काय चाललंय कल्याणमध्ये? ‘वंचित’च्या पदाधिकाऱ्याला कार्यकर्त्यांकडूनच कपडे फाटेपर्यंत मारहाण

वंचित बहुजन आघाडी पक्षात कल्याणमध्ये काय सुरु आहे? असा प्रश्न आता उपस्थित होतोय. कारण पक्षातील एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याला भर रस्त्यात कार्यकर्त्यांनी कपडे फाटेपर्यंत मारहाण केली आहे. पक्षाची दिशाभूल केल्याच्या गैरसमजातून वंचितच्या कार्यकर्त्याने संबंधित पदाधिकाऱ्याची कपडे फाटेपर्यंत मारहाण केली आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावरदेखील व्हायरल झाला आहे.

काय चाललंय कल्याणमध्ये? 'वंचित'च्या पदाधिकाऱ्याला कार्यकर्त्यांकडूनच  कपडे फाटेपर्यंत मारहाण
'वंचित'च्या पदाधिकाऱ्याला कार्यकर्त्यांकडूनच कपडे फाटेपर्यंत मारहाण
Follow us
| Updated on: May 17, 2024 | 3:44 PM

महाराष्ट्रात आता लोकसभा निवडणुकीचं शेवटचं पाचव्या टप्प्यातील मतदान येत्या 20 मे ला होणार आहे. राज्यातील एकूण 13 जागांसाठी या दिवशी मतदान होणार आहे. या मतदारसंघांमध्ये कल्याण मतदारसंघाचा देखील समावेश आहे. याच कल्याण मतदारसंघात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्याला वंचित बहुजन आघाडीच्याच कार्यकर्त्यांनी भर रस्त्यात अतिशय अमानुषपणे मारहाण केली आहे. यावेळी मारहाण करणाऱ्यांनी वंचितच्या पदाधिकाऱ्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ देखील केली आहे. पीडित पदाधिकारी आपण काहीच केलं नसून स्वत:ला सोडवण्यासाठी विनवणी करत होता. तसेच आपण मंत्रालयात कामाला असून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत काम केलं असल्याचं पीडित पदाधिकारी सांगत होता. पण कार्यकर्त्यांनी या पदाधिकाऱ्याला त्याचे कपडे फाटेपर्यंत मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रकाश आंबेडकर संबंधित व्हिडीओची गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई करतात का? ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

नेमकं प्रकरण काय?

कल्याणमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याने पक्षाच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. पक्षाची दिशाभूल केल्याच्या गैरसमजातून वंचितच्या कार्यकर्त्याने ही मारहाण केली आहे. वंचितच्या कार्यकर्त्याने पदाधिकारी मिलिंद कांबळे यांना मारहाण केली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिमेकडील रोनक सिटीमध्ये राहणारे वंचितचे पदाधिकारी मिलिंद कांबळे यांना वंचितने भिवंडी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देत एबी फॉर्म दिला होता. हा फॉर्म देण्याची जबाबदारी एका व्यक्तीला देण्यात आली. त्याचे नाव देखील मिलिंद कांबळे होते. मात्र नावात साम्य असल्याचा फायदा घेत मिलिंद कांबळे याने फॉर्म चोरून अर्ज दाखल केला. या प्रकरणी एबी फॉर्म चोरून फॉर्म भरणाऱ्या मिलिंद कांबळे विरोधात गुन्हा दाखल झाला होता.

याप्रकरणी भिवंडी पोलिसांचा तपास सुरू आहे. मात्र वंचितच्या कार्यकर्त्याने काल कल्याण रोनक सिटीमध्ये राहणाऱ्या मिलिंद कांबळे यांना गाठत जाब विचारला. त्यावेळी मिलिंद कांबळे यांनी आपल्यासोबत कशी फसवणूक झाल्याचे सांगितलं. मिलिंद कांबळे यांनी नाव सारखे असणाऱ्या व्यक्तीने कसे फसवले, हे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, वंचितच्या कार्यकर्त्याने तुम्ही देखील सहभागी आहात, असे सांगत त्यांना मारहाण केली. या कार्यकर्त्याने अक्षरशः भररस्त्यात कपडे फाटेपर्यंत मारहाण केली. याप्रकरणी कुठल्याच प्रकारचा गुन्हा दाखल झाला नाही. मात्र संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.