‘माझ्या मालकीची जागा मला परत द्या,’ ठाण्यात 77 वर्षाच्या आजीचे बेमुदत आमरण उपोषण
स्वतःच्या मालकीच्या जागेत झालेल्या अनधिकृत बांधकामाविरोधात एका 77 वर्षीय आजीने आवाज उठवला आहे. या आजी आमरण उपोषणाला बसल्या आहेत.
ठाणे : स्वतःच्या मालकीच्या जागेत करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामाविरोधात एका 77 वर्षीय आजीने आवाज उठवला आहे. जयश्री प्रभाकर म्हात्रे असं या आजींचं नाव असून त्या आमरण उपोषणाला बसल्या आहेत. या वयात स्वतःच्या हक्कासाठी लढावं लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. (Thane77 year old grandmother started protest against unauthorized construction on her own land)
अनधिकृत बांधकाम हटवण्याबाबत त्यांनी यापूर्वी अनेक तक्रारी दिल्या
भाईंदर पश्चिमेला असलेल्या सुभाषचंद्र बोस मैदानाजवळ 77 वर्षाच्या जयश्री प्रभाकर म्हात्रे या आजी बेमुदत उपोषणाला बसल्या आहेत. त्यांच्या या उपोषणाची एकच चर्चा सुरु आहे. स्वतःच्या मालकी जागेत करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम हटवण्याबाबत त्यांनी यापूर्वी अनेक तक्रारी दिल्या आहेत. मात्र, तक्रारी देऊनही दखल घेतली न गेल्यामुळे शेवटी कंटाळून या 77 वर्षाच्या आजीने पालिका प्रशासनाच्याविरोधात उपोषण सुरु केले आहे.
रंगमंचाला अधिकृत बांधकाम परवानगी नसल्याची माहिती
मिळालेल्या माहितीनुसार भाईंदर पश्चिमेच्या मोर्वा गावातील रंगमंच मधील 17 वर्षांपूर्वी तत्कालीन आमदार सीताराम भोईर यांच्या निधीतून मोर्वा गावात रंगमंच बांधण्यात आला. या रंगमंचाची देखरेख सध्या पालिका करत आहे. ज्यावेळेस हे बांधण्यात आले, तेव्हा पालिकेने जागेची पाहणी केली. मात्र, पाहणी करताना रंगमंच ज्या ठिकाणी बांधण्यात आला त्या जागेचा मालक कोण आहे याची माहिती घेतली नव्हती. तसेच धक्कादायक बाब म्हणजे सदर रंगमंचाला अधिकृत बांधकाम परवानगी नसल्याचं माहिती अधिकारामध्ये उघडकीस आले आहे. आता हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मालकी जागेवर अनधिकृत असलेलेल बांधकाम तोडण्यास पालिका प्रशासनाने नकार दिला आहे.
जागेची मालगी हवी असेल तर ते आता शक्य नाही
याबाबत पालिकेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक खांबीत यांना याविषयी सविस्तर विचारण्यात आले. याविषयी बोलताना “सदर जागेचा मोबदला देण्यास पालिका प्रशासन तयार आहे. मात्र जागेची मालगी हवी असेल तर ते आता शक्य नाही. 12 वर्षानंतर त्यांचा मालकी हक्क निघालेला आहे. जरी त्यांचे 7/12 वर नाव असले तरी मालकी पालिकेच्या ताब्यात आहे,” असे त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, बेमुदत आमरण उपोषणाला बसलेल्या आजींनी जोपर्यंत न्याय मिळणार नाही, तोपर्यंत उपोषण करणार असा निर्धार केलेला आहे. त्यानंतर आजीबाईंच्या मागणीवर पोलिका प्रशासन काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
इतर बातम्या :
Maratha Reservation : केंद्राकडून आरक्षणाचा अधिकार राज्यांना बहाल, खासदार संभाजीराजेंची भूमिका काय?
MHADA Lottery 2021 Update: म्हाडा यंदा 9 हजार घरांची लॉटरी काढणार, सामान्यांचं स्वप्न सत्यात उतरणार
(Thane77 year old grandmother started protest against unauthorized construction on her own land)