अनर्थ टळला ! धोबीघाट परिसरात टेकडीची माती खचल्यामुळे रिकामी केलेली 2 घरं कोसळली, जीवितहानी नाही

मुसळधार पावसामुळे टेकडीची माती खचून दोन घरं कोसळल्याची घटना उल्हासनगरच्या धोबीघाट परिसरात घडली आहे.

अनर्थ टळला ! धोबीघाट परिसरात टेकडीची माती खचल्यामुळे रिकामी केलेली 2 घरं कोसळली, जीवितहानी नाही
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Jul 22, 2021 | 12:06 AM

ठाणे : मुसळधार पावसामुळे टेकडीची माती खचून दोन घरं कोसळल्याची घटना उल्हासनगरच्या धोबीघाट परिसरात घडली आहे. सुदैवानं ही दोन्ही घरं आधीच रिकामी केलेली असल्याने या घटनेत जीवितहानी झालेली नाही. (Two houses collapsed in Dhobighat area of Ulhasnagar due to heavy rains )

घरं आधीच रिकामी केल्यामुळे जीवितहानी नाही

मिळालेल्या माहितीनुसार उल्हासनगरच्या कॅम्प 2 मधील धोबीघाट परिसरात टेकडीवर दाटीवाटीने घरं बांधण्यात आली आहेत. मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी दुपारच्या सुमारास या टेकडीची माती खचली आणि रात्री आठच्या सुमारास या भागातली दोन घरं कोसळली. सुदैवानं रहिवाशांच्या ही बाब आधीच लक्षात आलेली असल्यामुळे त्यांनी घरं रिकामी केली होती. त्यामुळे घरं कोसळून कुठलीही जीवितहानी झाली नाही.

टेकडीला रिटर्निंग वॉल बांधावी, अशी नागरिकांची मागणी

मुसळधार पावसामुळे डोंगरावरील माती खचण्याच्या घटना याआधीही अनेकदा घडल्या आहेत. त्यामुळे धोबी घाट परिसरातील या टेकडीला रिटर्निंग वॉल बांधावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिकांकडून केली जातेय. मात्र उल्हासनगर महानगरपालिका प्रशासनाकडून या मागणीकडे दुर्लक्ष केलं जातंय.

घरं रिकामी  न केल्यास तुम्हीच जबाबदार

सोमवारी टेकडीवरील दोन घरं कोसळल्यानंतर उल्हासनगर महानगरपालिकेनं मंगळवारी आणि बुधवारी या भागातील रहिवाशांना घरं रिकामी करण्याच्या नोटिसा बजावल्या. तसंच घरं रिकामी न केल्यास कुठलीही दुर्घटना घडली, तर त्याला आपणच जबाबदार असाल, असं म्हणत हात वर केले. महानगरपालिकेनं या रहिवाशांची व्यवस्था जवळच्याच एका शाळेत करण्याची तयारी दर्शवली होती.

पालिकेने नागरिकांच्या मागणीला गांभिर्याने घ्यावं

मात्र राहती घरं सोडून मुलाबाळांसह शाळेत स्थलांतरित होण्यास रहिवाशांचा विरोध आहे. आम्हाला रिटर्निंग वॉल बांधून द्या. अन्यथा आमच्या पर्यायी निवासाची व्यवस्था करा, अशी मागणी या रहिवाशांकडून केली जातेय. याकडे उल्हासनगर महानगरपालिकेने गांभीर्याने लक्ष द्यावं, अशी मागणी मनसेचे उपशहर अध्यक्ष मैनुद्दीन शेख यांनी केली आहे.

या समस्येकडे वेळीच लक्ष न दिल्यास एखादी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे उल्हासनगर महानगरपालिका फक्त नोटीस देऊन सोपस्कार पूर्ण करते? की या नागरिकांचं स्थलांतर करून टेकडीला भिंत बांधून प्रश्न मार्गी लावते, हे पाहणे आता महत्त्वाचं ठरणार आहे.

इतर बातम्या :

मोठी बातमी ! कसारा घाटात दरड कोसळली, रेल्वे आणि रस्ते दोन्ही मार्गाची वाहतूक रखडली

Mumbai Rains Live Update | जगबुडी नदीने ओलांडली इशारा पातळी, प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

आश्चर्यम ! गावात एकाच विहिरीतून यायला लागलं गरम पाणी, अचानकपणे घडलेल्या प्रकारामुळे तर्कवितर्कांना उधाण

(Two houses collapsed in Dhobighat area of Ulhasnagar due to heavy rains )

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.