AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तब्बल 14 महिने विहिरीत? नाशकात चालकासह कारचा सांगाडा सापडला

एका 50 फूट विहिरीत स्विफ्ट कारसह चालकाचा सांगाडा आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (Car Skeleton with the Driver was found in Nashik)

तब्बल 14 महिने विहिरीत? नाशकात चालकासह कारचा सांगाडा सापडला
Follow us
| Updated on: Jan 31, 2021 | 11:38 PM

नाशिक : नाशिकमध्ये एका 50 फूट विहिरीत स्विफ्ट कारसह चालकाचा सांगाडा आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. नाशिकमधील सिन्नर तालुक्यातील पंचाळे शिवारात ही घटना घडली. सध्या पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत. (The car skeleton along with the Driver was found in Nashik)

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमधील सिन्नर तालुक्यातील पांगरी पंचाळे रस्त्यावर सुधाकर बेदरकर यांची 50 फूट खोल विहिर आहे. या विहिरीत पाण्याचा उपसा नसल्याने त्यावर फार गाळ जमा झाला होता. तसेच याकडे फार कोणी लक्ष देत नव्हते. पण काल (शनिवारी 30 जानेवारी) बेदरकर यांना पाण्याची गरज होती. त्यामुळे ते या विहिरीकडे आले.

यानंतर त्यांनी त्यांच्या 50 फूट विहिरीत पाणी उपसले. या विहिरीतील पाण्याचा उपसा झाल्यानंतर त्यांना एक कार विहिरीत पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर त्यांनी तातडीने एमआयडीसी पोलिसांनी याबाबतची माहिती दिली. यानंतर एमआयडीसी पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने ही कार वर काढली. त्यावेळी या कारमध्ये सांगडाही आढळून आला. या सर्व घटनेची माहिती पोलिसांनी सर्वत्र कळवली. त्यानंतर पोलिसांसमोर धक्कादायक माहिती उघड आली.

गेल्या 22 नोव्हेंबर 2019 ला पुण्याच्या वाकड पोलीस स्टेशनमध्ये एका व्यक्ती कारसह बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. संजय अहिरे असे या व्यक्तीचे नाव आहे. त्यावेळी संजय अहिरे हे कारसह बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. या माहितीसोबत पोलिसांनी थोडा अंदाज घेतला असता, हा व्यक्ती संजय अहिरेच असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला होता.

मात्र गेल्या 14 महिन्यांपासून ही कार जर विहिरीत पडली होती तर तिचा सुगावा कसा कोणाला लागला नाही? हा घात आहे की अपघात? असे अनेक प्रश्न सध्या पोलिसांना पडले आहे. मात्र याची सखोल चौकशी सिन्नर एमआयडीसी पोलीस करत आहेत. (The car skeleton along with the Driver was found in Nashik)

ऑपरेश सिंदूरदरम्यान पाकला चकवा, डमी फाइटर जेट धाडून भारताचा माइंड गेम
ऑपरेश सिंदूरदरम्यान पाकला चकवा, डमी फाइटर जेट धाडून भारताचा माइंड गेम.
पाकची आणखी कोंडी, भारताची तालिबानशी हातमिळवणी, तहानलेला पाक व्याकूळच
पाकची आणखी कोंडी, भारताची तालिबानशी हातमिळवणी, तहानलेला पाक व्याकूळच.
'राऊत उलट्या पायाचे बांडगुळ, शरद पवारांच्या घरात भांडी घासण्याचं...'
'राऊत उलट्या पायाचे बांडगुळ, शरद पवारांच्या घरात भांडी घासण्याचं...'.
...म्हणून तेव्हा मोदींची अटक टळली, राऊतांचे खळबळजनक गौप्यस्फोट
...म्हणून तेव्हा मोदींची अटक टळली, राऊतांचे खळबळजनक गौप्यस्फोट.
भारताविरोधातील चीनच्या कुरापती अन् गुन्ह्यांचे 10 पुरावे समोर
भारताविरोधातील चीनच्या कुरापती अन् गुन्ह्यांचे 10 पुरावे समोर.
मुरिदकेच्या मरकजवर भारताचा हल्ला अन् पाक पत्रकाराचं रिपोर्टिंग व्हायरल
मुरिदकेच्या मरकजवर भारताचा हल्ला अन् पाक पत्रकाराचं रिपोर्टिंग व्हायरल.
भारतीय पर्यटकांनी टाकला तुर्कीवर बहिष्कार; सगळ्या सहली रद्द
भारतीय पर्यटकांनी टाकला तुर्कीवर बहिष्कार; सगळ्या सहली रद्द.
बीएसएफने पाकिस्तानचं ऑब्जर्वेशन टॉवर उद्ध्वस्त केलं
बीएसएफने पाकिस्तानचं ऑब्जर्वेशन टॉवर उद्ध्वस्त केलं.
तुलबुल प्रकल्प सुरू करण्याची ओमर अब्दुल्ला यांची मागणी
तुलबुल प्रकल्प सुरू करण्याची ओमर अब्दुल्ला यांची मागणी.
नरकातला राऊत... 'त्या' पुस्तकासंदर्भात बावनकुळे राऊतांना पत्र लिहीणार
नरकातला राऊत... 'त्या' पुस्तकासंदर्भात बावनकुळे राऊतांना पत्र लिहीणार.