ठाण्यातील काही भागात उद्या पाणीबाणी, ठाणेकरांनो आजच पाणी भरून ठेवा
बुधवारी 1 जूनला ठाणे शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद.
ठाणे : ठाणे (Thane) महानगरपालिकेच्या (Municipal Corporation) रॉ वॉटर पाईपलाईनची कल्याण (Kalyan) फाटा भिवंडी येथे NH -4 च्या कामातंर्गत गळती काढणे, पावसाळ्यापूर्वी टेमघर येथे 22 केव्ही सबस्टेशनमध्ये अत्यावश्यक कामे करावयाची आहेत. तसेच टेमघर जलशुध्दिकेंद्रामध्ये रॉ वॉटर (PAC) पाईपलाईनला जलमापक लावणे, टेमघर जलशुध्दिकरण केंद्रामधील सॅन्ड फिल्टरची दुरूस्ती करणे, बापगावजवळ रॉ वॉटर पाईपलाईनची जोडणी (Various Repairs) करण्यात येणार आहे. तसेच स्टेम प्राधिकरणाच्यावतीने पावसाळ्याअगोदर दैनंदिन देखभाल दुरूस्तीची कामे करण्याकरिता बुधवार दिनांक 01.06.2022 रोजी सकाळी 9.00 ते गुरूवार सकाळी 9.00 वाजेपर्यत 24 तासांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे.
याभागाच पाणी पुरवठा बंद
या कारणास्तव बुधवार दिनांक 01.06.2022 रोजी सकाळी 9.00 ते गुरूवार सकाळी 9.00 वाजेपर्यत घोडबंदर रोड, पातलीपाडा, हिरानंदानी इस्टेट, समतानगर, गांधीनगर, सिध्दांचल, आकृती, सिध्देश्वर, जॉन्स्न, इटर्निटी, ब्रह्मांड, विजयनगरी, गायमुख, बाळकुम, कोलशेत, आझादनगर, ऋतुपार्क, जेल, साकेत, रुस्तमजी, इंदिरानगर, लोकमान्यनगर, श्रीनगर, डिफेन्स, येऊर, विठ्ठल क्रिडा मंडळ, सुरकुरपाडा तसेच कळवा व मुंब्र्याच्या काही भागात पाणीपुरवठा 24 तासांसाठी बंद राहणार आहे.
पुढील 1 ते 2 दिवस पाणी कमी
वरील शटडाऊनमुळे पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा व ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.