हवामान खात्याचे संकेत ठरले खरे राज्याच्या बहुतांश भागात पावसाचे आगमन, भंडारा, नवी मुंबईसह वर्ध्यातही पावसामुळे गारवा
अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. पण बच्चेकंपनीने पावसात भिजण्याचा आनंद घेतला. सतत उकड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात उकाडा वाढला असून सर्वसामान्य हैराण झाले होते. तर उष्णतेचा पारा सोलापूरात 45 डिग्रीच्या बाहेर गेला होता. दरम्यान राज्यात दोन दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस (Rain with strong winds) येईल असे संकेत हवामान खात्याने (Meteorological Department)वर्तवले होते. तर गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील पश्चिम महाराष्ट्रासह अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले आहे. तर भंडारा जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावल्याने हवामान खात्याचा अंदाज खरा ठरल्याचे पाहायला मिळत आहेत. तर वर्ध्यातही पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. तसेच नवी मुंबईतही पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने उन्हाच्या लखलखत्या तळक्या पासून नागरिकांना मोकळा श्वास मिळला आहे. यंदा लवकर पाऊसाचे आगमन झाल्याने शेतकरी वर्गात सुध्दा आनंदचे वातावरण पसरले असून मान्सून पुर्व शेती कामाला (Pre-Monsoon Agriculture) आता वेग येणार आहे.
राज्यात दोन दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्याप्रमाणे भंडारा जिल्ह्यातील बहुतांश भागात पाऊसाने आगमन केले. त्यामुळे उन्हाच्या लखलखत्या तळक्या पासून नागरिकांना मोकळा श्वास मिळला आहे. तसेच यंदा लवकर पाऊसाचे आगमन झाल्याने शेतकरी वर्ग सुध्दा आनंदचे वातावरण पसरले असुन मान्सून पुर्व शेती कामाला आता वेग येणार आहे.
वर्धेत पावसाच्या सरी
वर्धा शहरात दुपादरम्यान विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. तब्बल वीस मिनीट झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. दरम्यान सकाळपासून शहरात उन्हाचे चटके नागरिकांना लागत होते. तर दुपारदरम्यान अचानक पावसाच्या सरी बरसल्या. या अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. पण बच्चेकंपनीने पावसात भिजण्याचा आनंद घेतला. सतत उकड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.
नवी मुंबईतही पाऊस
नवी मुंबईच्या अनेक ठिकाणी दोनदीवसापूर्वी पहाटे पाऊस पडला होता. आज पुन्हा नवी मुंबईतील काही भागात पाऊस पहाटेपासून पडला. तर अजून देखील ढगाळ वातावरण आहे. नवी मुंबईत दुसऱ्या दिवशीही पाऊस पडल्याने उकाड्यापासून नवी मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.
राजस्थानमध्ये वेगळ्या ठिकाणी धुळीचे वादळ
तर आज पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, उत्तर मध्य प्रदेशात पावसाचा वेग कमी होईल आणि उद्यापासून 25 मे 2022 रोजी घट होईल असेही हवामान खात्याने सांगितलं आहे. तसेच पश्चिम राजस्थानमध्ये वेगळ्या ठिकाणी धुळीचे वादळ होण्याची शक्यताही वर्तवण्यात आले आहे.
isolated rainfall activity over Punjab, Haryana, Uttar Pradesh, Rajasthan, north Madhya Pradesh today and reduction from tomorrow, the 25th May, 2022. Duststorm activity at isolated places very likely over West Rajasthan today. pic.twitter.com/iDLfRNhQL5
— India Meteorological Department (@Indiametdept) May 24, 2022