ठाणे: पाण्याचे बिल थकविणाऱ्यांविरोधात ठाणे महापालिकेने (tmc) जोरदार मोहीम हाती घेतली आहे. ठाणे (thane) महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत 2021-22 या आर्थिक वर्षातील पाणी बिलाच्या वसुलीकरीता मोठ्या प्रमाणावर मोहीम राबविण्यांत येत आहे. नागरिकांनी मागील थकबाकीसह चालू वर्षाच्या पाणी बिलाची रक्कम मार्च अखेरपर्यंत भरणा करुन कठोर कारवाई टाळावी, असे आवाहन प्रशासक तथा महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा (dr. vipin sharma) यांनी केले आहे. दरम्यान, या वसुली मोहिमेंतर्गत आजपर्यंत एकूण 4010 नळ संयोजन खंडीत करण्यात आलेले असून 250 मोटार जप्त व 200 पंप रुम सील करण्यात आले आहेत. पाणी बिल न भरल्यास ही कारवाई अधिक कठोर करण्यात येणार असल्याचा इशाराही महापालिकेने दिला आहे.
ठाणे महापालिकेच्या या वसुली मोहिमेंतर्गत नळ संयोजन खंडीत करुन, पाणीपुरवठा बंद करणे, जप्तीची कारवाई करणे, पंप रुम सिल करणे, पंप जप्तीची कारवाई करणे इत्यादी प्रकारच्या कारवाई करण्यात येत आहे. आजपर्यंत एकूण 4010 नळ संयोजन खंडीत करण्यांत आलेले आहेत. तसेच 250 मोटार जप्ती, 200 पंप रुम सील करण्यात आले आहेत.
ठाणे महानगरपालिकेच्यावतीने पाणी बिलाच्या वसुलीची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. मार्च 2022 अखेरपर्यंत पाणी बिलाची रक्कम महापालिकेकडे जमा न करणाऱ्या नळ संयोजनधारक ग्राहकांवर कठोर कारवाई सुरुच राहणार आहे. नळ कनेक्शन खंडीत केल्यानंतर रक्कम न भरणा करता, परस्पर जोडून घेणाऱ्या ग्राहकांवर फौजदारी गुन्हे दाखल करून नळ संयोजन कायम स्वरुपी बंद करण्यात येईल. तसेच मालमत्ता जप्ती करणे, सील करणे अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी त्यांची पाणी बिलांची देयके तातडीने भरून महापालिकेस सहकार्य करावे व आपल्यावर होणारी कारवाई टाळावी, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
संबंधित बातम्या:
भाजपचा शिमगा रोज सुरू आहे, आम्ही शिमगा सुरू केला तर…; sanjay raut यांचा भाजपला इशारा
चार वर्षात पावणे दोन लाख किलो प्लास्टिक जप्त, 5 कोटींची वसुली; BMCची मोठी कारवाई