दिवा येथे अनधिकृत इमारतींवर हातोडा; एक पोकलेन, 3 गॅसकटर, 80 कामगारांच्या फौजफाट्यासह पालिकेची जम्बो कारवाई

ठाणे महापालिकेने दिवा येथे आज अनधिकृत बांधकामांवर मोठी कारवाई केली. पालिकेने आज दिवा परिसरातील प्रभाग क्र. 27, 28, 29 आणि 33 मधील खान कंपाऊंड, दिवा शीळ रोड व दिवा आगासन येथील अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई केली.

दिवा येथे अनधिकृत इमारतींवर हातोडा; एक पोकलेन, 3 गॅसकटर, 80 कामगारांच्या फौजफाट्यासह पालिकेची जम्बो कारवाई
दिवा येथे अनधिकृत इमारतींवर हातोडा; एक पोकलेन, 3 गॅसकटर, 80 कामगारांच्या फौजफाट्यासह पालिकेची जम्बो कारवाई
Follow us
| Updated on: Feb 03, 2022 | 6:18 PM

ठाणे: ठाणे महापालिकेने (thane corporation) दिवा येथे आज अनधिकृत बांधकामांवर मोठी कारवाई केली. पालिकेने आज दिवा परिसरातील प्रभाग क्र. 27, 28, 29 आणि 33 मधील खान कंपाऊंड, दिवा शीळ रोड व दिवा आगासन येथील अनधिकृत बांधकामांवर ( illegal constructions)  तोडक कारवाई केली. यावेळी काही इमारतींचे मजलेही तोडण्यात आले. विशेष म्हणजे गॅसकटर लावून ही कारवाई करण्यात आली. एक पोकलेन, तीन गॅसकटर आणि 80 कामगारांच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा फौजफाटा मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आला होता. सदरची कारवाई ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा (tmc commissioner vipin sharma) यांच्या आदेशांन्वये करण्यात आली आहे. तसेच शहरातील अनधिकृत बांधकामांवरील ही कारवाई सुरूच राहणार असल्याचंही सांगण्यात आलं.

या कारवाईत समीर शेख यांचे प्लिंथ अंदाजे 2000 चौ.फुट बांधकाम, शिबली नगर येथील अब्दुल गणी शेख यांचे प्लिंथचे अंदाजे 4500 चौ.फुटाचे अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले. अन्सारी रईस, आचार गल्ली यांचे 2800 चौ.फूटाचे पहिल्या मजल्यावरील बांधकाम तर निसार खान यांचे 2800 चौ. फूटाचे पहिल्या व दुसऱ्या माळ्यावरील बांधकाम व तीन स्लॅब गॅस कटरने कट करून निष्कासित करण्यात आले. तसेच हमीद भाई, आचार गल्ली यांची 3500 चौरस फूटाचे प्लिंथ व कॉलम, शहनवाज शेख, मन्नत बंगल्यामागे 2000 चौ.फूट तिसऱ्या माळ्यावरील कॉलमचे बांधकाम निष्कासित करण्यात आले.

दातिवली रोडपर्यंत कारवाई

तसेच विक्रांत पाटील यांचे अंदाजे 3500 चौ. फुट मोजमापाचे प्लिंथ, सुनील पाटील यांचे श्री समर्थ नगर दिवा येथील तळअधिक 6 व्या मजल्यामधील 4, 5, व 6 मजला निष्कासीत करण्यात आला. सुनिल म्हस्के यांचे अंदाजे 4000 चौ.फुट मोजमापाचे तळ अधिक 1 दुसऱ्या मजल्यावरील कॉलम व स्लॅब निष्कासीत करण्यात आले. सुनिल कनोजिया यांचे मढवी कॉम्पलेक्स् जीवदानी नगर येथील तळअधिक 2 तिसऱ्या मजल्यावरील अंदाजे 3000 चौ. फुट मोजमापाचे कॉलम व स्लॅब, नरेश भोईर यांचे जिवदानी नगर येथील तळअधिक 1 मजल्यावरील कॉलम आणि हेमंत मांढरे यांचे दिवा दातिवली रोड येथील अंदाजे 4000 चौ. फुट मोजमापाचे प्लिंथ निष्कासित करण्यात आले. सदर कारवाई 1 पोकलेन, 3 गॅसकटर, 1 ट्रेलर, 80 कामगार, 13 पोलीस, 6 जीप, 3 जेसीबी व 4 टेम्पो आदी यंत्रसामुग्री व कामगारांच्या साहाय्याने करण्यात आली.

ऑफिसर ऑन ड्युटी

सदरची कारवाई अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त अशोक बुरपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सदर कारवाई दरम्यान दिवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त अलका खैरे, मुंब्रा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त सागर साळुंखे, कळवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त समीर जाधव व अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त फारुख शेख व अतिक्रमण विभागाकडील अधिकारी व कर्मचारी व पोलीस विभागाकडील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या:

Shrikant Shinde : भाजपच्या माजी नगरसेवकाकडून खासदार श्रीकांत शिंदेंना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा, बॅनरची सर्वत्र चर्चा

VIDEO: दाट धुक्यांमुळे लोकल पाऊण तास लेट, प्रवाशांचा खोळंबा; रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी

संजय राऊतांच्या व्याह्यांचा वानखेडेंना झटका, नवी मुंबईतील हॉटेलचा बार परवाना कायमचा रद्द

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.