आम्ही राणेंचे कार्यकर्ते नाही, राज ठाकरेंचे सैनिक आहोत, मनसे नेते अविनाश जाधवांनी ललकारले
कोरोना प्रतिबंधक नियमाप्रमाणे कलम 149 च्या अनुसार मनसेच्या पदाधिकारी यांना नोटीस दिली होती. मात्र आदेशाचा भंग आणि पालन न केल्याप्रकरणी नौपाडा पोलिसांनी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी 18 जणांना ताब्यात घेत त्यांच्यावर कलम 188 प्रमाणे गुन्हा दाखल करून सुटका केली आहे.
ठाणे : पोलिसांनी आणि राज्य सरकारने कितीही दबाव तंत्राचा वापर केला तरी आम्ही दहीहंडी साजरी करणार, असा इशारा मनसेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला आहे. हे बोगस सरकार आहे, आम्ही नारायण राणेंचे कार्यकर्ते नाही, आम्ही राज ठाकरेंचे सैनिक आहोत. जन आशिर्वाद असो किंवा नेत्या मंडळींचे कार्यक्रम होत आहेत मग आम्हला का बंदी असा सवाल देखील जाधव यांनी केला आहे. तसेच सर्व ठिकाणावरून आम्हाला पाठिंबा येत आहे. उत्तर भारतातून देखील फोन मला आले. राज ठाकरे यांचा आदेश आहे तो आम्ही पाळणार हिंदू म्हणून आम्ही या लोकांनी मतदान केले आता हेच सरकार मागे फिरले असून हिंदूंच्या सणावर गदा आणत आहे त्याचा आम्ही निषेध करतो. सण होणार दही हंडी करणार, असे अविनाश जाधव यांनी सांगितले आहे. (We are not Rane’s activists, we are Raj Thackeray’s soldiers, MNS leader Avinash Jadhav challenged)
कोरोना प्रतिबंधक नियमाप्रमाणे कलम 149 च्या अनुसार मनसेच्या पदाधिकारी यांना नोटीस दिली होती. मात्र आदेशाचा भंग आणि पालन न केल्याप्रकरणी नौपाडा पोलिसांनी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी 18 जणांना ताब्यात घेत त्यांच्यावर कलम 188 प्रमाणे गुन्हा दाखल करून सुटका केली आहे. विना परवाना स्टेज बांधून दहीहंडी उत्सव साजरा करणार असल्यामुळे नौपाडा पोलिसांनी देखील स्टेज हटविण्याचे काम केले.
दहीहंडी उत्सव रद्द
दरम्यान, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी यंदाचा दहीहंडी उत्सव रद्द करण्यात आल्याचं दोन दिवसांपूर्वीच सांगितलं. कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढतो आहे. गेल्या तीन दिवसांचा आलेख पाहिला तर कोरोनाचं सावट वाढतंय असं वाटू लागलंय. तशा केसेसही समोर येऊ लागल्या आहेत. एकाच सोसायटीत 17 जणांचा कोरोना झाला. ठाण्यातही अनेकांना कोरोनाची लागण झालीय. त्यामुळे ठाण्यात यावेळी संस्कृती प्रतिष्ठानचा दहीहंडी उत्सव रद्द करण्यात आलेला असून त्याऐवजी आरोग्य उत्सव साजरा करणार असल्याची माहिती सरनाईक यांनी दिली आहे.
मनसेला हात जोडून विनंती
मनसे किंवा इतर पक्षांनाही हात जोडून विनंती की हे वर्ष दहीहंडी साजरी करु नये, असं सांगताना दहीहंडीत सोशल डिस्टन्स पाळू शकत नाही. मास्क घालू शकत नाही. त्यात भरीस भर म्हणजे शेवटचे तीन थर 14 ते 16 वर्ष वयोगटातील मुलांचा असतो. आणि सध्या लहान मुलांना कोरोनाचा धोका सर्वाधिक प्रमाणात आहे, हे आपल्याला माहिती आहे, असंही सरनाईक म्हणाले होते. (We are not Rane’s activists, we are Raj Thackeray’s soldiers, MNS leader Avinash Jadhav challenged)
Post Office मध्ये FD करा, तुम्हाला एका वर्षात बँकेपेक्षा अधिक लाभ, किती व्याज मिळणार?#businessnewsinmarathi #Fixeddeposits #PostOffice https://t.co/wEDAWbQ7UE
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 30, 2021
इतर बातम्या
भावजयी शेतात शौचास गेली म्हणून दीर भडकला, आधी शिवीगाळ, नंतर भावासोबत हाणामारी, मरेपर्यंत मारलं
मोबाईल ऑपरेटर कंपन्यांकडे दीड हजार कोटींचा कर थकीत, वसूलीसाठी पुणे मनपा हायकोर्टात