Kalyan Crime : हरियाणातून विमानाने आले अन् कल्याणमध्ये एटीएम फोडून पळाले; कोळसेवाडी पोलिसांकडून दोघांना बेड्या

हरियाणामधील या टोळीचे पाच सदस्य चोरी करण्याआधी हरियाणाहून मुंबई येथे विमानाने आले. इंटरनेट कॉलच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते. त्यांनी अटक आरोपींना चोरीबाबत माहिती देत चोरी केल्यानंतर दोघांकडून पैसे घेवून ते पुन्हा विमानाने पळून गेले.

Kalyan Crime : हरियाणातून विमानाने आले अन् कल्याणमध्ये एटीएम फोडून पळाले; कोळसेवाडी पोलिसांकडून दोघांना बेड्या
उदयपूर हत्याकांडानंतर प्रशासन सतर्क
Follow us
| Updated on: Jun 24, 2022 | 9:39 PM

कल्याण : बँकेचे एटीएम (ATM) गॅस कटरच्या सहाय्याने फोडून सुमारे 27 लाखांची रोकड लंपास करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी पर्दाफाश केलाय. अवघ्या 48 तासांत पोलिसांनी या टोळीमधील दोन आरोपींना अटक (Arrest) केली आहे. सरफुद्दीन खान, उमेश प्रजापती अशी अटक आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून 2 लाखांची रोकड व चार गाड्या जप्त केल्या आहेत. विशेष म्हणजे हे चोरटे चोरीसाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करायचे. सीसीटीव्ही (CCTV) फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले असून उर्वरित फरार पाच जणांचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान याच टोळीने खारघर येथील एटीएम अशाच पद्धती फोडून चोरी केल्याचं निष्पन्न झाले आहे.

एटीएममधील 27 लाखांची रोकड लंपास

हरियाणामधील या टोळीचे पाच सदस्य चोरी करण्याआधी हरियाणाहून मुंबई येथे विमानाने आले. इंटरनेट कॉलच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते. त्यांनी अटक आरोपींना चोरीबाबत माहिती देत चोरी केल्यानंतर दोघांकडून पैसे घेवून ते पुन्हा विमानाने पळून गेले. कल्याण पूर्वेतील म्हसोबा चौकात असलेल्या बँक ऑफ इंडियाची दोन एटीएम आहेत. रविवारी पहाटेच्या सुमारास काही चोरट्यांनी एटीएम मशीन गॅस कटरने फोडून एटीएममधील 27 लाखांची रोकड लंपास केल्याची घटना घडली. यावेळी चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरावार स्प्रे मारत चोरी केली. या घटनेमुळे पोलिसही चक्रावले होते. कोळशेवाडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत चोरट्यांचा शोध सुरू केला. या चोरट्यांचा शोध घेण्यासाठी सात पथके तयार करण्यात आली. तपासादरम्यान ही सात जणांची टोळी असल्याचे निष्पन्न झाले. यामधील दोन आरोपी निष्पन्न करत ते कल्याण शिळफाटा परिसरात असल्याची माहिती मिळाली.

अटक आरोपींकडून 2 लाखांच्या रोकडसह चार गाड्या हस्तगत

या माहितीचा आधारे पोलिसांनी उमेश प्रजापती, सरफुद्दीन खान या दोन चोरट्यांना सापळा रचत शिळफाटा परिसरातून अटक केली. तर त्यांच्या तपासा दरम्यान त्याच्या इतर पाच साथीदारांनी नावे उघड झाली. हे पाचही जण हरियाणा राज्यातील असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी या पाच जणांचा शोध सुरू केला. पोलिसांनी अटक आरोपींकडून पोलिसांनी 2 लाखांची रोकड व चार गाड्या हस्तगत केल्या आहेत. तसेच त्यांनी नवी मुंबई खारघर येथील एका एटीएममध्ये अशाच प्रकारे चोरी केल्याचे उघड झाले आहे. ही आंतरराज्य टोळी असून त्यांनी महाराष्ट्रासह इतर राज्यात देखील अशा प्रकारे चोरी केली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय.

हे सुद्धा वाचा

कल्याणात चोरी करण्यापूर्वी उमेश, सरफुद्दीनला एटीएममध्ये चोरी कशी करायची, एटीएम फोडण्यासाठी कोणत्या हत्यार आणि तंत्राचा वापर करायचा ? याची माहिती देण्यासाठी हरियाणा येथून पाच जण हरियाणा येथून विमानाने मुंबईत आले. तेथून ते लोकलने कल्याणला पोहोचले. त्यांनी सरफुद्दीन आणि उमेशला एटीएम फोडण्यासाठी झटपट तंत्राची माहिती दिली. बँक ऑफ इंडियाच्या एका खोलीतील दोन एटीएम फोडून सहा जणांनी 27 लाख रुपयांची रक्कम एटीएममधून चोरली. काही रक्कम उमेश व सरफुद्दीन यांना देऊन उर्वरित रक्कम घेऊन पाच चोर पुन्हा विमानाने हरियाणाला रवाना झाले. (Two ATMs of Bank of India were broken into and Rs 27 lakh was stolen in Kalyan)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.