‘सायकलिंग संडे’चा कौतुकास्पद उपक्रम, शेकडो पाणवठ्यांची व्यवस्था, पक्ष्यांना…
शहरातील विविध भागात शेकडो पाणवठे लावण्यात आले आहेत. चिमुकल्या पक्ष्यांसाठी चांगला उपक्रम 'सायकलिंग संडे'ने हाती घेतला आहे. उन्हाळात तहानलेल्या पक्ष्यांना त्याचा फायदा होणार आहे.
शाहिद पठाण : गोंदियातील (gondia cycling sunday) ‘सायकलिंग संडे’ ग्रुपच्यावतीने अभिनव उपक्रम सुरु करण्यात आला आहे. पाण्याअभावी पक्ष्यांचा मृत्यू होऊ नये, या उद्देशाने ‘सायकलिंग संडे’ने शहरातील विविध ठिकाणी पक्ष्यांसाठी विविध ठिकाणी शेकडो पाणवठे लावण्यात आले आहेत. या पाणवठ्यांमुळे पक्षांना आधार मिळणार आहे. या उपक्रमाचं सध्या सर्वच कौतुक करण्यात येत आहे. गोदिंया (gondia) जिल्ह्यात अधिक तापमान असल्यामुळे त्याचा परिणाम पक्षी आणि प्राणी (Animal news) यांच्या दिसून येत आहे. पक्ष्यांना विविध ठिकाणी पाणी उपलब्ध व्हावं या हेतूने या उपक्रम सुरु करण्यात आला आहे.
गोंदिया जिल्ह्यातील तापमान हे 45 अंश सेल्सिअसच्या वर जाते. त्याचप्रमाणे उन्हाळ्यात नदीनाले व लहान तळ्यातील पाणी खालावत जातात. अशावेळेस नागरिकांनी पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असते. मे महिन्याच्या सुरवातीलाच जिल्ह्यात पाण्याचा ठणठणाट होऊ लागला आहे. पक्ष्यांसाठी गोंदियातील ‘सायकल संडे’ ग्रुपच्या वतीने अभिनव उपक्रम सुरु करण्यात आला आहे. शहराच्या विविध ठिकाणी पक्ष्यांसाठी 300 च्यावर मातीचे पाणवठे तयार करून लावण्यात आले आहेत. या पाणवठ्यामुळे पक्ष्यांना मोठा आधार मिळत आहे. शिवाय या उपक्रमाची सध्या सर्वत्र कौतुक केला जात आहे. दीपाली वाढई, विजय येडे, पुष्पा पटले या त्या उपक्रमात सहभागी होऊन काम करीत आहेत.
नियोजन अभावी जिल्ह्यातील जलाशय सपाट होऊ लागले आहेत. त्यामुळे जलाशयाचा नैसर्गिक जलसाठा भर उन्हाळ्यात कमी झाला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी माणसांबरोबर पक्ष्यांना भटकंती करावी लागत आहे. उन्हाळा सुरु होताच सामाजिक संस्थांकडून विविध ठिकाणी पाणपोई सुरु करण्यात आल्या. मात्र यामुळे माणसांना पाण्याची सोय होत असते. मात्र पक्ष्यांना पाण्यासाठी मात्र मोठी कसरत करावी लागत असते. पाण्याअभावी पक्ष्याचे मृत्यू होऊ नये यासाठी सायकल संडे ग्रुपने पाणवठे लावण्याचा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाला चांगलाचं प्रतिसाद मिळत असल्याचे पहायला मिळत आहे.