मुख्यमंत्र्यांच्या मुलाशी सांभाळून बोललं पाहिजे, जितेंद्र आव्हाड असं का म्हणालेत?
मनसेच्या नेत्यांनी मला फोन करून सांगितलेलं. आपण दोघं मिळून उद्घाटन करूया.
ठाणे : खासदार श्रीकांत शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात शाब्दिक चकमक झाली. यावरून बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, आता मुख्यमंत्री यांचा मुलगा आहे. मुख्यमंत्र्यांच्या मुलाशी सांभाळून बोललं पाहिजेत. आताचं आम्हाला धमकी मिळाली आहे. किती दिवस जेलमध्ये बसाल तुम्हाला कळणार नाही. आता घाबरलं पाहिजे ना. आताचं धमकी दिली ना आम्हाला सगळ्या मंत्र्यांची चौकशी करू. मग बघू तुम्हाला कोण जामीन देतो. धमक्या मिळणार असतील, तर गाव सोडून गेलेलं बरं, असंही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं. नरेश म्हस्के यांनी सर्व मंत्र्यांच्या गैरकारभाराची चौकशी होणार असल्याचं म्हटलं. त्यावरून जितेंद्र आव्हाड यांनी हे प्रत्युत्तर दिलं.
कळवा पूल दोन महिन्यांपूर्वी पूर्ण झालं होतं. पण, मुख्यमंत्र्यांसाठी याचं लोकार्पण झालं नव्हतं. यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले, ते ठाण्याचे मुख्यमंत्री होते. पहिल्या वास्तूचं उद्घाटन होतं. आगाऊपणा करून आमच्या कार्यकर्त्यांनी उघडला नसता तर ते चांगलं दिसलं नसतं. शेवटी मुख्यमंत्र्यांचा सन्मान राखला गेला पाहिजे, या मताचा मी होतो. इतर अनेक वेळा पुल उघडलेत, आपल्याला माहिती आहे.
माझीवड्याचा पुल कुणी उघडला. जितेंद्र आव्हाड. माझ्यावर केसेसपणा झाल्यात. हा पुल उघडताना मुख्यमंत्र्यांचा पहिला एवढा मोठा कार्यक्रम होणार आहे. तो त्यांच्या हस्ते व्हावा. एवढी एक माणुसकीची भावना माझ्या मनात होती. म्हणून या पुलाचं उद्घाटन होऊ दिलं नाही, असंही ते म्हणाले.
मनसेच्या नेत्यांनी मला फोन करून सांगितलेलं. आपण दोघं मिळून उद्घाटन करूया. तेव्हा मी त्यांना सांगितलं विचार करून सांगतो. कारण हा पुल माझ्या मतदारसंघात आहे. या पुलाची पहिली मागणी मी केली आहे. मान्यता विलासराव देशमुख यांनी दिली आहे.
नंतर प्रोसेस सुरू झाली. पुढं होणाऱ्या टनेलला मंजुरी आमच्या कॅबिनेटमध्ये मी मंत्री असताना मिळाली आहे. कुणीतरी सुरुवात करतो. कुठंतरी शेवट होतो. सुरुवात करणं हे महत्त्वाचं असतं. लोकांच्या हितासाठी काम करणं महत्त्वाचं असतं. मला काही कामाचं क्रेडिट करायचं नसतं, असं त्यांनी स्पष्ट केलं.