VIDEO | कोव्हिड सेंटरच्या परिसरात कर्मचाऱ्यांची दारुची पार्टी, विरोध केल्यानंतर तरुणाला मारहाण
डोंबिवलीतील महापालिकेच्या सावळाराम क्रीडा संकुलातील कोव्हिड सेंटरच्या परिसरात चक्क दारुची पार्टी सुरु होती. (dombivali covid center liquor party)
ठाणे : राज्यात अनेक कोव्हिड सेंटरमध्ये विनयभंग, बलात्कार, चोरी अशा अनेक घटना यापूर्वी समोर आल्या आहेत. त्यानंतर आता डोंबिवलीमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. डोंबिवलीतील महापालिकेच्या सावळाराम क्रीडा संकुलातील कोव्हिड सेंटरच्या (Dombivali Covid center) परिसरात चक्क दारुची पार्टी सुरु होती. विशेष म्हणजे कोव्हिड सेंटरमधील कर्मचारीच ही पार्टी करत होते. दारु, अमली पदार्थांचे सेवन अशा अनेक गोष्टींची या पार्टीत रेलचेल असल्याचे दिसून येत आहे. तसा व्हिडीओ समोर आल्यांनतर स्थानिक प्रशासनाने या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले आहे. (workers having liquor party in Dombivali Covid center premises video goes viral)
मिळालेल्या माहितीनुसार डोंबिवलीतील महापालिकेच्या सावळाराम क्रीडा संकुलातील कोव्हिड सेंटरच्या परिसरात काही कर्मचारी दारूची पार्टी करत होते. या घटनेचा व्हिडीओसुद्धा समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये साधारण दोन ते तीन जण स्पष्टपणे दिसत आहेत. त्यामध्ये हे कर्मचारी दोरु पिताना स्पष्टपणे दिसत आहेत. हा प्रकार समोर आल्यानंतर एका तरुणाने या कर्मचाऱ्यांना पार्टीसाठी मज्जाव करण्याचा प्रयत्न केला. तसेच या पार्टीचा व्हिडीओसुद्धा काढला. मात्र, दारु पिणे बंद करण्याऐवजी या कर्मचाऱ्यांनीच या तरुणाला बेदम मारहाण केली.
कोव्हिड रुग्णालयात काम करणारे कर्मचारी अशा प्रकारे दारुची पार्टी करत होते, पाहा व्हिडीओ :
दरम्यान, हा व्हिडीओ समोर आल्यानंतर कोव्हिड सेंटरच्या अधिकाऱ्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्यात आले आहे. मात्र, असे असले तरी कोरोनावर उपचार घेणाऱ्या महिलांवर बलात्काराचा प्रयत्न, विनयभंग, चोरी असे अनेक प्रकार यापूर्वी कोव्हिड सेंटरमध्ये घडले आहेत. त्यानंतर ही घटना समोर आल्यानंतर पुन्हा एकदा कोरोनाग्रस्तांच्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. तसा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.
डोंबिवली क्रीडा संकुलातील कोविड सेंटरमध्ये कर्मचारी दारु गांजा पार्टी करीत असतील तर त्याठिकाणी उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या सुरक्षिततेची #KDMC प्रशासन काय हमी देणार आहे. त्याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार होऊ शकतो. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे. @KDMCOfficial @ThaneCityPolice pic.twitter.com/9YvzTmGZ42
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) March 28, 2021
इतर बातम्या :
महाविकासआघाडीत मीठाचा खडा टाकू नका; संजय राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर अजित पवारांचा इशारा
मनसुख हिरेन हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट; शिवसेनेचे माजी नगरसेवक धनंजय गावडेंना अटक होणार
(workers having liquor party in Dombivali Covid center premises video goes viral)