Thane Water Supply : ठाणे शहरातील काही भागात 24 तास पाणी पुरवठा बंद राहणार

ठाणे शहरातील दिवा प्रभाग समिती, मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत मुंब्रा बायपास पासून मुंब्रा फायरब्रिगेड पर्यंत (किस्मत कॉलनी, चांद नगर, एम. एम.व्हॅली, अमृतनगर, अल्मास कॉलनी) तसेच कळवा प्रभाग समितीमधील काही भाग व कोलशेत, वागळे इस्टेट मधील काही परिसराचा पाणी पुरवठा (Water Supply) 24 तासांसाठी बंद राहणार आहे.

Thane Water Supply : ठाणे शहरातील काही भागात 24 तास पाणी पुरवठा बंद राहणार
ठाणे शहरातील काही भागात 24 तास पाणी पुरवठा बंद राहणार
Follow us
| Updated on: Feb 10, 2022 | 12:54 AM

ठाणे : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्यामार्फत बारवी गुरुत्व जलवाहिनीचे देखभाल व दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने गुरुवार 10 फेब्रुवारी, 2022 रोजी रात्रौ 12.00 ते शुक्रवार 11 जानेवारी, 2022 रोजी रात्रौ 12.00 वाजेपर्यंत ठाणे शहरातील दिवा प्रभाग समिती, मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत मुंब्रा बायपास पासून मुंब्रा फायरब्रिगेड पर्यंत (किस्मत कॉलनी, चांद नगर, एम. एम.व्हॅली, अमृतनगर, अल्मास कॉलनी) तसेच कळवा प्रभाग समितीमधील काही भाग व कोलशेत, वागळे इस्टेट मधील काही परिसराचा पाणी पुरवठा (Water Supply) 24 तासांसाठी बंद राहणार आहे. या शटडाऊन (Shutdown)मुळे पाणी पुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असून, नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे. (Water supply will be cut off for 24 hours in some parts of Thane city)

डोंबिवली, कल्याण पूर्व व उल्हासनगरच्या काही भागात शुक्रवारी वीज बंद

महापारेषणकडून अतिउच्चदाब वाहिन्यांच्या देखभाल-दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने डोंबिवली, उल्हासनगर 2 आणि कल्याण पूर्व विभागातील महावितरणच्या काही ग्राहकांचा वीज पुरवठा काही काळ बंद राहणार आहे. शुक्रवारी (11 फेब्रुवारी) सकाळी 8 ते दुपारी 1 दरम्यान 220 केव्ही पडघा ते पाल आणि 220 केव्ही पडघा ते जांभूळ दरम्यान वीजवाहिन्या देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. यासंदर्भात वीज ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईलवर संदेश पाठवून पूर्वकल्पना देण्यात येणार असून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

अखेर उल्हास नदी जलपर्णीमुक्त

ठाणे जिल्ह्याची जीवनवाहिनी समजली जाणारी उल्हास नदी अखेर जलपर्णीमुक्त झाली आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी या नदीची पाहणी केली. पश्चिम घाटातून उगम पावणारी उल्हास नदी रायगड आणि ठाणे जिल्ह्यातून वाहते. या नदीतून संपूर्ण ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा केला जातो. मात्र मागील काही दिवसांपासून या नदीवर मोठ्या प्रमाणात जलपर्णीचं आच्छादन पाहायला मिळत होतं. जलपर्णीमुळे नदीतील पाण्यातला ऑक्सिजन कमी होणं, जलचरांना खाद्य न मिळणं या समस्या उद्भवू लागल्यानं ही नदी मृत होण्याची भीती व्यक्त होत होती. त्यामुळं गेल्या वर्षभरापासून शासनाच्या आर्थिक मदतीतून नेरळच्या सगुणा रुरल फाउंडेशनच्या माध्यमातून ही जलपर्णी हटवण्यासाठी उपयोजना केल्या जात होत्या. (Water supply will be cut off for 24 hours in some parts of Thane city)

इतर बातम्या

Kalyan Crime : पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्यासाठी आत्मघातकी बनाव, कल्याण स्थानकातील धक्कादायक प्रकार

Kalyan BJP : कल्याणमध्ये शिवसेना खासदाराकडून भाजपला दे धक्का सुरुच, चौथा माजी नगरसेवक शिवसेनेत दाखल

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.