Thane Tree Planting : ठाणे स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे शालेय विद्यार्थ्यांबरोबर 2150 वृक्षांची लावगड
कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत, एसबीआयने फक्त आपल्या नफ्याकडे लक्ष न देता आजूबाजूच्या सामाजिक समस्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. समाज आणि देशासाठी एक जबाबदार कॉर्पोरेट नागरिकत्वाची भूमिका नेहमीच बजावत आहे.
ठाणे : सामाजिक जबाबदारीची जाणीव एसबीआय (SBI)च्या संस्कृतीत दीर्घकाळापासून रुजलेली आहे. आझादी का अमृत महोत्सवा (Amrut Mahotsav)निमित्त, एसबीआयने संपूर्ण भारतात सामाजिक विकास, सामाजिक दायित्व आणि पर्यावरण जतन आणि देखभाल यांसारखे विविध उपक्रम (Campaign) राबवले आहेत. मुख्य महाव्यवस्थापक, मुंबई मेट्रो विभाग जी.एस. राणा आणि महाव्यवस्थापक जुही स्मिता सिन्हा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ठाणे मॉड्युलचे उपमहाव्यवस्थापक अतुल राठी यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक विकासासाठी राष्ट्रहिताचा कार्यक्रम राबविण्यात आला. हा कार्यक्रम आर्थिक, पर्यावरणीय आणि सामाजिक विकासाकडे नेण्यास आणि सामाजिक उद्दिष्टे साध्य करण्यास मदत करेल. एसबीआय ठाणे मॉड्युलने 25000 वृक्षारोपण, शाळेचे परिवर्तन, महिला आणि बालकल्याण, आरोग्य सेवा, बेटी बचाओ बेटी पढाओ इत्यादी अनेक राष्ट्रीहिताच्या उपक्रमांमध्ये आपले योगदान दिले.
शहापूर येथील सासुरवाडी आश्रमशाळेत 2150 वृक्षारोपण
या उपक्रमांतर्गत बँक दिनाच्या 67 व्या वर्धापनदिनानिमित्त एसबीआय एओ ठाणे यांनी शहापूर येथील सासुरवाडी आश्रमशाळेत 2150 झाडे लावली. हे निर्विवाद सत्य आहे की मानवाचे निसर्गावर अपार प्रेम आहे आणि विशेषत: मुलांची निसर्गाशी असलेली ओढ, ही इच्छा लक्षात घेऊन झाडे लावण्याची पद्धत, त्याची देखभाल, अशा अनेक गोष्टींची सविस्तर माहिती देण्यात आली. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत, एसबीआयने फक्त आपल्या नफ्याकडे लक्ष न देता आजूबाजूच्या सामाजिक समस्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. समाज आणि देशासाठी एक जबाबदार कॉर्पोरेट नागरिकत्वाची भूमिका नेहमीच बजावत आहे.
भिवपुरीच्या जंगलात बाण हायकर्सतर्फे वृक्षारोपण
बाण हायकर्सतर्फे वृक्षारोपण मोहिम घेण्यात आली. या मोहिमेत भिवपुरीच्या जंगलात 250 झाडे लावण्यात आली. बाण हायकर्स दरवर्षी भिवपुरीच्या जंगलात वृक्षारोपण मोहिम राबवते. शिवाय या वृक्षांची काळजीही घेते. या मोहिमेमध्ये स्थानिक नागरिकही तितक्याच उत्साहाने सहभागी होतात. गेल्या वर्षी 200 झाडे लावण्यात आली होती. त्यापैकी 120 झाडं जगली आहेत. बाण हायकर्सची स्थापना 2008 साली झाली. तेव्हापासून ही संस्था वृक्षारोपण उपक्रम राबवत आहे. (Thane State Bank of India planted 2150 trees with school children)