Bhayander Power Outage : वीज गुल झाल्यामुळे लग्नाचा मुहूर्त मध्यरात्री 1 पर्यंत खोळंबला; भाईंदरच्या माहेश्वरी भवनमधील धक्कादायक प्रकार

लग्नाचा मुहूर्त सायंकाळी 7 वाजताचा होता. त्यामुळे वधू आणि वर असे दोन्ही पक्षाकडील पाहुणेमंडळी 4 वाजल्यापासूनच हॉलमध्ये हजेरी लावू लागले होते. मुहूर्ताची वेळ जवळ आली तसा वीजपुरवठ्याच्या प्रश्नाने सर्वांची तारांबळ उडवली. वीज गायब झाल्यामुळे लिफ्टमधून लग्नाच्या हॉलमध्ये यायला निघालेले पाहुणे लिफ्टमधेच अडकले होते.

Bhayander Power Outage : वीज गुल झाल्यामुळे लग्नाचा मुहूर्त मध्यरात्री 1 पर्यंत खोळंबला; भाईंदरच्या माहेश्वरी भवनमधील धक्कादायक प्रकार
वीज गुल झाल्यामुळे लग्नाचा मुहूर्त मध्यरात्री 1 पर्यंत खोळंबलाImage Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 25, 2022 | 1:03 AM

भाईंदर : लग्नाच्या हॉलमधील बत्ती गुल (Power Outage) झाल्यामुळे एका लग्ना (Wedding)चा पुरता बोजवारा उडाल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. लग्नाचा मुहूर्त सायंकाळी 7 वाजताचा, पण अचानक खंडित झालेल्या वीज पुरवठ्यामुळे वधू-वराला सप्तपदी घालण्यासाठी चक्क मध्यरात्री 1 वाजताची वाट पाहावी लागली. भाईंदरच्या माहेश्वरी भवनमध्ये हॉल व्यवस्थापनाच्या सावळ्या गोंधळाचा फटका लग्नाला बसला. वीज खंडित झाल्यामुळे पाहुणे मंडळी लिफ्टमध्ये अडकली. तसेच लग्नाचा मुहूर्त खोळंबल्याने अनेक पाहुण्यांना उपाशीपोटीच लग्न हॉल सोडून घर गाठावे लागले. त्यामुळे वधूवरांच्या कुटुंबियांना पोलिसांत दाद मागावी लागली. पण तिथेही त्यांच्या तक्रारीला जुमानले न गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. (The wedding was delayed till midnight due to power outage in maheshwari bhavan in bhayander)

विजेअभावी पाहुणेमंडळी तब्बल तीन तास लिफ्टमध्ये

लग्नाचा मुहूर्त सायंकाळी 7 वाजताचा होता. त्यामुळे वधू आणि वर असे दोन्ही पक्षाकडील पाहुणेमंडळी 4 वाजल्यापासूनच हॉलमध्ये हजेरी लावू लागले होते. मुहूर्ताची वेळ जवळ आली तसा वीजपुरवठ्याच्या प्रश्नाने सर्वांची तारांबळ उडवली. वीज गायब झाल्यामुळे लिफ्टमधून लग्नाच्या हॉलमध्ये यायला निघालेले पाहुणे लिफ्टमधेच अडकले होते. वयोवृद्ध नागरिकांनाही सात मळ्यांच्या पायऱ्या चढाव्या-उतराव्या लागल्या. अदानी इलेक्ट्रीसिटीने वीज पुरवठ्यातील बिघाड दुरुस्त केला नाही. तसेच हॉल व्यवस्थापनाने जनरेटरचीही व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे सगळे काही ठप्प झाले होते. लिफ्टमध्ये अडकलेल्या पाहुण्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. यादरम्यान लग्नघरातील लोकांनी हॉल व्यवस्थापनाला जाब विचारला, तेव्हा त्यांच्याकडून योग्य उत्तरे मिळाली नाहीत. उलट बेजबाबदारपणे प्रतिसाद दिला गेल्याचा आरोप लग्न घरातील मंडळींनी केला आहे.

आमची छळवणूक केली गेली, शुभ सोहळ्याच्या आनंदावर पाणी फेरले!

आमच्याकडून पैसे घेऊन आमची छळवणूक केली गेली. शुभ सोहळ्याच्या आनंदावर पाणी फेरले गेले. लग्नाचा शुभमुहूर्त गाठू न देणाऱ्या व्यवस्थापनाचा आम्ही निषेध करतो. आम्हाला न्याय हवाय. पोलिसांनी मात्र आमच्या अपेक्षांचा भंग केला. ते हॉल व्यवस्थापनातील जबाबदार पदाधिकाऱ्याच्या घरी गेले. पण तेथे तो पदाधिकारी त्यांना सापडू शकला नाही. यावरून नक्कीच पोलीस आणि हॉल व्यवस्थापनाची मिलीभगत असल्याचे उघड होते. पोलीस जर आमच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेणार नसतील आम्ही न्याय कोणाकडे मागायचा, असा सवाल वधू आणि वराने उपस्थित केला.

भाईंदर परिसरात अदानीच्या कारभारावर संतप्त प्रतिक्रिया

लग्नसोहळ्यातील विजेच्या खेळखंडोब्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. मीरा-भाईंदर परिसरात सातत्याने विजेचा खेळखंडोबा सुरु असतो. ऐन उन्हाळ्यात लोक हैराण होतात. त्यातही जर समारंभातही वेळीच वीज पुरवठ्यातील बिघाड दुरुस्त केला जात नसेल तर अदानी इलेक्ट्रिसिटीच्या सेवेचा उपयोग काय? आम्ही पैसे भरूनही चांगली सेवा दिली जात नसेल, तर आम्ही वरिष्ठ प्रशासनाकडे दाद मागून अदानीविरोधात योग्य कारवाईची मागणी करणार आहोत. तसेच मानहानीचा दावाही दाखल करणार आहोत, असे लग्नाला उपस्थित नातेवाईकांनी सांगितले. (The wedding was delayed till midnight due to power outage in maheshwari bhavan in bhayander)

इतर बातम्या

Yavatmal Accident : यवतमाळमध्ये भरधाव वाहनाने वृद्ध दाम्पत्याला उडवले, संतप्त नागरिकांकडून रास्ता रोको

Nagpur Police Suicide : नागपूरमध्ये पोलिस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या, शिपाई पदावर होते कार्यरत

Non Stop LIVE Update
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.