भिवंडीत कॉलेजमध्ये पाऊल ठेवताच विद्यार्थ्यांना लस टोचल्या; महापालिकेची लसीकरण मोहीम जोरात

राज्यात तब्बल दीड वर्षानंतर महाविद्यालये सुरू झाली आहेत. मित्र-मैत्रिणींना भेटता येईल म्हणून सर्वच विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात हजेरी लावली. (vaccination drive in in bhiwandi college)

भिवंडीत कॉलेजमध्ये पाऊल ठेवताच विद्यार्थ्यांना लस टोचल्या; महापालिकेची लसीकरण मोहीम जोरात
college students
Follow us
| Updated on: Oct 20, 2021 | 2:21 PM

भिवंडी: राज्यात तब्बल दीड वर्षानंतर महाविद्यालये सुरू झाली आहेत. मित्र-मैत्रिणींना भेटता येईल म्हणून सर्वच विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात हजेरी लावली. मात्र, भिवंडीतील एका महाविद्यालयात लसीकरण न झालेल्या विद्यार्थ्यांना लस टोचण्यात आली. महाविद्यालयाच्या पहिल्याच दिवशी लस टोचावी लागल्याने अनेकांना आश्चर्यही वाटलं. मात्र, या लसीकरण मोहिमेत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात भागही घेतला.

कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरू लागला तसे सर्व व्यवहार सुरळीत होत असतानाच महाविद्यालय शाळा सुरू करण्याबाबत राज्य शासनाकडून निर्णय घेण्यात आला. त्यानुसार महाविद्यालय सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यांचे लसीकरण करणे गरजेचे असल्याने भिवंडीत स्वयं सिद्धी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आली. महानगरपालिका वैद्यकीय विभागातर्फे या महाविद्यालयात मोफत लसीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कॉलेजच्या पहिल्याच दिवशी रांगेशिवाय लस मिळत असल्याने शेकडो विद्यार्थ्यांनी लसीकरणाचा लाभ घेतला.

ठाण्यातही लसीकरण

कोरोनाच्या संख्येत घट झाल्या नंतर तब्बल दीड वर्षानंतर महाविद्यालय सुरू झाली आहेत. सर्व विद्यार्थ्यांची स्क्रिनिंग, तापमान तपासणी, मास्क, सॅनिटाझर आणि दोन डोस पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश दिला जात आहे. विद्यार्त्यांकडून अंडर टेकिंग फॉर्म देखील भरून घेतले जात आहेत. शिवाय वर्गात 50 टक्के क्षमतेने विद्यार्थी बसवण्यात आले आहे. तसेच काही ठाण्यात काही महाविद्यालयात तर थेट विद्यार्थ्यांना लस टोचली जात आहे.

टप्प्या टप्प्यानं कॉलेज सुरु करा: सामंत

जरी महाविद्यालयांना नियोजन करण्यासाठी किंवा महाविद्यालये सुरू करण्यासाठी वेळ मिळाला नसला तरी त्यांनी टप्प्याटप्प्याने महाविद्यालये सुरू करावे. आज आरोग्य विभाग संचालिका अर्चना पाटील यांच्यासोबत सुद्धा एक बैठक आहे. यामध्ये कॅम्पस मध्ये लसीकरण कशा प्रकारे करावे याबाबत आम्ही चर्चा करत आहोत. जेणेकरून कॅम्पस मध्येच विद्यार्थ्यांना पहिला डोस दुसरा डोस देता येतील. ही मोठी मोहीम आम्ही पुढच्या आठवड्यात विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्याच्या विचारात आहोत, असं उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत म्हणाले.

कॉलेज जर 20 तारखेला सुरू झाले नाहीत तर त्यांच्यावरही कारवाई वगैरे काही करणार नाही. ही जबाबदारी विद्यापीठांवर दिली आहे, विद्यापीठाने सदरची नियमावली अंतिम केली आहे. विद्यार्थ्यांना विनंती आहे की जी नियमावली आखून दिली आहे त्याचं काटेकोरपणे पालन करावे. 20 तारखेला आज कॉलेजेस सुरू होत नसतील तर त्यांनी 21, 22 तारखेला कॉलेज सुरू करावेत. मात्र, 25 तारखेच्या आत हे कॉलेज सुरू केले पाहिजेत. काही त्रुटी असतील तर शासन सुद्धा त्याना मदत करेल, असं उदय सामंत म्हणाले.

संबंधित बातम्या:

HSC SSC exam result 2021: दहावी-बारावीचा पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर, इथे पाहा निकाल

दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकही शब्द शेतकऱ्यांबद्दल बोलले नाही, आर्यन खानसाठी कोर्टात जाणारा नेता उद्धव ठाकरेंवर बरसला!

देगलूरमध्ये भाजपला आघाडी द्या अन् गाव जेवण घ्या; चंद्रकांतदादांची कार्यकर्त्यांना खुली ऑफर

(vaccination drive in in bhiwandi college)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.