सोनाराने नोकराला बँकेत भरण्यासाठी पैसे दिले; 45 लाखांची रक्कम पाहून नोकराची नियत फिरली
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या ज्वेलर्सने कल्याण महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात घडल्या प्रकाराबाबत तक्रार नोंदवली. गुन्हा दाखल होताच कल्याण महात्मा फुले पोलिसांनी फरार नोकर रमेश देवासी याचा शोध सुरू केला.
ठाणे : कल्याण पश्चिम परिसरात कमलेश ज्वेलर्स नावचे दुकान आहे. त्या दुकानात गेल्या अनेक वर्षापासून रमेश देवासी हा काम करतो. कमलेश ज्वेलर्सच्या मालकाने दुकानात काम करणाऱ्या रमेश देवासी याला 45 लाख 4 हजार रुपये रोकड बँकेत भरण्यासाठी दिले. मात्र इतकी मोठी रक्कम पाहून रमेश याची नियत फिरली. त्याने ही रक्कम बँकेत न भरता तेथून पळ काढला. बराच वेळ उलटूनही रमेश परत न आल्याने या सोनाराला संशय आला. त्याने रमेशची शोधा शोध सुरू केली. परंतु, रमेशने पैसेदेखील बँकेत भरले नसल्याचे लक्षात आले.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या ज्वेलर्सने कल्याण महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात घडल्या प्रकाराबाबत तक्रार नोंदवली. गुन्हा दाखल होताच कल्याण महात्मा फुले पोलिसांनी फरार नोकर रमेश देवासी याचा शोध सुरू केला.
यांनी केली कारवाई
डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी उमेश माने-पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक सरोदे आणि त्यांच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास सुरू केला. तपासासाठी पोलिसांनी दोन पथके तयार केली. यापैकी एक पथक आरोपीच्या गावी पोहचले. त्याच्या मित्र आणि नातेवाईकाकडे चौकशी सुरू केली.
रमेश देवासी अद्याप फरार
या दरम्यान पोलिसांना त्याच्या एका मित्राकडे लाखो रुपये असल्याची माहिती मिळाली. महात्मा फुले पोलिसांनी त्या घरावर छाप टाकत त्याचा मित्र जगदीश देवासी याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून 41 लाख 15 हजार रुपये रक्कम देखील जप्त केली. मात्र प्रकरणी मुख्य आरोपी रमेश देवासी अजून ही फरार आहे. अशी माहिती कल्याणचे एसीपी उमेश माने पाटील यांनी दिली.
पोलिसांनी बनवली 3 पथके
कल्याणमधील एका सोनाराने नोकराला 45 लाखांची रोकड बँकेत भरण्यासाठी दिली. मात्र इतकी रोकड पाहून नोकराची नियत फिरली. रोकड घेवून तो पळून गेला. पकडल्यानंतर रक्कम मिळू नये म्हणून त्याने पूर्ण रक्कम राजस्थानमध्ये राहणाऱ्या मित्राकडे ठेवली. त्यानंतर तो स्वतः फरार झाला. याबाबत गुन्हा दाखल होताच कल्याण महात्मा फुले पोलिसांनी 3 पथक बनवली.
सूत्रांच्या माहितीनंतर राज्यस्थान परिसरात छापा मारला. आरोपीच्या मित्राकडून 41.15 लाखांची रोकड जप्त केला. आरोपीच्या मित्राला बेड्या ठोकल्या. मात्र मुख्य आरोपी रमेश देवासी हा अजूनही फरार आहे. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.