Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘हिंमत असेल पोलीस बाजूला ठेवून समोर या’, ठाकरेंनी मुंब्र्यातून शिंदे गटाला डिवचलं

"या खोकेश्वरांनी आमच्या जागेवर खोका आणून ठेवलाय. अतिक्रमण केलंय. तो खोका आमच्या जागेवरुन लवकर उचला. नाहीतर आम्ही तिथे येवून फेकून दिल्याशिवाय राहणार नाहीत. तिथे शाखा भरल्याशिवाय राहणार नाही. तुमच्यात हिंमत असेल तर पोलीस बाजूला ठेवून समोर या", असं चॅलेंज उद्धव ठाकरेंनी दिलं.

'हिंमत असेल पोलीस बाजूला ठेवून समोर या', ठाकरेंनी मुंब्र्यातून शिंदे गटाला डिवचलं
Follow us
| Updated on: Nov 11, 2023 | 6:57 PM

ठाणे | 11 नोव्हेंबर 2023 : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे मुंब्र्यात पाडलेल्या शिवसेना शाखेच्या पाहणीसाठी गेले. उद्धव ठाकरे यांनी मुंब्र्यात येऊ नये यासाठी पोलिसांनी त्यांना नोटीस पाठवली होती. तसेच संबंधित शाखेच्या परिसरात शिंदे गटाचे कार्यकर्तेदेखील जमलेले होते. त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी उद्धव ठाकरेंना सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर बॅरिकेट्सच्या पुढे जावून शाखा पाडलेल्या परिसराची पाहणी करण्यास मज्जाव केला. उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना प्रचंड विनंती केली. पण पोलिसांनी सुरक्षेचं कारण देत त्यांना बॅरिकेट्सच्या पुढे जाऊ दिलं नाही. अखेर लांबूनच शाखेची पाहणी करुन उद्धव ठाकरेंना परत फिरावं लागलं. त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे गटाला डिवचलं.

“ज्यांना सत्तेचा माज आलेला आहे त्यांनी बुलडोजर लावून शिवसेनेची शाखा पाडली. त्यांना खरा बुलडोजर काय असतो तो घेऊन मी मुंब्र्याच्या रस्त्यावर आलेलो आहे. मी त्यांना एवढचं सांगतो, मला आज सकाळी कळलं की, आपले पोस्टर्स फाडले. निवडणुका येऊ दे, मग आम्ही तुमची मस्ती फाडतो. मी पोलिसांना धन्यवाद देतो. त्यांनी शाखाचोरांचं रक्षण केलंय शाखेच्या मालकापासून, हा संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय की, प्रशासन किती हतबल झालंय. आज काही घडलं असतं तर महाराष्ट्राची आब्रू गेली असती. पण महाराष्ट्राची आब्रू या चोरांनी जे सत्तेची गादी भोगत आहेत त्यांनी आधीच घालवलेली आहे”, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.

‘तुमच्यात हिंमत असेल तर…’

“मी तुम्हाला सर्वांना विचारतोय. मी आल्यानंतर सर्वजण घोषणा देताय. तुम्ही पुढे चला आम्ही तुमच्यासोबत आहोत. तुम्ही खरंच मला साथ देणार ना? लढा लढण्याची हिंमत तुमच्या आहे ना? या खोकेश्वरांनी आमच्या जागेवर खोका आणून ठेवलाय. अतिक्रमण केलंय. तो खोका आमच्या जागेवरुन लवकर उचला. नाहीतर आम्ही तिथे येवून फेकून दिल्याशिवाय राहणार नाहीत. तिथे शाखा भरल्याशिवाय राहणार नाही. तुमच्यात हिंमत असेल तर पोलीस बाजूला ठेवून समोर या”, असं चॅलेंज उद्धव ठाकरेंनी दिलं. आपल्याकडे मुंब्र्यातील शाखेचे कागदपत्रे आहेत, असं ठाकरे यावेळी म्हणाले.

‘माझ्या केसाला जरी धक्का लागला तर…’

“तुम्ही दिल्लीच्या कृपेने सत्तेवर बसलेले आहात. बाहुल्यांनी तुमच्यात हिंमत नाही. मर्दाची औलाद असाल तर पोलीस बाजूला ठेवून भिडा. बघू कोणात हिंमत आहे. माझ्या केसाला जरी धक्का लागला तर यांचे केस तमाम महाराष्ट्र उपटल्याशिवाय राहणार नाही”, असं ठाकरे म्हणाले.

‘गद्दारांचं डिपॉझिट जप्त करुन घरी पाठवायला पाहिजे’

“मी आज खूप वर्षांनी मुंब्र्यात आलोय. आपली आजपर्यंत तशी दोस्ती झाली नव्हती. एक गैरसमज होता, पण अडीच वर्षाचं सरकार तुम्ही पाहिलं. आता जे होतंय ते तुम्हाला मान्य आहे का? फक्त तुम्हीच नाही, आपल्या लहान मुलांचं भविष्य यांच्याकडे सुपूर्द कराल का? गद्दारांचं डिपॉझिट जप्त करुन घरी पाठवायला पाहिजे. यांचं राजकीय आयुष्य किती राहिलंय? काही दिवस राहिले आहेत. त्यांना कोणीही थारा द्यायचा नाही”, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं.

'त्यांना सांगायचं दादांना...', अजित पवार एसपी कॉवत यांच्यावर संतापले
'त्यांना सांगायचं दादांना...', अजित पवार एसपी कॉवत यांच्यावर संतापले.
कळंबच्या त्या महिलेच्या हत्येनंतर 'तो' दोन दिवस मृतदेहासोबत झोपला अन्
कळंबच्या त्या महिलेच्या हत्येनंतर 'तो' दोन दिवस मृतदेहासोबत झोपला अन्.
आधे इधर, आधे उधर... बीडमध्ये वाल्मिक कराडवर मेहरनजर?
आधे इधर, आधे उधर... बीडमध्ये वाल्मिक कराडवर मेहरनजर?.
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.