Kalyan Crime : शहाड रेल्वे स्थानकात चाकूच्या धाक दाखवून प्रवाशाला लुटणारे दोन चोरटे अटकेत

रोहित जाधव यांनी त्यांच्या होमगार्ड साथीदार गोंधळी सोबत त्या चोरट्यांचा पाठलाग केला. एक चोरटा पळून गेला. दुसरा चोरटा भिंतीवरुन उडी मारत असताना रोहित जाधव यांच्या हाती लागला. यावेळी चोरट्याने रोहित यांच्या तावडीतून सुटण्यासाठी प्रयत्न केले. या दोघांमध्ये काही वेळ झटापट झाली. अखेरीस होमगार्डच्या मदतीने रोहित जाधव यांनी चोरट्याच्या मुसक्या आवळल्या.

Kalyan Crime : शहाड रेल्वे स्थानकात चाकूच्या धाक दाखवून प्रवाशाला लुटणारे दोन चोरटे अटकेत
शहाड रेल्वे स्थानकात चाकूच्या धाक दाखवून प्रवाशाला लुटणारे दोन चोरटे अटकेत
Follow us
| Updated on: Jan 31, 2022 | 5:36 PM

कल्याण : शहाड रेल्वे स्थानकात लोकलच्या प्रतिक्षेत उभ्या असलेल्या एका प्रवाशाला चाकूचा धाक दाखवत लुटणाऱ्या दोन सराईत गु्न्हेगारांना रेल्वे पोलीस(Railway Police) कर्मचाऱ्याने पाठलाग करुन पकडले. या धाडसी पोलीस कर्मचाऱ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. राम राऊत या प्रवाशाला चाकूचा धाक दाखवून दोन चोरट्यांनी त्यांच्याकडील रोख रक्कम लुटली. प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेल्या अन्य प्रवाशांनी ही बाब रोहित जाधव(Rohit Jadhav) यांना सांगितली. जाधव यांनी आपल्या होमगार्ड साथीदाराला सोबत घेऊन रोकड घेऊन पळणाऱ्या चोरट्यांचा पाठलाग केला. यावेळी एक चोरटा पळून जाण्यास यशस्वी झाला तर एकाच्या जाधव यांनी मुसक्या आवळल्या. आदिल शेख असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. (Two thieves arrested for robbing a passenger at Shahad railway station)

चाकूचा धाक दाखवून प्रवाशाला लुटले

कल्याण तालुक्यातील खडवली येथे राहणारे राम राऊत (50) हे गृहस्थ अंबरनाथमधील एका खाजगी कंपनीत कामाला आहेत. रात्री अंबरनाथहून कामावरुन सुटल्यानंतर राम हे शहाड रेल्वे स्थानकात पोहचले. साडे नऊ वाजण्याच्या सुमारास राऊत फलाट क्रमांक 2 वर रेल्वे गाड्याच्या प्रतिक्षेत उभे होते. रेल्वे स्थानकातील कसारा एंडला उभे असताना दोन तरुण त्यांच्याजवळ आले आणि त्यांच्याकडे असलेल्या वस्तू हिसकाविण्याचा प्रयत्न केला. राम यांनी थोडाफार प्रतिकार केला. मात्र या दोन्ही चोरट्यांनी त्यांना चाकूचा धाक दाखवित त्यांच्याजवळ असलेली रोकड हिसकावून घेतली. याच दरम्यान काही प्रवाशांनी हा प्रकार पाहिला. त्यांनी रेल्वे स्थानकातील पोलीस ड्युटीवर तैनात असलेले पोलीस कर्मचारी रोहित जाधव यांना सांगितले. हे ऐकताच रोहित जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र दोन्ही चोरटे पळून जात होते.

पोलीस कर्मचारी रोहित जाधव यांच्या धाडसाचं कौतुक

रोहित जाधव यांनी त्यांच्या होमगार्ड साथीदार गोंधळी सोबत त्या चोरट्यांचा पाठलाग केला. एक चोरटा पळून गेला. दुसरा चोरटा भिंतीवरुन उडी मारत असताना रोहित जाधव यांच्या हाती लागला. यावेळी चोरट्याने रोहित यांच्या तावडीतून सुटण्यासाठी प्रयत्न केले. या दोघांमध्ये काही वेळ झटापट झाली. अखेरीस होमगार्डच्या मदतीने रोहित जाधव यांनी चोरट्याच्या मुसक्या आवळल्या. या चोरट्याचे नाव आदिल शेख असे आहे. आदिलला घेऊन जाधव कल्याण रेल्वे स्थानकात पोहचले. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाल्मिक शारदूल यांनी दुसऱ्या चोरट्याच्या शोधाकरीता एक पथक तयार केले आणि विवेक पाटील नावाच्या दुसऱ्या चोरट्याला अटक केली. हे दोघेही जण सराईत गुन्हेगार आहेत. रेल्वेत या दोघांवर प्रत्येकी चार गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, रोहित जाधव यांनी धाडस दाखवून अंधारात चोरट्याला जेरबंद केल्याप्रकरणी सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे. (Two thieves arrested for robbing a passenger at Shahad railway station)

इतर बातम्या

शेतकऱ्याच्या हातातली दीड लाखांची बॅग हातोहात पळवली, औरंगाबादच्या गंगापूरात भीतीचे वातावरण

अकरावीतील विद्यार्थिनीला हॉटेलवर बोलावलं, गुंगीचं औषध पाजून 22 वर्षीय तरुणाकडून बलात्कार

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.