ठाणे मध्यवर्ती कारागृहातील 108 कैद्यांचे तर मेंटल हॉस्पिटलमधील 100 मनोरुग्णांचे लसीकरण पूर्ण
राज्यात कोरोनाची तिसरी लाट येऊ नये यासाठी प्रशासनाकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत (Vaccination of 108 prisoners of Thane Central Jail and 100 mentally ill in Mental Hospital completed)
ठाणे : राज्यात कोरोनाची तिसरी लाट येऊ नये यासाठी प्रशासनाकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर लसीकरण मोहिमेलाही गती देण्यात आली आहे. ठाण्यात दिव्यांगांपासून, परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण केलं जात आहे. तसेच ठाण्यातील मध्यवर्ती कारागृहात आणि मेंटल हॉस्पिटलमध्येही लसीकरणाची मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत कारागृहातील 100 पेक्षा जास्त कैदी तसेत मनोरुग्णांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली (Vaccination of 108 prisoners of Thane Central Jail and 100 mentally ill in Mental Hospital completed).
आधारकार्ड नसलेल्या कैद्यांचेही लसीकरण
ठाणे महापालिकेच्यावतीने लसीकरण मोहिमेंतर्गत 45 वर्षावरील स्वतःचे आधारकार्ड तसेच इतर कोणतेही ओळखपत्र नसलेले ठाणे मध्यवर्ती कारागृहातील कैदी तसेच मेंटल हॉस्पिटलममधील मनोरुग्ण लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी ठाणे महापालिकेच्यावतीने विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आली (Vaccination of 108 prisoners of Thane Central Jail and 100 mentally ill in Mental Hospital completed).
लसीकरण मोहिमेअंतर्गत 208 जणांचे लसीकरण
ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने विशेष लसीकरण मोहिमेंतर्गत ठाणे मध्यवर्ती कारागृहातील 108 कैद्यांना तसेच मेंटल हॉस्पिटलमधील 100 मनोरुग्णांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. या मोहिमेद्वारे जवळपास 208 जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली.
ठाण्यात 45 वर्षावरील दिव्यांगांना लसीकरणात प्राधान्य
लसीकरण केंद्रांवर दिव्यांगांची गैरसोय होवू नये तसेच त्यांचे प्राधान्याने लसीकरण व्हावे या उद्देशाने ठाणे महापालिका हद्दीत 45 वर्षावरील दिव्यांगांना लसीकरणात प्राधान्य देण्यात येत आहे. याबाबत महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी स्वत: 2 जून रोजी आदेश जारी केले होते. या निर्णयामुळे शहरातील ठाणे महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रांवर 45 वर्षांवरील स्तनदा माता आणि दिव्यांग बांधवांचे लसीकरण प्राधान्याने होणार आहे. संबंधितांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ठाणे पालिकेने केले आहे.
हेही वाचा : लोकहो, ठाणे जिल्ह्यातील कोणत्याही धबधबा, तलाव किंवा धरण परिसरात जाऊ नका, अन्यथा…..