ठाणेकरांना खूश खबर! बारवी धरण 52 टक्के भरलं; 4 दिवसात धरणाची पातळी 65 मीटरवर

| Updated on: Jul 21, 2021 | 6:14 PM

गेल्या चार दिवसांपासून बरसणाऱ्या दमदार पावसामुळे संपूर्ण ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारं बारवी धरण 52 टक्के भरलंय. (barvi dam badlapur)

ठाणेकरांना खूश खबर! बारवी धरण 52 टक्के भरलं; 4 दिवसात धरणाची पातळी 65 मीटरवर
barvi dam
Follow us on

ठाणे: गेल्या चार दिवसांपासून बरसणाऱ्या दमदार पावसामुळे संपूर्ण ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारं बारवी धरण 52 टक्के भरलंय. धरणाची पाणीपातळी 65.80 मीटरवर पोहोचली आहे. आणखी काही दिवस पाऊस असाच बरसत राहिला तर मागील वर्षीच्या तुलनेत यंदा हे धरण लवकर भरण्याची शक्यता आहे. (Water levels rise at barvi dam supplying water to Thane)

मागील चार दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. धरणक्षेत्रातही मुसळधार पावसानं हजेरी लावली असून त्यामुळं धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. बदलापूरच्या बारवी धरणातून ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, मीरा भाईंदर या महापालिका, अंबरनाथ आणि बदलापूर या नगरपालिका, तसेच एमआयडीसी आणि स्टेम या प्राधिकरणांना पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळं संपूर्ण जिल्ह्याची तहान या धरणातून भागते. यासाठी बारवी धरणातून उल्हास नदीत दररोज पाण्याचा ठरावीक विसर्ग केला जातो. मात्र गेल्या 15 दिवसांपासून उल्हास नदीला पावसामुळे मोठा प्रवाह आला असून त्यामुळं बारवी धरणातून सोडलं जाणारं पाणी बंद करण्यात आलंय. यामुळे धरण वेगाने भरू लागलंय.

आठ-दहा दिवसात धरण भरणार?

2019 साली हे धरण 4 ऑगस्टला भरलं होतं. तर 2020 म्हणजे मागील वर्षी पाऊस काहीसा लांबल्यानं हे धरण 31 ऑगस्टला भरलं होतं. मात्र यंदा गेल्या चार दिवसांपासून पावसानं जोरदार बॅटिंग सुरू केलीय. त्यामुळं हे धरण 65.80 मीटर इतकं भरलंय. धरणाची उंची 72 मीटर असून पावसाचा जोर असाच कायम राहिला, तर पुढच्या 8 ते 10 दिवसात हे धरण पूर्णपणे भरेल, अशी अपेक्षा आहे. हे धरण भरल्यानंतर ठाणे जिल्ह्यातील नागरिकांची चिंता वर्षभरासाठी मिटणार आहे. (Water levels rise at barvi dam supplying water to Thane)

 

संबंधित बातम्या:

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! मुंबईला पाणी पुरवठा करणारा तुळशी तलाव ओव्हरफ्लो!

Mumbai Traffic : मुंबईत पावसाची दाणादाण, ट्रॅफिक जाम झाल्यानं ठिकठिकाणी गाड्यांच्या लांबच लांब रांगा

Mumbai Rains: मुंबईत पावसाचं धुमशान, पाणी भरलं, ठिकठिकाणी वाहतूक कोंडी

(Water levels rise at barvi dam supplying water to Thane)