पाणी पिता पिता बाटलीत अडकलं तोंड, बदलापुरातल्या ‘त्या’ बिबट्याच्या पिल्लाचा शोध सुरू

बिबट्याच्या पिल्लाच्या (Leopard cub) डोक्यात बाटली (Bottle) अडकल्याचा प्रकार ठाणे (Thane) जिल्ह्यातील बदलापूरजवळच्या गोरेगावमध्ये समोर आलाय. या पिल्लाचा गेल्या 36 तासांपासून शोध घेतला जातोय. बिबट्याचं हे पिल्लू साधारण एक वर्षाचं आहे.

पाणी पिता पिता बाटलीत अडकलं तोंड, बदलापुरातल्या 'त्या' बिबट्याच्या पिल्लाचा शोध सुरू
बाटलीत तोंड अडकलेल्या बिबट्याच्या पिल्लाचा शोध सुरू
Follow us
| Updated on: Feb 15, 2022 | 12:09 PM

ठाणे : बिबट्याच्या पिल्लाच्या (Leopard cub) डोक्यात बाटली (Bottle) अडकल्याचा प्रकार ठाणे (Thane) जिल्ह्यातील बदलापूरजवळच्या गोरेगावमध्ये समोर आलाय. या पिल्लाचा गेल्या 36 तासांपासून शोध घेतला जातोय. बिबट्याचं हे पिल्लू साधारण एक वर्षाचं असून गोरेगाव परिसरात परवा रात्री ते पाणी पिण्यासाठी आलं होतं. मात्र यावेळी एका पाण्याच्या कॅनमध्ये त्याचं डोकं अडकलं. त्यामुळं कॅन अडकलेलं हे बिबट्याचं पिल्लू फिरत असतानाच एका पर्यटकाला दिसलं. त्यामुळे त्यानं त्याचा व्हिडिओ काढला. यानंतर या व्हिडिओच्या आधारे या पिल्लाचा परवा रात्रीपासून कसून शोध घेतला जातोय. वनविभागाचे अधिकारी कर्मचारी, एनजीओ, प्राणीमित्र संघटना असा मोठा फौजफाटा या बिबट्याच्या पिल्लाला शोधण्यासाठी मेहनत घेतोय. हे पिल्लू लवकर न शोधल्यास ते जिवंत मिळणे कठीण होऊन जाणार आहे.

ठसे आढळले, मात्र पिल्लू बेपत्ताच

या पिल्लाच्या पायांचे ठसे आढळले असले, तरी पिल्लू मात्र आढळून आलेलं नाही. परवा रात्रीपासून या पिल्लाच्या डोक्यात कॅन अडकल्यानं ते उपाशी आणि तहानलेलं असणार आहे. त्यामुळं त्याला लवकरात लवकर शोधण्याचं आव्हान वनविभागासमोर आहे. अशा जंगल असलेल्या भागात त्याला मदत कशी मिळणार, ही बाटली सहजासहजी निघणारी नसल्याने ती लवकरात लवकर काढणं गरजेचं आहे. त्यासाठी पिल्लाचा शोधही सुरू आहे. मात्र ते मिळून न आल्यास हे पिल्लू दगावण्याचीही शक्यता आहे.

पिल्लू सैरभैर

बदलापूरच्या गोरेगाव परिसरात वन्य प्राण्यांचा वावर दिसून येतो. इथे काही पर्यटक आणि स्थानिक फिरत असताना त्यांना ही घटना दिसली. पाण्याच्या शोधात हे बिबट्याचं पिल्लू फिरत असताना त्याला ही पाण्याची बाटली दिसली असावी. त्याने पाणी पिण्यासाठी तोंड लावलं असता ते त्यात अडकलं. आता हे पिल्लू सैरभैर फिरत आहे. दोन दिवसांपूर्वीची ही घटना आहे. वनविभाग या पिल्लाचा शोधही घेत आहे मात्र अद्याप ते सापडलं नाही.

आणखी वाचा :

Nashik | स्ट्रक्चरल ऑडिट न करताच रामसेतू कसा पाडणार; स्मार्ट सिटी संचालकांचा सवाल, वादात काँग्रेसची उडी

#ShivJayanti | औरंगाबादेत आजपासून शिवजागर उत्सवाला सुरुवात, शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण कधी?

Rabi Season : पीक पध्दतीमध्ये बदल, ज्वारीचे क्षेत्र घटले, शेतकऱ्यांनी कोणते पीक निवडले..!

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.