Thane: रिक्षाच्या सीटवर प्रवाशांच्या ऐवजी बसला 5 फुटी अजगर, रिक्षाचालकाचा भीती ने उडाला थरकाप
ठाणे, पावसाळ्यात विषारी-बिन विषारी साप (Snake) मोठ्या प्रमाणात मानवीवस्तीत भक्ष्याच्या शोधात येत असल्याच्या घटना घडत आहे. अश्याच टिटवाळा परिसरात एका रिक्षात (Rickshaw) तब्बल 5 फुटी अजगर शिरल्याने भयभीत प्रकार घडला असून रिक्षा चालकाने सर्पमित्राला संपर्क केला. त्यानंतर माहिती मिळताच वाॅर फाऊंडेशनच्या सर्पमित्र सागर म्हात्रे यांनी घटनास्थळी दाखल होऊन त्या अजगराचा रेस्क्यू करत रिक्षातून पकडून एका […]
ठाणे, पावसाळ्यात विषारी-बिन विषारी साप (Snake) मोठ्या प्रमाणात मानवीवस्तीत भक्ष्याच्या शोधात येत असल्याच्या घटना घडत आहे. अश्याच टिटवाळा परिसरात एका रिक्षात (Rickshaw) तब्बल 5 फुटी अजगर शिरल्याने भयभीत प्रकार घडला असून रिक्षा चालकाने सर्पमित्राला संपर्क केला. त्यानंतर माहिती मिळताच वाॅर फाऊंडेशनच्या सर्पमित्र सागर म्हात्रे यांनी घटनास्थळी दाखल होऊन त्या अजगराचा रेस्क्यू करत रिक्षातून पकडून एका ड्रममध्ये बंद केले. अजगर पडकल्याचे पाहून रिक्षाचालकासह परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतला. त्या नंतर या अजगराला सुखरूप वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले.
वनपरिक्षेत्र अधिकारी आर. एन. चन्ने व वनपाल रामदास घोरले यांच्या मार्गदर्शनाखाली निसर्गच्या सानिध्यात सोडून अजगराला मुक्त करण्यात आले अजगराला निसर्ग मुक्त करताना वाॅर फाऊंडेशन अध्यक्ष योगेश कांबळे, प्राणी मित्र प्रेम आहेर, रेहान मोतीवाला, रोमा त्रिपाठी वनविभागाचे कर्मचारी जयेश घुगे व वनरक्षक दळवी उपस्थित होते.
अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील शेतशिवारात सर्पमित्राने पकडले तब्बल सहा अजगर
सध्या पावसाळा सुरू आहे त्यामुळे अनेकांच्या घरात साप निघत असतात. अशाच प्रकारे अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील चार ते पाच गावात शेतशिवारात निघाले सहा अजगर सर्पमित्र शुभम विघे याने पकडून त्यांना जंगल अधिवासात सोडण्यात आले आहे. यातील दोन अजगर हे पाच फुटू पेक्षा जास्त लांबीचे होते.