Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vasant More on Raj Thackeray: साहेबांना एक पायरी चढता येत नव्हती, वसंत मोरेंनी भरसभेत राज ठाकरेंच्या तब्येतीचाही वृत्तांत दिला, नेमकं काय झालंय?

Raj Thackeray Thane: मनसेवर नाराज असलेल्या मनसे नेते वसंत मोरेंची तोफ आज ठाण्यात धडाडली. पक्षाबाबतची तळमळ व्यक्त करतानाच त्यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी दिलेल्या ऑफरवरही भाष्य केलं.

Vasant More on Raj Thackeray: साहेबांना एक पायरी चढता येत नव्हती, वसंत मोरेंनी भरसभेत राज ठाकरेंच्या तब्येतीचाही वृत्तांत दिला, नेमकं काय झालंय?
ठाण्यातील उत्तरसभेत 'राजगर्जने'आधी वसंत मोरे गरजलेImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 12, 2022 | 8:41 PM

ठाणे: मनसेवर नाराज असलेल्या मनसे नेते वसंत मोरेंची (vasant more) तोफ आज ठाण्यात धडाडली. पक्षाबाबतची तळमळ व्यक्त करतानाच त्यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी (chandrakant patil)  दिलेल्या ऑफरवरही भाष्य केलं. पुणे महापालिकेत आम्ही मनसेचे (mns) दोनच नगरसेवक आहोत. तरीही ‘चर्चेतील चेहरा’ हा पुरस्कार मनसेच्या नगरसेवकाला जातो. म्हणजे मनसे नक्कीच चांगलं काम करत आहे. 16 वर्षात 16 उद्यानं निर्माण करणारा मी एकमेव नगरसेवक आहे. मला पुरस्कार देताना चंद्रकांतदादा आणि सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. तेव्हा चंद्रकांतदादा म्हणाले, तुम्ही भाजपमध्ये या. तेव्हा मी दादांना म्हणालो, मी 15 वर्षे भाजपच्याच उमेदवाराला पाडून नगरसेवक होत आलोय. तुमच्याकडे कसा येऊ? असं वसंत मोरे यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्या प्रकृतीचीही माहिती दिली. राज ठाकरेंची प्रकृती बरी नाही. ते एक पायरीही चढू शकत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे राज यांना काय झालं अशी चर्चा सुरू आहे.

ठाण्यात राज ठाकरे यांची उत्तर सभा सुरू आहे. यावेळी वसंत मोरे यांनाही भाषण करण्याची संधी दिली. गेल्या दोन तीन महिन्यापासून राज साहेबांची तब्येत ठिक नाही. कालही त्यांना होणारा त्रास मला जाणवत होता. एक पायरी चढणं मुश्किल होतं. तिथे ते 10 पायऱ्या चढून कार्यकर्त्याच्या घरी जात होते हे आम्ही पाहिलं. राजसाहेबांच्या ब्लू प्रिंटचं काम पाहायचं असेल तर कात्रज आणि कोंढव्यात या, असं वसंत मोरे म्हणाले.

जे सरकारने केलं नाही, ते आम्ही केलं

पुण्यात कोरोना काळात सरकारच्या माध्यमातून जी काम होणं अपेक्षित होतं ती कामं झाली नाहीत. त्यावेळी फक्त मनसे काम करत होती. तुम्ही त्या गोष्टी उघड्या डोळ्यांनी पाहिल्या आहेत. सगळे नेते आपल्या घरात बसलेले असताना मनसे पदाधिकारी रस्त्यावर होते. एक एम्बेसेडरची काच फुटली आणि त्याचा आवाज सगळ्या महाराष्ट्राने ऐकला. ज्या ठिकाणी ऑक्सिजनची गरज होती तिथे आमचा मनसैनिक जात होता. सरकार जी कामं करत नव्हते ती कामं आम्ही करत होतो. आमचा साईनाथ 5 – 5 हजार लोकांना जेवण देत होता. आम्ही दवाखाने उभे केले, असंही त्यांनी सांगितलं.

निवडणुकीत मनसे का आठवत नाही?

कोरोनाचा ट्रेन्ड बदलत गेला तसा फायनान्स, बँकवाले प्रत्येकाच्या दारात उभे राहायला लागले. अशावेळी फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची दारं उघडी होती. फायनान्सवाला, बँकवाला आला की मनसेवाला आठवतो. मग निवडणुकीच्या काळात मनसे का आठवत नाही?, असा सवालही त्यांनी केला.

संबंधित बातम्या:

Raj Thackeray Speech LIVE : काही क्षणात राज ठाकरेंचं वादळी भाषण, उत्तरसभेत ‘राजगर्जने’आधी वसंत मोरे गरजले

Raj Thackeray Thane: राज ठाकरेंची सभा म्हणजे ‘उत्तर’ पूजा, आधी भैय्यांसोबत काटाकुटी आता गुलु गुलु; किशोरी पेडणेकरांनी डिवचले

Maharashtra News Live Update : किरीट सोमय्यांच्या अडचणी वाढल्या, आजही कोर्टात पदरी निराशा

लाडक्या बहिणींच्या हप्त्यात कपात, 1500 नाही तर मिळणार फक्त 500 रुपये
लाडक्या बहिणींच्या हप्त्यात कपात, 1500 नाही तर मिळणार फक्त 500 रुपये.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या 2 मोठ्या घोषणा
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या 2 मोठ्या घोषणा.
पुण्यातील सिंघम स्टाईल पोलीस ऑफिसर, 'पाटलां'नी गुंडाची काढली थेट धिंड
पुण्यातील सिंघम स्टाईल पोलीस ऑफिसर, 'पाटलां'नी गुंडाची काढली थेट धिंड.
गुंडाची दहशत, केकवर चक्क गुन्ह्यांची कलमं, बर्थ डे सेलिब्रेशनला...
गुंडाची दहशत, केकवर चक्क गुन्ह्यांची कलमं, बर्थ डे सेलिब्रेशनला....
'कचरा समजतो, नंतर येऊन हा काड्या...', दानवेंवर खैरे भडकले, आता थेट...
'कचरा समजतो, नंतर येऊन हा काड्या...', दानवेंवर खैरे भडकले, आता थेट....
हलगर्जीपणामुळे बीड जिल्हा रुग्णालयात गर्भवतीचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
हलगर्जीपणामुळे बीड जिल्हा रुग्णालयात गर्भवतीचा मृत्यू, नेमकं काय घडलं?.
कराडला धनंजय मुंडेच संपवणार, तृप्ती देसाईंचा दावा, नेमकं काय म्हणाल्या
कराडला धनंजय मुंडेच संपवणार, तृप्ती देसाईंचा दावा, नेमकं काय म्हणाल्या.
फडणवीस गप्प का? सामनातील प्रश्नावर भाजपचं उत्तर, 'सत्तेत यायचंय पण...'
फडणवीस गप्प का? सामनातील प्रश्नावर भाजपचं उत्तर, 'सत्तेत यायचंय पण...'.
मुंडेंचे सर्व काळे कारनामे..,पोलीस अधिकाऱ्याच्या ऑफरवरून शर्मांचा आरोप
मुंडेंचे सर्व काळे कारनामे..,पोलीस अधिकाऱ्याच्या ऑफरवरून शर्मांचा आरोप.
कार्यक्रमपत्रिकेत नाव, पण शिंदे आणि अजितदादांचे भाषण कट
कार्यक्रमपत्रिकेत नाव, पण शिंदे आणि अजितदादांचे भाषण कट.