रोशनी शिंदे प्रकरण तापलं, अजूनही पोलिसात गुन्हा दाखल नाही, ठाकरे गट उद्या रस्त्यावर उतरणार

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोशनी शिंदे यांची भेट घेऊन घटनेची माहिती घ्यावी. सीसीटीव्ही फुटेज तपासून या प्रकरणात गुन्हा नोंद केला जावा. मात्र त्यांच्याकडून तशी काहीच कारवाई नाही, अशी टीका विनायक राऊत यांनी केली आहे.

रोशनी शिंदे प्रकरण तापलं, अजूनही पोलिसात गुन्हा दाखल नाही, ठाकरे गट उद्या रस्त्यावर उतरणार
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 04, 2023 | 5:08 PM

निखिल चव्हाण, मुंबई : ठाण्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे (Roshani Shinde) यांना मारहाण प्रकरणात अद्याप पोलिसांनी (Thane Police) तक्रार दाखल करून घेतलेली नाही, यावरून ठाकरे गटाचे नेते संतापले आहेत. सोमवारी संध्याकाळी शिंदे गटाच्या महिला पदाधिकारी आणि रोशनी शिंदे यांच्यात सोशल मीडियातील पोस्टवरून वाद झाले. यावेळी शिंदे गटाच्या महिलांनी रोशनी शिंदे यांना मारहाण केली. यात रोशनी शिंदे जखमी झाल्या असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेला आता २४ तास उलटत असूनही पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल करून घेतलेली नाही. त्यामुळे ठाणे आणि मुंबईतलं राजकारण चांगलंच तापलं आहे.

उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर फडतूस गृहमंत्री अशी टीका केली. तर ठाकरेंच्या आरोपांना आता भाजपकडून तीव्र प्रत्युत्तर मिळत आहे. दरम्यान, ठाणे पोलिसांनी रोशनी शिंदे यांची तक्रार दाखल करून न घेतल्याने उद्या महाविकास आघाडीतर्फे ठाणे पोलीस आयुक्तालयावर महामोर्चा काढला जाणार आहे, अशी माहिती शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दिली.

काय म्हणाले विनायक राऊत?

रोशनी शिंदे यांच्यासारख्या महिलेला ४० जणांनी मारहाण केल्यानंतर त्याची तक्रार अजून पर्यंत ठाण्याच्या पोलिसांनी दाखल करून घेतलेली नाही. आम्ही पोलिसांना भेटायला गेलो असताना एक तासापूर्वीच आयुक्त केबिन सोडून गेले होते. त्या संदर्भात महिलांवरती आरोप करणाऱ्या तसेच महिलांवरती हल्ला करणाऱ्या या लोकांच्या विरोधात गुन्हा नोंद न करणाऱ्या पोलिसांच्या विरोधात आम्ही पोलीस आयुक्तालय यांच्याविरोधात मोर्चा काढणार आहोत. या मोर्चामध्ये प्रामुख्याने शिवसेना ठाकरे गटाचे संपूर्ण पदाधिकारी राष्ट्रवादी व काँग्रेसचे पदाधिकारी यामध्ये उपस्थित असणार आहेत, अशी माहिती विनायक राऊत यांनी दिली.

आदित्य ठाकरेंचं नेतृत्व

या महामोर्चाचं नेतृत्व आदित्य ठाकरे करणार आहेत. ठाण्याच्या पोलीस आयुक्तालयापर्यंत हा मोर्चा नेला जाईल. तसेच आयुक्तालयाला टाळं ठोकलं जाईल. या प्ररकणात एकही तक्रार घेतलेली नाही, अशा पोलीस आयुक्तांना बाहेर पाठवण्यासाठी तसेच या पोलीस आयुक्तांनादेखील हद्दपार करण्याची आमची मागणी आहे, असं विनायक राऊत यांनी सांगितलं.

या प्रकरणी अनेक महिलांनी या घटनेचं समर्थन केलंय, त्यामुळे रोशनी शिंदे यांना मारहाण झालीच नाही असे मुख्यमंत्र्यांना म्हणायचे आहे का?, असा सवाल विनायक राऊत यांनी केलाय. आनंद दिघे यांचं नाव घेऊन चालणारे हे राज्यकर्ते आता दुसऱ्यांवरती अन्याय करत आहेत, अशी टीका विनायक राऊत यांनी केली.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोशनी शिंदे यांची भेट घेऊन घटनेची माहिती घ्यावी. सीसीटीव्ही फुटेज तपासून या प्रकरणात गुन्हा नोंद केला जावा. मात्र त्यांच्याकडून तशी काहीच कारवाई नाही. आज गृहमंत्री पद त्यांना भूषवाव लागतंय हे त्यांचे दुर्दैव आहे. त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं परंतु लाचार असल्यामुळे तेवढा उपमुख्यमंत्री पदावर त्यांना तहान भगवावी लागत आहे, अशी खोचक टीकाही विनायक राऊत यांनी केली.

शिंदे गटाच्या नेत्या दीपाली सय्यद यासुद्धा गद्दार गटामध्ये गेल्या आहेत. देवेंद्र फडणवीस तसेच, देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचा देखील कर्तव्य आहे की या देशामध्ये कोणाकोणाचे पाकिस्तानमध्ये अकाउंट आहेत, त्यांचा डाटा कलेक्ट करून कुंडली शोधून ती समोर आणावी, असं वक्तव्य विनायक राऊत यांनी केलंय.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.