दीड दिवसांच्या बाप्पाला आज निरोप, ठाण्यात मोठा बंदोबस्त; भक्तांना अँटिजेन टेस्ट बंधनकारक

दीड दिवस बाप्पांची पूजाअर्चा केल्यानंतर आज अखेर बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. दीड दिवसांच्या बाप्पाचं आज विसर्जन होणार असल्याने मुंबईसह ठाण्यात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. (today First Day Of Ganpati Idol Immersion in thane)

दीड दिवसांच्या बाप्पाला आज निरोप, ठाण्यात मोठा बंदोबस्त; भक्तांना अँटिजेन टेस्ट बंधनकारक
Ganpati Idol Immersion
Follow us
| Updated on: Sep 11, 2021 | 10:18 AM

ठाणे: दीड दिवस बाप्पांची पूजाअर्चा केल्यानंतर आज अखेर बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. दीड दिवसांच्या बाप्पाचं आज विसर्जन होणार असल्याने मुंबईसह ठाण्यात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ठाण्यात तर विसर्जनासाठी येणाऱ्या भक्तांना अँटिजेन टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे. (today First Day Of Ganpati Idol Immersion in thane)

विघ्नहर्त्या गणरायाचं काल राज्यात आगमन झालं. वाजतगाजत आणि जयघोष करत बाप्पांचं स्वागत करण्यात आलं. त्यानंतर विधीवत पूजाअर्चा करत बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना केली. आज दीड दिवसांच्या बाप्पांचं आज विसर्जन होत आहे. त्यासाठी ठाणे आणि मुंबई सज्ज झाली आहे.

4 हजार पोलीस तैनात

ठाण्यात बाप्पाच्या स्वागतासाठी 4 हजार पोलिस तैनात ठेवण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गणेशोत्सवातील शांततेसाठी 200 पेक्षा अधिक उपद्रवी व्यक्तींना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ठाण्यात एक लाख 41 हजार 20 घरगुती तर 1 हजार 58 सार्वजनिक बाप्पांचे ठाण्यात विराजमान होणार आहे.

ऑनलाईन बुकींग आणि विसर्जन व्यवस्था

गणेश विसर्जन करताना कोरोना नियमांचे पालन व्हावे म्हणून ठाणे महापालिकेच्या डिजीठाणे प्रणालीद्वारे यावर्षीही ऑनलाईन गणेश विसर्जन टाईमस्लॅाट बुकिंग सुविधा सुरू केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जनाच्यावेळी गर्दी होवू नये यासाठी ठाणे महानगरपालिका क्षेत्रात गणेशमूर्ती विसर्जनासाठी डिजीठाणे प्रणाली मार्फत ऑनलाईन टाइमस्लॉट बुकिंग सुविधा 1 सप्टेंबर पासून सुरू करण्यात आली आहे. यावर्षी गणेश विसर्जनासाठी ठाणे महानगरपालिकेकडून एकूण 40 स्थाने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यामध्ये 7 घाट, 13 कृत्रिम तलाव आणि 20 स्वीकृती केंद्रांचा समावेश आहे. डिजीठाणे प्रणालीद्वारे मूर्ती विसर्जन करण्यासाठी ऑनलाईन टाईमस्लॉट बुकिंग सुविधा 13 कृत्रिम तलाव आणि 20 स्वीकृती केंद्रांवर उपलब्ध असणार आहे. सदर ठिकाणी श्रींचे विसर्जन करण्यासाठी डिजीठाणे प्रणाली मार्फत तयार केल्या गेलेल्या www.ganeshvisarjan.covidthane.org या संकेतस्थळावर विसर्जनाचा टाइमस्लॉट बुक करावा.

रिसीट दाखवावी लागणार

ठाणेकरांनी www.ganeshvisarjan.covidthane.org या लिंकवर जाऊन आपल्या प्रभागातील कृत्रीम तलावांची किंवा मुर्ती स्वीकृती केंद्रांची यादी बघून गणेश मूर्ती विसर्जनासाठी आपल्या जवळच्या विसर्जन स्थळाचे टाइमस्लॉट बुक करावे. नागरिकांनी बुकिंग झाल्यानंतर एसएमएसद्वारे आलेली क्यूआर कोड रिसिट डाऊनलोड करून ठेवावी तसेच कोडची प्रिंट अथवा मोबाईलमधील कोड विसर्जन स्थळी असणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दाखवून श्रींचे रीतसर विसर्जन करावे. या संबधी काही तांत्रिक अडचण असल्यास 9819170170 या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच सर्व गणेश भक्तांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने दिलेल्या सुचनांचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. (today First Day Of Ganpati Idol Immersion in thane)

संबंधित बातम्या:

Ganesh Chaturthi 2021 | ना ढोलताशांचा दणदणाट, ना गुलालांची उधळण; कोरोना नियमांचं पालन करत गणरायाचं उत्साहात आगमन

Ganesh Chaturthi 2021 | गणेश चतुर्थी आज, जाणून घ्या गणपती स्थापनेचा शुभ मुहूर्त

Ganesh Chaturthi 2021 | महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणपती बाप्पाचं आज आगमन, भाविकांमध्ये मोठा उत्साह

(today First Day Of Ganpati Idol Immersion in thane)

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.