लॉज आणि हॉटेलचं अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त, ठाणे महापालिकेची धडाकेबाज कारवाई सुरुच

ठाणे महापालिकेची गेल्या काही दिवसांपासून अनधिकृत बांधकामांविरोधात धडक कारवाई सुरु आहे.

लॉज आणि हॉटेलचं अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त, ठाणे महापालिकेची धडाकेबाज कारवाई सुरुच
लॉज आणि हॉटेलचं अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त, ठाणे महापालिकेची धडाकेबाज कारवाई सुरुच
Follow us
| Updated on: Jul 26, 2021 | 9:38 PM

ठाणे : ठाणे महापालिकेची गेल्या काही दिवसांपासून अनधिकृत बांधकामांविरोधात धडक कारवाई सुरु आहे. महापालिकेने सोमवारी (26 जुलै) अनधिकृत बांधकाम करुन जमीन बळकावणाऱ्या लॉज आणि हॉटेल व्यवसायिकांना दणका दिला. महापालिकेने वर्तकनगर प्रभाग समितीमधील लॉज आणि हॉटेलच्या अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई करत संबंधित लॉज आणि हॉटेल जमीनदोस्त केले. ही कारवाई ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशान्वये करण्यात आली.

ठाण्यातील ‘या’ परिसरामध्ये कारवाई

ठाणे महापालिकेकडून सोमवारी (26 जुलै) वर्तकनगर प्रभाग समितीमधील उपवन येथील शुभम लॉज आणि येऊरमधील बॉम्बे डक हॉटेलचे अनधिकृत बांधकाम जेसीबीच्या साहाय्याने तोडण्यात आले. तसेच कळवा प्रभाग समितीमधील दत्तवाडी येथील शासकीय भूखंडावरील तळ अधिक 7 मजल्याच्या अनधिकृत इमारतीमधील आणि पारसिक नगर येथील तळ अधिक 8 मजल्याच्या अनधिकृत इमारतीतील अनधिकृत खोल्यांचे बांधकाम जेसीबी तसेच मजुरांच्या साहाय्याने तोडण्यात आले.

‘या’ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने कारवाई

संबंधित निष्कासनाची कारवाई अतिक्रमण नियंत्रण आणि निष्कासन विभागाच्या उप आयुक्त अश्विनी वाघमळे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निष्कासनचे सहाय्यक आयुक्त फारुख शेख, सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे आणि प्रणाली घोंगे यांनी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या साहाय्याने करण्यात आली.

दिवा-कळवा प्रभाग समितीतील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त

ठाणे महापालिकेने दोन दिवसांपूर्वी म्हणजे 24 जुलैला दिवा प्रभाग समितीमधील अली खान यांचे 60 ×90 मापाचे अनधिकृत बांधकाम जेसीबीच्या साहाय्याने तोडले होते. तसेच कळवा प्रभाग समितीमधील खारेगाव येथील सुमारे 2000 चौरस फुटाचे 36 कॉलमचे बांधकाम तसेच तळ अधिक 6 मजली इमारतीचे अनधिकृत बांधकाम जेसीबी तसेच मजुरांच्या साहाय्याने जमीनदोस्त केलं होतं.

दिवा, वर्तक नगरमधील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त

ठाणे महापालिकेच्या वतीने गेल्या काही दिवसांपासून प्रभाग समितीनिहाय अनधिकृत बांधकामांवर कारवाईची धडक मोहीम सुरु आहे. याचदरम्यान 3 जुलैला दिवा प्रभाग समिती व वर्तकनगर प्रभाग समितीमधील वाढीव अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. सदरची कारवाई ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशान्वये करण्यात आली.

या कारवाईतंर्गत दिवा प्रभाग समिती येथील मुंब्रादेवी कॉलनी येथील 3 मजली इमारतीतील 4 थ्या मजल्याचे वाढीव अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. तसेच वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रांतर्गत पोखरण रोड क्र. 1, उपवन इंडस्ट्रीज प्लॉट न. 206 येथील रवी अच्युत पुजारी यांच्या 32 × 52 चौ. फूट मोजमाप असलेल्या जागेवर विटांची भिंत व लोखंडी अँगलची उभारणी करून अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. सदरचे बांधकाम आज जेसीबी मशीनच्या साहाय्याने निष्कासित करण्यात आले.

हेही वाचा : 

मुसळधार पावसाने उद्ध्वस्त केलं, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ठाणे महापालिका धावली, प्रत्यक्ष मदतीला सुरुवात

ठाणे महापालिकेची धडक कारवाई, दिवा-कळवा प्रभाग समितीतील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.