19 वर्षीय तरुणाचा राग, सोसायटीच्या दोन सुरक्षा रक्षकांनी पोटात चाकू खुपसला, मीरा भाईंदर हादरलं !

| Updated on: May 29, 2021 | 4:11 PM

मीरा भाईंदर शहर आज एका घटनेमुळे हादरलं आहे. सोसायटीचं रक्षण करणाऱ्या दोन सुरक्षा रक्षकांनीच सोसायटीत राहणाऱ्या एका 19 वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या केली आहे (two security guards killed 19 year old youth in Mira bhayander)

19 वर्षीय तरुणाचा राग, सोसायटीच्या दोन सुरक्षा रक्षकांनी पोटात चाकू खुपसला, मीरा भाईंदर हादरलं !
मृतक अभिषेक सिंग
Follow us on

मीरा भाईंदर (ठाणे) : मीरा भाईंदर शहर आज एका घटनेमुळे हादरलं आहे. सोसायटीचं रक्षण करणाऱ्या दोन सुरक्षा रक्षकांनीच सोसायटीत राहणाऱ्या एका 19 वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या केली आहे. आरोपी सुरक्षा रक्षक सध्या फरार आहेत. त्यांचा शोध पोलिसांकडून सुरु आहे. पण या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मुलाचं वय अवघं 19 वर्षे असताना सुरक्षा रक्षकांनी त्याला समजून घेणं जास्त आवश्यक होतं. त्यांनी मुलाची तक्रार त्याच्या कुटुंबियांना, सोसायटीतील ज्येष्ठांना किंवा कमिटीला करायला हवी होती, अशी प्रतिक्रिया परिसरातील आजूबाजूच्या नागरिकांकडून देण्यात येत आहे (two security guards killed 19 year old youth in Mira bhayander).

संबंधित घटना ही मीरा रोडच्या सृष्टी सेक्टर 1 मध्ये घडली. मृत मुलाचे अभिषेक सिंग असं नाव असून तो 19 वर्षांचा होता. अभिषेक आपल्या कुटुंबासह सोसायटीत एका फ्लॅटमध्ये राहायचा. आई-वडील, एक मोठी बहीण आणि तो असं त्यांचं चार जणांचं कुटुंब होतं. सिंग दाम्पत्यासाठी अभिषेक हा एकुलता एक मुलगा असल्याने त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तसेच सोसायटीतील इतर नागरिकांकडूनही हळहळ व्यक्त केली जात आहे (two security guards killed 19 year old youth in Mira bhayander).

नेमकं काय घडलं?

मृतक अभिषेत सिंग याचं याआधी देखील सोसायटीतील सुरक्षा रक्षक आरोपी सुभाष पांडे आणि अजित तिवारी यांच्यासोबत वाद झाला होता. त्यांची आधीपासूनच एकमेकांवर खुन्नस होती. याच पूर्ववैमस्यातून आरोपींनी अभिषेक याच्यासोबत हाणामारी केल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित घटना शुक्रवारी (28 मे) रात्री उशिरा साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. सोसायटी परिसरात अभिषेक आणि दोन्ही आरोपींमध्ये आधी बाचाबाची झाली. त्यानंतर आरोपींनी अभिषेक याला मारहाण करण्यास सुरुवात केली.

या मारहाणीदरम्यान आरोपींनी अभिषेकच्या पोटात चाकू खुपसला. अभिषेकला रक्तबंबाळ झालेलं बघून दोघी सुरक्षा रक्षक सावध झाले. त्यांनी तातडीने घटनास्थळावरुन धूम ठोकली. त्यानंतर सोसायटीतील नागरिकांनी आणि अभिषेकच्या कुटुंबियांनी त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केलं. मात्र, तोपर्यंत त्याचं बरंच रक्त वाया गेलं होतं. अखेर आज सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास अभिषेकची मृत्यूशी सुरु असलेली झुंज संपली आणि त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे सिंग कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

आरोपींविरोधात गुन्हा दाखल 

संबंधित घटनेबाबत काशी मीरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी सर्व घटनाक्रम जाणून गेऊन आरोपी दोन्ही सुरक्षा रक्षकांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत आहेत.

सुरक्षा रक्षक ठेवताना काय काळजी घ्यावी?

सोसायटीत सुरक्षा रक्षक ठेवताना ती व्यक्ती संयमी आणि हुशार आहे का, याची शाहनिशा करणं जास्त जरुरीचं आहे, हे या घटनेतून समोर आलं आहे. काही ठिकाणी सेमी गव्हर्मेंट सुरक्षा रक्षक बोर्डातील सुरक्षा रक्षक असतात. त्यांची परीक्षा घेऊनच त्यांना नोकरी देण्यात आलेली असते. तसेच त्यांना कोणत्या परिस्थितीचा कसा सामना करावा, याचं योग्य प्रशिक्षण देण्यात आलेलं असतं. मात्र, काही खासगी सुरक्षा रक्षक पुरवणाऱ्या संस्थांच्या सुरक्षा रक्षकांबाबत याबाबत अनेकांच्या मनात साशंकता असते. त्यामुळे सोसायटीत सुरक्षा रक्षक ठेवताना ती व्यक्ती त्या कामासाठी सक्षम आहे की नाही? याची खातरजमा करणं जास्त जरुरीचं आहे.

संबंधित बातम्या :

मुंबईतील कुख्यात गुंडांच्या टोळीचा वंचित आघाडीशी संबंध? मुख्य गुंड जेरबंद, त्याच्या पत्नीचा पळून जाण्याचा प्रयत्न