Umesh Kolhe Murder : अमरावतीतील उमेश कोल्हे हत्या प्रकरण, मानेच्या डाव्या बाजूला चाकूने हल्ला केल्याने मृत्यू

हत्या प्रकरणातील एनआयएच्या ताब्यात असलेल्या सातही आरोपींना घेऊन एनआयएची टीम मुंबईकडे रवाना झाल्याचे सूत्रांकडून कळते. आरोपींना 8 जुलै रोजी मुंबईत NIA न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Umesh Kolhe Murder : अमरावतीतील उमेश कोल्हे हत्या प्रकरण, मानेच्या डाव्या बाजूला चाकूने हल्ला केल्याने मृत्यू
उमेश कोल्हे
Follow us
| Updated on: Jul 06, 2022 | 5:09 PM

अमरावती : मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे (Umesh Kolhe) हत्याकांड प्रकरणी आणखी खुलासा समोर आला आहे. उमेश कोल्हे यांचा शवविच्छेदन अहवाल (Autospy Report) समोर आला आहे. मानेच्या डाव्या बाजूला चाकूने हल्ला केल्याने कोल्हे यांचा मृत्यू (Death) झाला. उमेश कोल्हे यांच्या मानेवर 8×2 cm घाव करण्यात आले होते. श्वासनलिका, अन्ननलिका, डोळे आणि मानेच्या सर्व नसा निष्क्रिय झाल्याने कोल्हे यांचा मृत्यू झाला. हत्या प्रकरणातील एनआयएच्या ताब्यात असलेल्या सातही आरोपींना घेऊन एनआयएची टीम मुंबईकडे रवाना झाल्याचे सूत्रांकडून कळते. आरोपींना 8 जुलै रोजी मुंबईत NIA न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आरोपींना पोलिस बंदोबस्तामध्ये मुंबईत नेले जात असल्याची माहिती मिळते. दरम्यान, आज आणखी एका संशयिताला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू असल्याचेही कळते.

सीसीटीव्ही फुटेज टीव्ही 9 च्या हाती

नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ अमरावतीचे मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांनी व्हॉट्सअप ग्रुपवर पोस्ट व्हायरल केल्या होत्या. त्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली. त्यामध्ये आतापर्यंत पोलिसांनी सात आरोपीला अटक केली आहे. तर आज आणखी एका संशयिताला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात येत आहे. ही हत्या जेव्हा झाली तेव्हाचे सीसीटीव्ही फुटेज आता टीव्ही 9 च्या हाती लागल्या आहेत.

दोन आरोपींचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

उमेश कोल्हे हत्याकांडातील दोन आरोपींचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये चष्मा लावलेला जो इसम दिसत आहे त्याचे नाव शोएब आहे. शोएबनेच उमेश कोल्हे यांच्यावर चाकूने वार केला तर दुसरा बसलेला जो इसम दिसत आहे. ज्याच्या हातात चाकू दिसत आहे त्याचे नाव आतिफ आहे. हे दोनही आरोपी उमेश कोल्हे हत्याकांडातील असून दोघांनाही पोलिसांनी अटक केलेली आहे.

हे सुद्धा वाचा

एका आरोपीचे आणि उमेश कोल्हे यांचे घरगुती संबंध

सात आरोपीतील एक आरोपी युसुफ खान आणि उमेश कोल्हे यांचे पारिवारिक संबंध असल्याची माहिती महेश कोल्हे यांनी दिली. आरोपी युसुफ खान यांच्या घरगुती कार्यक्रमात मृतक उमेश कोल्हे अनेक वेळा झाले होते. सहभागी आरोपी युसुफ खान कोल्हे यांच्या अंत्यविधीच्या कार्यक्रमातही होता. सहभागी NIA कडे तपास वर्ग केल्याने लवकरच न्याय मिळेल अशी कुटुंबातील सदस्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे. (The autopsy report of late Umesh Kolhe from Amravati was received)

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....