Kalyan-Dombivali: कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट झाल्याने चिंतेत वाढ; आयुक्तांनी घेतली खाजगी डॉक्टरांची बैठक

महापालिकेच्या लॅब आणि कलेक्शन सेंटरमधून कोरोना चाचणी केली जात आहे. खाजगी लॅबना त्यांचे कलेक्शन सेंटर वाढविण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. एखादी गरोदर महिला पॉझीटीव्ह आल्यास तिची धावपळ होणार नाही तिला त्रास होणार नाही अशा पद्धतीने तिच्यावर उपचार केले जावेत.

Kalyan-Dombivali: कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट झाल्याने चिंतेत वाढ; आयुक्तांनी घेतली खाजगी डॉक्टरांची बैठक
कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट झाल्याने चिंतेत वाढ
Follow us
| Updated on: Jan 06, 2022 | 10:18 PM

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांच्या संख्येत दुप्पट वाढ झाली असल्याने चिंतेत वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी खाजगी डॉक्टरांची बैठक घेतली. त्यात विशेष करुन स्त्रीरोग आणि बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश होता. कारण आढळून येणाऱ्या रुग्णांमध्ये मुले आणि गरोदर महिलांचा समावेश जास्त दिसून येत आहे. या परिस्थिती घाबरून न जाता लक्षणे जाणवताच प्रत्येकाने टेस्ट करुन घ्यावी असे आवाहन महापालिका अयुक्तांनी केले आहे.

एका दिवसात केडीएमसीत 1172 रुग्ण

एका दिवसात केडीएमसीत 1172 रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आहे. महापालिका हद्दीतील नागरिकांमध्ये कोरोना टेस्ट करुन घेण्याविषयी भिती आहे. कारण नागरिकांना वाटते की, टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास त्यांना रुग्णालयात भरती केले जाईल. ज्यांच्या घरी होम आयसोलेशनचे व्यवस्था आहे. त्यांना रुग्णालयात भरती होण्याची सक्ती केली जाणार नाही. महापालिकेने कोरोना टेस्ट वाढविल्या आहेत. दिवसाला तीन हजार कोरोना टेस्ट केल्या जात आहेत. महापालिकेची स्वत:ची आणि पीपीपी तत्वावर चालविली जाणारी कोरोना टेस्ट लॅबमध्ये दिवसाला सहा हजार जणांनी कोरोना टेस्ट केली जाऊ शकते अशी माहिती आयुक्तांनी दिली. आज खाजगी डॉक्टरांची व्हीसी आयुक्तांनी घेतली. त्याला शहरातील 75 खाजगी डॉक्टर उपस्थित होते.

खाजगी लॅबना त्यांचे कलेक्शन सेंटर वाढविण्याच्या सूचना

महापालिकेच्या लॅब आणि कलेक्शन सेंटरमधून कोरोना चाचणी केली जात आहे. खाजगी लॅबना त्यांचे कलेक्शन सेंटर वाढविण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. एखादी गरोदर महिला पॉझीटीव्ह आल्यास तिची धावपळ होणार नाही तिला त्रास होणार नाही अशा पद्धतीने तिच्यावर उपचार केले जावेत. तसेच एखाद्या मुलाला कोरोना झाल्यास त्याच्या घरी सोय असल्यास त्याला रुग्णालयात दाखल करण्याची सक्ती करता कामा नये अशा सूचना दिल्या डॉक्टरांना दिल्या आहे.

काल देखील आयुक्तांनी फॅमिली डॉक्टरांची बैठक घेऊन लक्षणे आढळून येणाऱ्या रुग्णाला टेस्ट करण्यासाठी तातडीने सेंटरला पाठवावे असे सूचित केले आहे. महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असला तरी हॉस्पिटलाईज होण्याचा रेट हा एक टक्का आहे. ज्या नागरीकांनी लसीकरण केले नाही. ज्यांचा पहिला डोस झाला आहे. त्यांनी दुसरा डोस घ्यावा. महापालिका हद्दीत 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण 3 जानेवारीपासून सुरु झाले. आतार्पयत 38 हजार जणांचे लसीकरण पूर्ण झाले असल्याचे आयुक्तांनी सांगितले. (The number of corona patients in Kalyan Dombivali has doubled, The Commissioner held a meeting of private doctors)

इतर बातम्या

Breaking : लॉकडाऊन अटळ? महापौरांनी सांगितलेला आकडा मुंबईनं ओलांडला, आता पुढं काय?

Mumbai Corona Update | अत्यंत चिंताजनक! मुंबईच्या रुग्णसंख्येनं 20 हजारचा टप्पा ओलांडला

Non Stop LIVE Update
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.