सेल्फीमुळे गेम फसला, कुणा कुणात झाली होती डील?; विजय पगारेंनी सांगितली आँखो देखी
पूजा मॅडम, सॅम डिसुझा, किरण गोसावी, मनीष भानुशाली आणि मास्टरमाइंड सुनील पाटील यांच्यात शंभर टक्के डील झाली आहे. पण शाहरुखकडून पैसे आले की नाही मला माहीत नाही. मी डोळ्याने पाहिले नाही. केवळ कानाने ऐकलं आहे. केपी गोसावीला 50 लाख मिळाले होते.
मुंबई : क्रूझ ड्रग पार्टीवर 2 ऑक्टोबर रोजी कारवाई करत आर्यन खानला अटक करण्यात आली होती. आर्यनला ताब्यात घेतल्यानंतर त्याचे काही फोटो व्हायरल झाले होते. त्यापैकी एका फोटोत आर्यन एका कथित एनसीबी अधिकाऱ्यासोबत दिसत होता. तो कथित अधिकारी के पी गोसावी होता. के पी गोसावीच्या या सेल्फी फोटोमुळेच संपूर्ण गेम फसल्याचे सुनील पाटील के पी गोसावीला बोलत होते, असा गौप्यस्फोट विजय पगारेंनी केला आहे. ही जी डील झाली ती पूजा मॅडम, सॅम डिसुझा, किरण गोसावी, मनीष भानुशाली आणि मास्टरमाइंड सुनील पाटील यांच्यात झाली आहे, असेही पगारेंनी सांगितले.
पूजा मॅडम, सॅम डिसुझा, किरण गोसावी, मनीष भानुशाली आणि मास्टरमाइंड सुनील पाटील यांच्यात शंभर टक्के डील झाली आहे. पण शाहरुखकडून पैसे आले की नाही मला माहीत नाही. मी डोळ्याने पाहिले नाही. केवळ कानाने ऐकलं आहे. केपी गोसावीला 50 लाख मिळाले होते. डील शंभर टक्के झाली होती. पैसे हवाला झाले होते. हवाला झालेले पैसे परत गेले असंही सुनील म्हणाला होता. पण 50 लाख अॅडव्हान्स मिळाले होते. साडे सतरा कोटी हवाला झाले होते. पण ते परत गेले. हे वाक्य सुनील पाटील मला बोलला. सॅम डिसुझाचा पैशासाठी सुनील पाटीलला फोन येत होता. मेहूलही त्यांच्याशी बोलत होता. त्यांचं संभाषण व्हाईस कॉलवरूनच सुरू होतं. ते साध्या कॉलवरून कधी बोलले नाही, असे पगारेंनी स्पष्ट केले.
एनसीबी ऑफिसमध्ये आल्यानंतर भानुशालीच्या बोलण्याची लिंक लागली
3 तारखेला भानुशाली माझ्या रुमवर आला होता. त्याने मला पैसे मिळणार म्हणून सांगितलं. त्यामुळे तयार होऊ मी त्याच्यासोबत वाशीवरून मुंबईकडे जायला निघालो. त्यावेळी तो फोनवर कधी मराठी, हिंदी आणि गुजरातीत बोलत होता. 25 कोटी, 18 कोटी बाबत बोलत होता. किती कोटी मिळाले, किती नाही याची माहिती तो विचारत होता. कधी भाऊ म्हणत होता. त्यानंतर आम्ही एनसीबीच्या कार्यालयाजवळ पोहोचलो. तिथे मीडिया आणि पोलिसांची मोठी गर्दी होती. त्यामुळे मी उत्सुकतेने खाली उतरून विचारणा केली. तेव्हा शाहरुख खानच्या मुलाला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्याचं समजलं. त्यामुळे मला भानुशाली काय बोलत होता याची लिंक लागली. मी त्यावर खूपच विचार केला. त्या ठिकाणी अर्धा पाऊणतास थांबलो. भानुशाली गाडीत बसून नंतर बोलत होता. तेवढ्यात माझा ड्रायव्हर आला. त्याने भानुशालीला सुनील भाऊचा फोन आल्याचं सांगितलं. मी फोन घेतला, तेव्हा तू तिथं कशाला गेला. तुझ्या रुमवर जाऊन बस असं मला सुनील भाऊ म्हणाले. मला भानुशालीने आणल्याचं सांगितलं. पैसे मिळणार असल्याचं भानुशालीने मला सांगितलं म्हणून मी सांगितलं. ते मला संतापून बोलत होते. मीही त्यांना संतापून बोलत होतो, अशी माहिती पगारे यांनी दिली.
परदेशी नोकरीचे आमिष दाखवून गोसावीकडून अनेक तरुणांची फसवणूक
आर्यन खानला एनसीबीने ताब्यात घेतलं तेव्हा गोसावी हा पंच होता. त्यानंतर आर्यनसोबत फोटो व्हायरल झाल्यानंतर गोसावी एनसीबी अधिकारी असल्याचा संशय होता. मात्र नंतर परदेशात नोकरी लावून देतो असे सांगत गोसावीने अनेक तरुणांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे उघड झाले. मलेशियात नोकरीचे आमिष दाखवत पुणे, पालघरमधील तरुणांकडून लाखो रुपये उकळले. याप्रकरणी गोसावी विरोधात पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात आणि पालघरमधील केळवे सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. (The game failed because of the selfie, who had the deal; Vijay Pagare said everything)
आर्यन खान डील प्रकरणाशी समीर वानखेडेंचा संबंध आहे का?; विजय पगारे यांनी केला मोठा खुलासा