Corona Patients increasing | पुणेकरांनो काळजी घ्या ; दिवाळीनंतर वाढतेय कोरोना रुग्णांची संख्या
पुरातत्व संचालनालयाच्या अंतर्गत असलेली पुणे विभागांतर्गत पुणे राज्य संरक्षित स्मारके व पुरातत्त्वीय स्थळे प्रेक्षक व पर्यटकांसाठी नुकतीच खुली करण्यात आली आहेत. या स्मारकांच्या ठिकाणी भेटी देत असताना कोरोनाबाबतची नियमावलीही नागरिकांना घालून देण्यात आली आहे.
पुणे – दिवाळीच्या दरम्यानचा शहरातील कोरोना रुग्णांची संख्या शून्यावर आली होती. मात्र दिवाळीनंतर या रुग्णसंख्येत वाढ असल्याची दिसून आली आहे. शुक्रवारपर्यंत शहरात 87 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. सद्यस्थितीला शहरातील विविध रुग्णालयात उपचार घेतल असलेल्या रुग्णांची संख्या 760 इतकी आहे. या वाढत्या रुग्णसंख्येबाबत कोरोना चिंता व्यक्त केली जातेय. त्याचाबरोबर पुणेकरांना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे .
आकडेवारी काय सांगते महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज (शुक्रवार) दिवसभरात 5 हजार 371 जणांची तपासणी करण्यात आली. आज शहरातील एका तर शहराबाहेरील एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. शहरातील एकूण मृत्यूची संख्या 9 हजार 80 इतकी झाली आहे. विविध रूग्णालयांमध्ये सध्या कोरोनाचे 113 गंभीर रूग्ण असून, 71 जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत. शहरात आतापर्यंत 36 लाख 7 जार 32 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. यातले5 लाख 5 हजार 163जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यापैकी 4 लाख 95 हजार 323 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
खेडमधील कोविड सेंटर बंद
याबरोबरच खेड तालुक्यातील कोरोनाची रुग्णसंख्या शून्यावर आली आहे. त्यामुळे चाकण येथील महाळुंगे येथे सुरु करण्यात आलेले म्हाडाच्या इमारतीतील कोविड सेंटर बंद करण्यात आले आहे. खेड तालुक्यातील सर्वात मोठे 800 खाटांचे महाळुंगे येथील म्हाडा कोविड सेंटर 10मे 2020पासुन सुरु करण्यात आले होते ते आता बंद करण्यात आल्याची माहिती खेडचे प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांनी दिली.
दुसरीकडं पुरातत्व संचालनालयाच्या अंतर्गत असलेली पुणे विभागांतर्गत पुणे राज्य संरक्षित स्मारके व पुरातत्त्वीय स्थळे प्रेक्षक व पर्यटकांसाठी नुकतीच खुली करण्यात आली आहेत. या स्मारकांच्या ठिकाणी भेटी देत असताना कोरोनाबाबतची नियमावलीही नागरिकांना घालून देण्यात आली आहे. नॉन कन्टेनमेन्ट क्षेत्रातीलच राज्य संरक्षित स्मारके पर्यटकांकरिता खुली राहतील. तसेच कोरोनाबाबत केंद्र सरकार व राज्यसरकारने घालून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी करावी.
या नियमांचे करावे लागेल पालन
- स्मारकांच्या परिसरात गर्दी टाळावी.
- मास्क व सोशल डिस्टन्सचे पालन करणे बंधनकारक.
- स्मारक परिसरात थुंकणे व धूम्रपान करण्यास सक्त मनाई
- आजारी व्यक्तींना स्मारक व परिसरात प्रवेश दिला जाणार नाही
- अधिकृत परवानाधारक मार्गदर्शक व छायाचित्रकार यांना पर्यटकांकरिता टुरिस्ट गाईड म्हणून काम करता येईल
हेही वाचा:
बालविवाह झाल्यास सरपंच, ग्रामसेवक, तलाठयांचे पद रद्द करा ; राज्य महिला आयोगाचे मुख्यमंत्र्यांना पत्र
पुण्यात पावसाची शक्यता ; हवामान खात्याने दिला ‘यलो अर्लट’
Pune Crime | किरण गोसावीच्या अडचणीत वाढ; दुबईवरून आलेल्या महिला साथीदाराला अटक