AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कल्याण-डोंबिवलीत शून्य कचरा मोहिमेचा फज्जा, जागोजागी कचरा साचल्याने नागरिक हैराण

संबंधित ठेकेदाराच्या कामचुकारपणामुळे अनेकदा या प्रभागांमध्ये कचऱ्याचे ढीग साचलेले दिसून येत आहेत. अनेक ठिकाणी कचरा गाड्या बंद अवस्थेत पडून असून त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. तर खडकपाडा येथील पालिकेच्या पार्किंगच्या जागेत या ठेकेदाराच्या 15 ते 20 गाड्या भंगार अवस्थेत पडून आहेत.

कल्याण-डोंबिवलीत शून्य कचरा मोहिमेचा फज्जा, जागोजागी कचरा साचल्याने नागरिक हैराण
कल्याण-डोंबिवलीत शून्य कचरा मोहिमेचा फज्जा, जागोजागी कचरा साचल्याने नागरिक हैराण
Follow us
| Updated on: Aug 23, 2021 | 8:49 PM

डोंबिवली : मोठा गाजावाजा करीत कल्याण डोंबिवली महापालिकेने शून्य कचरा मोहीमेचा पुरता फज्जा उडालाय. कामचुकार ठेकेदाराकडून शून्य कचरा मोहिमेला हरताळ फासल्याचे दिसून येत आहे. सर्वत्र रस्त्यावर कचरा पसरला आहे. नागरिक हैराण आहेत. विशेष म्हणजे या कचरा उचलण्याचे काम ज्या ठेकेदाराचे आहे त्या ठेकेदाराला पालिकेने अनेकदा नोटीस देऊनही तो जुमानत नसल्याची कबुलीच पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. या कामचुकार ठेकेदारविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल असे देखील पालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. (Zero waste campaign in Kalyan-Dombivali, citizens harassed due to garbage)

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात डोकेदुखी ठरलेली कचरा समस्या सोडवण्यासाठी महापालिकेने विविध उपाययोजना केल्या. उंबर्डे, बारावे या ठिकाणी कचराविघटन प्रकल्प सुरू करत आधारवाडी डम्पिंग बंद केले. ओला सुका कचरा वर्गीकरण, कचराकुंडी हटाव मोहीम अशा विविध उपाय योजना राबवल्या. काही अंशी पालिकेच्या प्रयत्नांना यश आलं. मात्र पालिकेच्या या प्रयत्नांना काम चुकार ठेकेदारामुळे खीळ बसत असल्याचे दिसून येतेय. महापालिकेच्या कल्याण पश्चिमेतील 2 प्रभागामधील कचरा उचलण्याचे काम ठेकेदाराला देण्यात आलंय.

अनेक ठिकाणी कचरा गाड्या बंद अवस्थेत

संबंधित ठेकेदाराच्या कामचुकारपणामुळे अनेकदा या प्रभागांमध्ये कचऱ्याचे ढीग साचलेले दिसून येत आहेत. अनेक ठिकाणी कचरा गाड्या बंद अवस्थेत पडून असून त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. तर खडकपाडा येथील पालिकेच्या पार्किंगच्या जागेत या ठेकेदाराच्या 15 ते 20 गाड्या भंगार अवस्थेत पडून आहेत. त्याहून धक्कादायक बाब या सर्व गाड्या कचऱ्याने खचाखच भरलेल्या आहेत. तर या ठेकेदाराला अनेकदा नोटिसा पाठवून देखील ठेकेदार जुमानत नसल्याची कबुली दस्तुरखुद्द पालिकेने दिली. त्यामुळे पालिकेच्या शून्य कचरा मोहिमेला ठेकेदारामुळे खीळ बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Zero waste campaign in Kalyan-Dombivali, citizens harassed due to garbage)

इतर बातम्या

Tokyo Paralympics 2020: पॅरालिम्पिक्समध्येही यश मिळवण्यासाठी भारतीय खेळाडू सज्ज, वाचा संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

लाचखोरी प्रकरणात शिक्षणाधिकारी वैशाली वीर-झनकर यांचं अखेर निलंबन, तर कोर्टाकडून अटी-शर्तींसह जामीन

पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड.
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती.
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!.
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?.
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही.
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध.
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?.
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त.
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना....
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना.....
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News...
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News....