लसीकरणाअभावी तिसरी लाट रोखणार कशी? खासदार श्रीकांत शिंदेंचा केंद्राला सवाल

गेल्या काही दिवसांपासून पुरेशा लसी उपलब्ध होत नसल्याने कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून लसीकरण वारंवार बंद ठेवले जात आहे.

लसीकरणाअभावी तिसरी लाट रोखणार कशी? खासदार श्रीकांत शिंदेंचा केंद्राला सवाल
Shrikant Shinde
Follow us
| Updated on: Jul 10, 2021 | 10:47 PM

ठाणे : गेल्या काही दिवसांपासून पुरेशा लसी उपलब्ध होत नसल्याने कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून लसीकरण वारंवार बंद ठेवले जात आहे. लसीकरणासंदर्भात बोलताना कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे म्हणणे आहे की, केंद्राने याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. आपण कोरोनाची तिसरी लाट येऊ नये यासाठी प्रयत्न करत आहोत. परंतु जर लसीकरणच झाले नाही तर तिसऱ्या लाटेला रोखणार कसे? असा सवाल खासदार शिंदे यांनी उपस्थित केला आहे. प्रत्येक महापालिकेला आणि राज्याला मुबलक प्रमाणात लस उपलब्ध करुन दिली पाहिजे, अशीही मागणीदेखील त्यांनी केली आहे. (Without Vaccination How can we stop Third wave of Corona ; Shrikant Shinde raised Question)

मुंबई, ठाण्यासह राज्यातील अनेक शहरांमध्ये, तालुक्यांमध्ये लस उपलब्ध नसल्याने आज आणि उद्या लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे. एकीकडे केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात लसीकरण राबवा म्हणून राज्यांना आदेश देत आहे. तर दुसरीकडे रुग्णालय तसेच आरोग्य केंद्रांमध्ये लसींचा साठा उपलब्ध नसल्याने लसीकरण बंद आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारच्या ढिसाळ कारभारावर आता टीका होऊ लागली आहे.

मुंबईत आज आणि उद्या लसीकरण बंद

कोविड-19 प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर आज (शनिवार, 10 जुलै) लसीकरण बंद होते. तसेच रविवारी (उद्या) साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी लसीकरण कार्यक्रम नियमित सुट्टी म्हणून बंद राहणार आहे.

लशींचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्या अनुरूप योग्य निर्णय घेऊन मुंबईकर नागरिकांना सातत्याने अवगत करण्यात येते. लशींचा साठा उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण पुन्हा सुरू करण्यात येईल. मुंबईकर नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

लसीचे दोन्ही डोस घेतलेले नागरिक निर्बंधांतून सुटणार?

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर मुंबईत लागू झालेले निर्बंध अद्याप कायम आहेत. कोरोनाची दुसरी लाट (Coroanvirus) नियंत्रणात येऊनही हे निर्बंध शिथील करण्यात आले नव्हते. त्यामुळे आता मुंबईकर हे निर्बंध कधी उठणार, असा सवाल विचारू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेकडून लवकरच महत्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. येत्या 15 तारखेला यासंदर्भात बैठक होणार आहे. तेव्हा मुंबईकरांना निर्बंधामधून सूट देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होऊ शकते.

त्यामुळे कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना निर्बंधांतून सूट मिळू शकते. अशा नागरिकांना कार्यालये व इतर ठिकाणी प्रवेशासाठी सवलत देण्याचा विचार सुरु आहे. मुंबईतील कोरोना परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. मात्र, तिसऱ्या लाटेच्या भीतीमुळे राज्य सरकार कोणताही धोका पत्कारायला तयार नाही. त्यामुळे लोकल ट्रेन आणि इतर सेवांवर निर्बंध आहेत. मात्र, दीर्घकाळ निर्बंध लागू असल्याने नागरिकांचा संयम सुटू लागला आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारकडून निर्बंध काहीप्रमाणात शिथील करून नागरिकांना दिलासा दिला जाऊ शकतो.

आतापर्यंत 12 लाख मुंबईकरांना कोरोना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. तर 46,81,780 जणांना कोरोना लसीचा एकच डोस मिळाला आहे. एकूण 59 लाख 29 हजार नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला आहे.

संबंधित बातम्या:

ब्रिटनने मास्कसह सगळे निर्बंध हटवले, राऊत म्हणाले, ‘त्यांचा निर्णय आत्मघातकी आणि जगासाठी धोकादायक’

कोरोनाच्या लस संपल्या, मुंबईत शनिवारी, रविवारी शासकीय, महापालिका केंद्रांवर लसीकरण बंद

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये पुन्हा वाढ, अ‍ॅक्टिव्ह केसेसही वाढल्या

(Without Vaccination How can we stop Third wave of Corona ; Shrikant Shinde raised Question)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.