Ulhasnagar: सहकाऱ्यांच्या जामिनासाठी आला, अन पोलिसांना सापडला, उल्हासनगरच्या चालिया साहेब मंदिरातील चोरीचा उलगडा

उल्हासनगरच्या पूज्य झुलेलाल चालिया साहेब मंदिरात 23 मे 2017 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास मोठी चोरी झाली होती. ज्यात पूज्य झुलेलाल साहेब यांचा सोन्याचा मुकुट, सोन्याचं छत्र, सोन्याचे दोन हार, कानातल्या सोन्याच्या रिंग, सोन्याची माळ, सोन्याची चेन, कानातील सोन्याचे पंख, सोन्याचं ब्रेसलेट, सोन्याचा एक नेकलेस असे लाखो रुपयांचे दागिने चोरण्यात आले होते.

Ulhasnagar: सहकाऱ्यांच्या जामिनासाठी आला, अन पोलिसांना सापडला, उल्हासनगरच्या चालिया साहेब मंदिरातील चोरीचा उलगडा
सहकाऱ्यांच्या जामिनासाठी आला, अन पोलिसांना सापडला
Follow us
| Updated on: Dec 28, 2021 | 11:43 PM

उल्हासनगर : सिंधी बांधवांचं श्रद्धास्थान असलेल्या उल्हासनगरच्या पूज्य झुलेलाल चालिया साहेब मंदिरात चोरी करणारा एक चोरटा तब्बल साडेचार वर्षांनी पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. या चोरीच्या गुन्ह्यात त्याचे सहआरोपी असलेल्या इतर दोघांना नुकतीच एका दुसऱ्या प्रकरणात अटक झाली होती. त्यांचा जामीन करण्यासाठी आलेला असताना हा चोरटा शिवाजीनगर पोलिसांच्या जाळ्यात सापडला.

2017 मध्ये उल्हासनगरच्या पूज्य झुलेलाल चालिया साहेब मंदिरात झाली होती चोरी

उल्हासनगरच्या पूज्य झुलेलाल चालिया साहेब मंदिरात 23 मे 2017 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास मोठी चोरी झाली होती. ज्यात पूज्य झुलेलाल साहेब यांचा सोन्याचा मुकुट, सोन्याचं छत्र, सोन्याचे दोन हार, कानातल्या सोन्याच्या रिंग, सोन्याची माळ, सोन्याची चेन, कानातील सोन्याचे पंख, सोन्याचं ब्रेसलेट, सोन्याचा एक नेकलेस असे लाखो रुपयांचे दागिने चोरण्यात आले होते. अनिल कारला उर्फ हनी, आनंद कुश मंडल आणि अनिल राजकुमार थापा या तिघांनी मिळून ती चोरी केली होती. त्या घटनेप्रकरणी अनिल कारला उर्फ हनी आणि आनंद कुश मंडल या दोघांना अटक झाली होती. तर अनिल राजकुमार थापा आणि चोरीचं सोनं विकत घेणारा गौतम उर्फ रामलाल सरकार असे दोन आरोपी फरार होते.

फरार आरोपी साथीदारांना जामीन देण्यासाठी आला असता जेरबंद

दरम्यान, अंबरनाथच्या शिवगंगानगर परिसरात काही दिवसांपूर्वी एक घरफोडीची घटना घडली होती. या गुन्ह्यात शिवाजीनगर पोलिसांनी अनिल कारला उर्फ हनी आणि आनंद कुश मंडल या दोघांना अटक केली. या दोघांनी पोलीस कोठडीत असताना झुलेलाल मंदिरातील चोरीचीही माहिती पोलिसांना दिली. तसंच त्या प्रकरणात फरार असलेला एक साथीदार अनिल राजकुमार थापा हा आपल्याला जामीन मिळवून देण्यासाठी उल्हासनगरात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यानुसार शिवाजीनगर पोलिसांनी अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिर परिसरात सापळा रचून अनिल राजकुमार थापा याला अटक केली. यानंतर त्याला हिललाईन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय. सिंधी बांधवांचं श्रद्धास्थान असलेल्या पूज्य झुलेलाल चालिया साहेब मंदिरात चोरी करून तब्बल साडेचार वर्षांपासून आरोपी अनिल थापा हा फरार होता. मात्र अखेर शिवाजीनगर पोलिसांनी त्याला पकडल्यानं पोलिसांच्या या कारवाईचं कौतुक होतंय. (Thief arrested for stealing from Chaliya Saheb temple in Ulhasnagar)

इतर बातम्या

Nashik| नाशिकमधल्या मखमलाबाद कालव्यात तीन मुले बुडाली!

पंढरपूरमध्ये ‘मिर्झापूर’, माझ्या मुलामुळे दिवस जात नाहीत, तर माझ्याशी संबंध ठेव, सासऱ्याची सुनेवर बळजबरी

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.