Kalyan : रेल्वे प्रवाशांना दमदाटी करून लुबाडणारे तिघे गजाआड, सीसीटीव्हीच्या आधारे अटक, कल्याण रेल्वे पोलिसांची कारवाई

कल्याण रेल्वे स्थानकावर 17 तारखेला रात्री 11 वाजण्याच्या सुमारास एका प्रवाशाला तीन जणांनी दमदाटी करत त्याच्या जवळील महागडा मोबाईल हिसकावून ते तिघे पळून गेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात प्रवाशाने तक्रार दाखल केली. रेल्वे पोलिसांनी तात्काळ प्लॅटफॉर्मवरील सीसीटीव्ही तपासले.

Kalyan : रेल्वे प्रवाशांना दमदाटी करून लुबाडणारे तिघे गजाआड, सीसीटीव्हीच्या आधारे अटक, कल्याण रेल्वे पोलिसांची कारवाई
रेल्वे प्रवाशांना दमदाटी करून लुबाडणारे तिघे गजाआड
Follow us
| Updated on: Feb 19, 2022 | 3:50 PM

कल्याण : प्रवाशाला दमदाटी करत त्याच्याजवळील मोबाईल (Mobile) हिसकावून पळणाऱ्या तीन चोरट्यांना रेल्वे पोलिसां (Railway Police)नी सीसीटीव्ही (CCTV) तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या 24 तासात गजाआड केले. शाहिद शेख, सागर म्हात्रे, जयदीप राऊत अशी चोरट्यांची नावे असून शाहिद शेख हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरोधात याआधी देखील चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या तिघांमधील एक जण संधी साधत प्रवाशाला दमदाटी करत त्याचा मोबाईल हिसकवायचा त्यानंतर लक्ष विचलित करण्यासाठी हे तिघे विविध दिशेला पळून जात होते. पोलिसांनी या तिघांकडून आतापर्यंत चोरी केलेले सव्वा लाखांचे मोबाईल हस्तगत केले. (Three arrested for robbing train passengers, Arrest on the basis of CCTV, action of Kalyan Railway Police)

दमदाटी करुन प्रवाशाकडून मोबाईल हिसकावला

कल्याण रेल्वे स्थानकावर 17 तारखेला रात्री 11 वाजण्याच्या सुमारास एका प्रवाशाला तीन जणांनी दमदाटी करत त्याच्या जवळील महागडा मोबाईल हिसकावून ते तिघे पळून गेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात प्रवाशाने तक्रार दाखल केली. रेल्वे पोलिसांनी तात्काळ प्लॅटफॉर्मवरील सीसीटीव्ही तपासले. एका कॅमेरात तिघे चोरटे कैद झाले. या सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीची ओळख पटवली. सीसीटीव्हीत दिसणारा आरोपी शाहिद शेख हा सराईत चोरटा होता. कल्याण रेल्वे पोलीसानी तात्काळ शाहिद याला पत्ता शोधत कल्याण पश्चिमेकडील बैलबाजार परिसरात सापळा रचून अटक केली.

आरोपीकडून मोबाईल हस्तगत

शाहिद कडून पोलिसांनी चोरी केलेला मोबाईल हस्तगत केला. याच दरम्यान सीसीटीव्ही दिसणारा त्याच्या आणखी दोन साथीदाराची देखील माहिती पोलिसांनी मिळवत त्याचे दोन साथीदार सागर म्हात्रे व जयदीप राऊत यांना देखील पोलिसांनी अटक केली. दरम्यान शाहीद हा सराईत चोरटा आहे. त्याचे दोन साथीदार सागर आणि जयदीपच्या मदतीने तो प्रवाशांना लुटायचा. त्यानंतर पोलिस व प्रवाशांचे लक्ष विचलित करण्यासाठी हे तिघेही विविध दिशेला पळून जायचे. अखेर प्रवाशांना लुबाडणाऱ्या टोळीचा पोलिसांनी 24 तासात पर्दाफाश करत तिघांनाही बेड्या ठोकल्या आहेत. (Three arrested for robbing train passengers, Arrest on the basis of CCTV, action of Kalyan Railway Police)

इतर बातम्या

चंद्रपूर जिल्ह्यात वाघ-बिबट्यांची दहशत, दोन दिवसांत तिघांचा घेतला जीव, वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढला?

एका दिवसासाठी पत्नी बाहेर गेलेली, परत आल्यावर अज्ञात मुलीची अवस्था पाहून हादरली, पती फरार

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.