पक्ष तोंडानं कसा फोडला जाऊ शकतो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे…, दीपाली सय्यद यांनी नावचं सांगितलं

ठाकरे गटाला रामराम करताना दीपाली सय्यद यांनी रश्मी ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केलेत.

पक्ष तोंडानं कसा फोडला जाऊ शकतो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे..., दीपाली सय्यद यांनी नावचं सांगितलं
दीपाली सय्यद यांनी नावचं सांगितलं Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Nov 09, 2022 | 9:41 PM

मुंबई : दीपाली सय्यद या शिंदे गटात सहभागी होणार आहेत. शिंदे गटात सहभागी होण्याच्या आधीच दीपाली सय्यद यांनी रश्मी ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली. शिवसेनेच्या फायरब्रँड महिला नेत्या अशी दीपाली सय्यद यांची ओळख. कधीकाळी भाजपच्या महिला नेत्यांना त्या थेट भिडत होत्या. शिंदे आणि ठाकरे गटात दिलजमाईसाठीही त्यांनी प्रयत्न केले होते. मात्र, याच दीपाली सय्यद आता शिंदे गटात जाणार आहेत. शनिवारपर्यंत दीपाली सय्यद यांचा शिंदे गटात प्रवेश होणार आहे.

ठाकरे गटाला रामराम करताना दीपाली सय्यद यांनी रश्मी ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. बीएमसीतले खोके येणं बंद झाल्याची खंत रश्मी वहिनींना खूप झाली आहे. नीलम गोऱ्हे किंवा सुषमा अंधारे या चिल्लर आहेत. या सर्वांच्या सुत्रधार रश्मी वहिनी आहेत, असा थेट आरोप दीपाली सय्यद यांनी केला.

शिंदे आणि ठाकरे असे दोन गट होण्यात सर्वात जास्त वाटा हा संजय राऊत यांचा असल्याचा आरोप दीपाली सय्यद यांनी केलाय. संजय राऊत यांना झालेली शिक्षा ही त्यांच्या पापाची शिक्षा आहे. पक्ष तोंडानं कसा फोडला जाऊ शकतो, याचा ते उत्तम उदाहरण आहे. शिंदे यांनी मला शिवसेनेत आणले होते. त्यामुळं त्यांच्यासोबत जाणार असल्याचं त्या म्हणाल्या.

दीपाली सय्यद यांची तीसरी-चौथी भेट असेल. दीपाली सय्यद या बाळासाहेबांच्या शिवसेनेत येत असतील तर त्यांचं स्वागत करणार असल्याचं शंभूराज देसाई यांनी म्हंटलं. शिल्लक सेनेमध्ये फारसे कुणी आमदार राहतील, असं वाटत नसल्याचंही ते म्हणाले.

...म्हणून मुंडेंचा राजीनामा घ्यायला हवा, त्या क्लिपवरून दमानिया संताप
...म्हणून मुंडेंचा राजीनामा घ्यायला हवा, त्या क्लिपवरून दमानिया संताप.
सिद्धिविनायकाला जाताय? आता असा ड्रेस कोड असेल तरच मिळणार बाप्पाच दर्शन
सिद्धिविनायकाला जाताय? आता असा ड्रेस कोड असेल तरच मिळणार बाप्पाच दर्शन.
मुख्यमंत्र्यांना भेटल्यावर मुंडे स्पष्टच म्हणाले, '...ही माझी इच्छा'
मुख्यमंत्र्यांना भेटल्यावर मुंडे स्पष्टच म्हणाले, '...ही माझी इच्छा'.
लोकसभेपूर्वी भाजप-शिंदेंकडून ऑफर, ठाकरेंच्या बड्या नेत्याचा गौप्यस्फोट
लोकसभेपूर्वी भाजप-शिंदेंकडून ऑफर, ठाकरेंच्या बड्या नेत्याचा गौप्यस्फोट.
'मी बीड जिल्ह्याचा बाप, चिंता काय...'; कराडचा आणखी एक ऑडिओ व्हायरल
'मी बीड जिल्ह्याचा बाप, चिंता काय...'; कराडचा आणखी एक ऑडिओ व्हायरल.
'लाडक्या बहिणींमुळे कोटींचा खड्डा, आता तुम्ही ठरवा मोदींच्या की...'
'लाडक्या बहिणींमुळे कोटींचा खड्डा, आता तुम्ही ठरवा मोदींच्या की...'.
'अजित पवारांनी मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर...', दमानियांचं चॅलेंज
'अजित पवारांनी मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर...', दमानियांचं चॅलेंज.
एसटी भाडेवाढीविरोधात ठाकरेंची सेना आक्रमक; आज राज्यभरात आंदोलन
एसटी भाडेवाढीविरोधात ठाकरेंची सेना आक्रमक; आज राज्यभरात आंदोलन.
सिद्दीकी प्रकरणात खुलासा, हत्येपूर्वी लिहिलेल्या डायरीत कोणाची नावं?
सिद्दीकी प्रकरणात खुलासा, हत्येपूर्वी लिहिलेल्या डायरीत कोणाची नावं?.
ऑनलाईन गेमच्या नादात स्वतःचा चिरला गळा, गुगलवर एकच शब्द सतत सर्च
ऑनलाईन गेमच्या नादात स्वतःचा चिरला गळा, गुगलवर एकच शब्द सतत सर्च.