AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : शिंदे गटातील आमदारही अ‍ॅक्शन मोडमध्ये, मतदारांसाठी आ. जैस्वाल यांनी गुडघाभर पाण्यातून काढली वाट

गेल्या 8 दिवसांपासून नागपूर जिल्ह्यातील पारशिवणी तालुक्यात पावसाने हजेरी लावलेली आहे. त्यामुळे गाव लगतच्या नद्यांना पाणी आले आहे. तालुक्यातील बिटोली, पेठ, परसोडी, बनेरा, नरहर, ढवलापूर गावात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या घराचे आणि शेती पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना मदतीचा हात देण्यासाठी लोकप्रतिनीधी हे प्रयत्न करीत आहेत.

Video : शिंदे गटातील आमदारही अ‍ॅक्शन मोडमध्ये, मतदारांसाठी आ. जैस्वाल यांनी गुडघाभर पाण्यातून काढली वाट
रामटेकचे आ. आशिष जैसवाल यांनी पुराच्या पाण्यातून वाट काढत मतदारांची भेट घेतली.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 16, 2022 | 10:07 AM

नागपूर : राजकीय नाट्य आणि सत्तांतरानंतर आता (MLA) आमदारांनी आपआपले मतदारसंघ जवळ केले आहेत. (CM Ekanth Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शपथविधी पार पडताच ते कामाला लागले आहेत तर स्थानिक पातळीवर त्यांच्या गटातील आमदरही आता अॅक्शनमोडमध्ये आहेत. सध्या राज्यात पावसाने हाहाकार घातला आहे. त्यामुळे मतदारांच्या अडचणी, नुकसानीची पाहणी यासाठी आमदार थेट जनतेच्या दारात जात आहे. (Ramtek) रामटेकचे अपक्ष आ. आशिष जैस्वाल यांनी तर गुडघाभर पुराच्या पाण्यातून वाट काढत पूरग्रस्तांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. आता मुख्यमंत्रीच अॅक्शनमोडमध्ये असल्यानंतर आमदारही कामाला लागल्याचे चित्र आहे. पोलिसांच्या मदतीने त्यांनी हा पूर ओलांडला आहे.

पारशिवणी तालुक्यातील नुकसानीचा आढावा

गेल्या 8 दिवसांपासून नागपूर जिल्ह्यातील पारशिवणी तालुक्यात पावसाने हजेरी लावलेली आहे. त्यामुळे गाव लगतच्या नद्यांना पाणी आले आहे. तालुक्यातील बिटोली, पेठ, परसोडी, बनेरा, नरहर, ढवलापूर गावात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या घराचे आणि शेती पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना मदतीचा हात देण्यासाठी लोकप्रतिनीधी हे प्रयत्न करीत आहेत. अधिकच्या पावसाचा सर्वाधिक फटका खरीप हंगामातील पिकांना बसलेला आहे.

पोलिस कर्मचाऱ्यांच्या मदतीने पूरातून वाट

रामटेकचे आ. आशिष जैस्वाल हे मतदार संघात पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करीत होते. दरम्यान बिटोली, पेठ, परसोडी, बनेरा गावाकडे जाणाऱ्या नदीवरील पूलावरुन पाणी वाहत होते. मात्र, नदीच्या पलिकडे ग्रामस्थ हे आमदारांची वाट पाहत असताना आपण परत फिरायचे कसे म्हणून आ. जैस्वाल यांनी पोलिस कर्मचाऱ्याच्या मदतीन पुलावर पाणी असताना वाट काढली. एवढेच नाहीतर गावकऱ्यांची विचारपूस करुन नुकसानीचा आढावा घेतला. आमदारांच्या या भूमिकेमुळे ग्रामस्थांनाही दिलासा मिळाला आहे.

हे सुद्धा वाचा

पंचनामे करुन मिळणार मदत

सततच्या पावसामुळे खेडेगावातील घरांची पडझड झाली आहे तर दुसरीकडे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. विदर्भात अधिक प्रमाणात भात शेतीची लागवड केली जाते. पावसामुळे या पिकालाच अधिकचा फटका बसला आहे. त्यामुळे पंचनामे करुन त्वरीत भरपाईसाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे आ. जैसवाल यांनी सांगितले आहे.

नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही.
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध.
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?.
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त.
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना....
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना.....
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News...
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News....
युद्धाची भिती अन् पाकचा शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांमध्ये धास्ती
युद्धाची भिती अन् पाकचा शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांमध्ये धास्ती.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचं पुनर्गठन
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचं पुनर्गठन.
..त्याशिवाय पर्याय नाही, जरांगे पाटलांकडून इशारा देत चलो मुंबईचा नारा
..त्याशिवाय पर्याय नाही, जरांगे पाटलांकडून इशारा देत चलो मुंबईचा नारा.
'त्या' झिपलाइन ऑपरेटरची NIA कडून चौकशी झाल्यानंतर वडिलांकडून मोठा दावा
'त्या' झिपलाइन ऑपरेटरची NIA कडून चौकशी झाल्यानंतर वडिलांकडून मोठा दावा.