे आम्हाला शिव्या खाव्या लागत आहेत. कंत्राटदार रस्त्यांचे काम नीट करत नसतील तर त्यांना ब्लॅक लिस्ट करा, अशा सूचना देतानाच मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी देखील या कामात लक्ष घातलं पाहिजे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

खड्डे लवकर बुजवणार

शहरातील पाच उड्डाणपुलावरील रस्ते नीट आहेत. मात्र, काही रस्त्यांची डागडुजी होणे बाकी आहे. मात्र, रस्त्याच्या कामात हलगर्जीपणा करू नका. अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर करवाई करा, असं सांगतानाच शहरातील परिस्थिती लक्षात घेऊनच फाऊंटन आणि जेएनपीटीकडील वाहने सोडावी लागणार आहे, असं ते म्हणाले होते. शहरातील रस्त्यांची कामे आम्ही युद्धपातळीवर हाती घेतली आहे. खड्डे लवकरात लवकर बुजवले जाणार आहेत. पाऊस ओसरला की रस्त्याची कामे जोमाने सुरू करणार आहोत. निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करण्याचे आदेश कंत्राटदारांना दिले आहेत. वाहतूक कोंडीमागे केवळ खड्डे हे एकमेव कारण नाही. तर मोठी अवजड वाहने, जेएनपीटीतील अवजड वाहने आदींमुळेही वाहतूक कोंडी होत आहे, असं त्यांनी सांगितलं होतं. (Thane pothole menace: 4 engineers suspended)

संबंधित बातम्या:

16 वर्षीय मुलीवर बलात्कार करुन पोलिसांना महिनाभर चकवा, हनी ट्रॅपच्या माध्यमातून नराधमाला बेड्या

‘त्या’ नराधमांना फाशी देऊ नका, त्यांचा लिंगच्छेद करून गावागावातून मिरवणूक काढा; रिपाइं महिला कार्यकर्त्या संतापल्या

अरे बापरे! ठाण्यात सूजर वॉटर पार्कमध्ये आढळली 7 फूट लांब मगर; कर्मचाऱ्यांची पाचावर धारण बसली

(Thane pothole menace: 4 engineers suspended)

पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक
पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक.
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?.
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर.
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?.
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'.
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?.
पाकच्या उलट्या बोंबा... भारताविरोधात पाकिस्तानं घेतले 'हे' मोठे निर्णय
पाकच्या उलट्या बोंबा... भारताविरोधात पाकिस्तानं घेतले 'हे' मोठे निर्णय.
तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल
तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल.
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान.
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? पहलगाम हल्ल्याचं दुःख नाही?
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? पहलगाम हल्ल्याचं दुःख नाही?.