विधानसभेत चांगला निकाल द्यायचाय, तुम्हाला जागं करायला आलो; जयंत पाटलांची कार्यकर्त्यांना साद

डहाणू मतदारसंघात अशक्य अशी गोष्ट काहीच नाही, स्थानिक पातळीवर बऱ्याच ठिकाणी पक्षाची चांगली कामगिरी आहे. आपण थोडा प्रयत्न केला तर स्थानिक स्वराज्य संस्था तर टिकवूच मात्र विधानसभेतही एक चांगला निकाल आपल्याला मिळू शकतो. (we can win palghar assembly constituency, says jayant patil)

विधानसभेत चांगला निकाल द्यायचाय, तुम्हाला जागं करायला आलो; जयंत पाटलांची कार्यकर्त्यांना साद
jayant patil
Follow us
| Updated on: Oct 23, 2021 | 4:40 PM

पालघर: डहाणू मतदारसंघात अशक्य अशी गोष्ट काहीच नाही, स्थानिक पातळीवर बऱ्याच ठिकाणी पक्षाची चांगली कामगिरी आहे. आपण थोडा प्रयत्न केला तर स्थानिक स्वराज्य संस्था तर टिकवूच मात्र विधानसभेतही एक चांगला निकाल आपल्याला मिळू शकतो, असं सांगतानाच मी तुम्हाला जागं करण्यासाठी आलो आहे. जागं राहा आणि पक्ष वाढवा, अशी सादच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पालघर, डहाणूमधील कार्यकर्त्यांना घातली.

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेचा आजचा दुसरा दिवस असून जयंत पाटील यांनी डहाणू येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. संघटना आपल्याला बळकट करायची आहेच शिवाय आपलं अस्तित्व निर्माण करण्याची गरज आहे. त्यामुळे आपल्याला जागं करण्यासाठी आम्ही आलो आहोत, असे पाटील म्हणाले. प्रत्येक समाजाच्या प्रश्नांची सोडवणूक करून लोकांच्या मनात स्थान निर्माण करा, असे आवाहनही त्यांनी केलं.

पालघरमध्ये पोषक वातावरण

यावळी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही यावेळी कार्यकर्त्यांना केलं. वसई – विरार सोडला तर संपूर्ण पालघरमध्ये आपल्यासाठी एक पोषक वातावरण आहे. या वातावरणाचे रुपांतर आपल्याला मतांमध्ये करून पालघर जिल्ह्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा फडकवायचा आहे, असे आवाहन आव्हाड यांनी केले.

मनात ठरवलं तर आपणही जिंकू

डहाणू हा पुरोगामी विचारांचा गड आहे. शरद पवारसाहेबांचं या भागावर विशेष प्रेम आहे. मात्र मधल्या कालखंडात पक्षापासून काही लोक दूर गेले. ही परिस्थिती आपल्याला बदलायची आहे त्यामुळे एकदिलाने काम करा असे सांगतानाच राष्ट्रवादीच्या मदतीने अनेक जण निवडून येतात. मला खात्री आहे आपण मनात ठरवलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इथली जागा जिंकू शकते, असा विश्वासही आव्हाड यांनी व्यक्त केला.

यावेळी आमदार सुनिल भुसारा, पालघर निरीक्षक अशोक सावंत, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सांबरे, महिला जिल्हाध्यक्षा किर्ती मेहता, युवक जिल्हाध्यक्ष वरुण पारेख, युवती जिल्हाध्यक्षा हिंदवी पाटील आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित बातम्या:

VIDEO: कावळ्यांची पिसं झडून जातील, चोची मारून मारून तुटून जातील, पण सरकार कोसळणार नाही; राऊतांचा भाजपला खोचक टोला

नवाब मलिक हे पाकिस्तानचे एजंट, पाकच्या ड्रग्ज माफियांचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर; नितेश राणेंचा गंभीर आरोप

अमित शहा सध्या काश्मीर दौऱ्यावर आहेत, संजय राऊत म्हणाले, तिकडेच थांबायला सांगा!

(we can win palghar assembly constituency, says jayant patil)

बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार.
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी.
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू.
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा.