‘तो’ निर्णय चुकीचा, अजितदादांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांनाच केले आरोपी

अर्थमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारताच अजित पवार यांनी विरोधकांच्या विकास निधीला कात्री लावली. तर, सत्ताधारी विशेषतः राष्ट्रवादीच्या आमदारांना भाब्रून निधी दिल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्याला उत्तर देताना अजित पवार यांनी नेमका कळीचा मुद्दा बाहेर काढल्याने विरोधक संतापले.

'तो' निर्णय चुकीचा, अजितदादांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांनाच केले आरोपी
UDDHAV THACKAERAY AND AJIT PAWAR Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Jul 25, 2023 | 9:54 PM

मुंबई । 24 जुलै 2023 : अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पण, त्यांना अर्थ खाते देण्यास शिंदे गटाचा विरोध होता. अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते दिल्यास ते निधी वाटपामध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांना झुकते माप देतील अशी त्यांना भीती वाटत होती. त्याची ही भीती खरी ठरली. अजित पवार यांनी निधी वाटपात दुजाभाव केल्याचा आरोप विरोधकांनी केला. शिंदे गटाची नाराजी दूर केली. पण राष्ट्रवादीच्या आमदारांना जास्त निधी दिला असा थेट आरोप अजित पवार यांच्यावर काँग्रेसने केला.

अर्थमंत्री अजित पवार यांनी आपल्यावरील हे आरोप फेटाळतानाच महाविकास आघाडी सरकारने घेतलेला काही निर्णय सांगत थेट उद्धव ठाकरे यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना अजित पवार बोलत होते.

हे सुद्धा वाचा

विकासनिधी वाटपात कोणत्याही आमदारावर अन्याय होणार नाही. पुरवणी मागण्यांमध्ये विविध योजनांसाठी तरतुदी करण्यात आल्या आहेत. शेतकरी सन्मान योजना, साखर कारखान्यांना मदत, शेतकरी कर्ज परतफेड योजना आदींचा पुरवणी मागण्यांमध्ये समावेश आहे असे अजितदादांनी सांगितलं.

राज्यातील विकास निधीच्या वाटपात 2019 ते 22 या काळात जे धोरण राबविण्यात आले त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. असमान निधी वाटप होत असल्याची तक्रार चुकीची आहे असे ते म्हणाले. त्यांच्या उत्तराला विरोधी सदस्यांनी जोरदार आक्षेप घेतला यात काँग्रेस सदस्य आघाडीवर होते.

काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी आमच्या मतदारसंघातील लोकांनी आम्हाला निवडून दिले आहे. तो त्यांचा दोष आहे का? अम्हलायी निधीच आवश्यकता आहे असे म्हणत अजितदादा यांना विरोध केला. त्यावर अजित पवार यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याला आणि ऑलिंपिक स्टेडियमला विरोध केला गेला. जे घडलं ते ही चुकीचं होतं, असे सांगत अप्रत्यक्षपणे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.

दुसऱ्याकडून सकारात्मक प्रतिसाद अपेक्षित धरणाऱ्या लोकांनी आपला कार्यकाळ पहावा असा टोलाही अजित पवार यांनी यावेळी लगावला. दादांच्या या भूमिकेवर विरोधकांनी सभागृहात गदारोळ घालण्यास सुरवात केली. त्यांच्या गोंधळातच विधानसभेत 41 हजार 243 कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर केल्या गेल्या. मात्र, त्यावर विरोधकांनी सभात्याग केला.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.