Nawab Malik arrest | मुख्यमंत्र्यांनी मलिकांचा राजीनामा घ्यावा, अन्यथा..; चंद्रकांत पाटलांचा इशारा

| Updated on: Feb 23, 2022 | 5:14 PM

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आता नवाब मलिक यांना मंत्रिपदी राहण्याची गरज नाही. मलिक यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. मुख्यमंत्री तातडीने त्यांचा राजीनामा घेतील. अन्यथा आम्हाला आंदोलन करावं लागेल, असा थेट इशाराच चंद्रकांत पाटील यांनी केलाय.

अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना अंमलबजावणी संचलनालयाकडून (Enforcement Directorate) अटक करण्यात आली आहे. मलिक यांची ईडीकडून सकाळपासून चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर ईडीने मलिकांना अटक केली आहे. गुन्हेगारी दाऊद गँग संदर्भात चौकशी सुरू असताना नवाब मलिक यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या कारवाईनंतर आता सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आता नवाब मलिक यांना मंत्रिपदी राहण्याची गरज नाही. मलिक यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. मुख्यमंत्री तातडीने त्यांचा राजीनामा घेतील. अन्यथा आम्हाला आंदोलन करावं लागेल, असा थेट इशाराच चंद्रकांत पाटील यांनी केलाय. अनेक मंत्री, नेते यांच्यावर त्यांनी गंभीर आरोप आहेत.

Amol Mitkari | ‘केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर, भाजपा को करारा जवाब मिलेगा’
Railway | मनमाड-नांदेड रेल्वे विद्युतीकरणाला लवकरच प्रारंभ, सेमी हाय स्पीड रेल्वेचे संकेत, मंत्री रावसाहेब दानवे यांची माहिती