Transportation | नागपुरात साकारलीय एकाच ठिकाण चारस्तरीय वाहतूक व्यवस्था!; नेमका काय आहे प्रकार?

गड्डीगोदाम क्रॉसिंग येथील संरचनेत 4 स्तरीय परिवहन व्यवस्था आहे. पहिल्या स्तरावर जमिनी मार्ग रहदारीकरिता असलेला रस्ता, दुसर्‍या स्तरावर रेल्वे ट्रॅक, तिसर्‍या आणि चौथ्या स्तरावर उड्डाणपूल आणि मेट्रोमार्गिका आहे.

Transportation | नागपुरात साकारलीय एकाच ठिकाण चारस्तरीय वाहतूक व्यवस्था!; नेमका काय आहे प्रकार?
गड्डीगोदाम येथील चारस्तरीय वाहतूक व्यवस्था
Follow us
| Updated on: Jan 09, 2022 | 6:21 AM

नागपूर : महामेट्रोच्यावतीने कामठी मार्गावर गड्डीगोदाम, गुरुद्वारा या ठिकाणी चार मजली पूल तयार करण्यात येत आहे. त्यासाठी विशालकाय लोखंडी स्ट्रक्चर तयार करण्यात आला आहे. लवकरच गुरुद्वारा या ठिकाणी सदर लोखंडी स्ट्रकचर बसविण्याचे कार्य सुरू आहे. मुख्य म्हणचे सदर लोखंडी स्ट्रक्चर बुटीबोरी एमआयडीसी या ठिकाणी तयार करण्यात आले. सडक मार्गाने बुटीबोरी येथून गड्डीगोदाम या ठिकाणी ट्रेलरच्या साहाय्याने आणल्या गेले आहे.

देशात पहिल्यांदाच वेगळ्या पद्धतीची संरचना

महामेट्रोने निर्माण कार्याच्या सुरुवातीपासूनच अनोखे निर्माण कार्य करीत शहराच्या विकासात भर घातला आहे. गड्डीगोदाम येथे तयार करण्यात येणारे स्ट्रर हे सदर स्ट्रक्चर प्रथमत: बुटीबोरी येथे उभारण्यात आले. या ठिकाणचे कार्य पूर्ण झाल्यानंतर या स्ट्रक्चरला डिसमेंटल करून रस्त्याने गड्डीगोदाम येथे आणल्या गेले. लोखंडी स्ट्रकचर बुटीबोरी येथे उभारताना 250 टन क्षमतेच्या 2 क्रेनचा उपयोग करण्यात आला. गड्डीगोदाम येथे उभारणी करताना 500 टन क्षमतेच्या 2, 300 टनची 1 क्रेन तसेच इतर मशिनरीज या ठिकाणी कार्यरत आहे. या ठिकाणी देशात पहिल्यांदाच वेगळ्या पद्धतीची संरचना असलेल्या चार स्तरीय बांधकाम केले जात आहे. सदर निर्माण कार्य अतिशय कठीण आणि मुख्य म्हणजे सतत व्यस्त अशा रेल्वे लाईन गड्डीगोदाम येथील आरयुबी येथे करण्यात येत आहे.

गर्डर लाँचिंग केले जातेय

महामेट्रोच्या रिच-2 स्थित गड्डीगोदाम मेट्रो स्टेशनजवळ निमार्णाधीन चारस्तरीय पुलाचे निरीक्षण प्रसारमाध्यमांनी केले. रिच-2 चे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (सीपीएम) प्रकाश मुदलियार यांनी यावेळी सांगितले की, या पुलाचे निर्माण कार्य खूप कठीण आहे. 700 टन वजनच्या गर्डरला लाँच करणे आहे. पुलाच्या गर्डरचे एकूण वजन 1640 टन आहे. गर्डर लाँचिं गनंतर क्रांक्रिटचे कार्य केले जाईल. त्यानंतर रेल्वे रूळ व ओएचईचे कार्य केले जाईल. गर्डर लाँचिंगकरिता मुंबई येथून 500 टन, 400 टन आणि 300 टन भार क्षमतेच्या तीन क्रेन बोलविण्यात आल्या आहेत. त्यांच्या साहाय्याने गर्डर लाँचिंग केल्या जात आहे.

लोखंडी स्ट्रक्चरची वैशिष्ट्ये

स्ट्रकचरची जमिनीपासून उंची 24 मीटर, लांबी 80 मीटर व रुंदी 18 मीटर आहे. एकूण वजन 1 हजार 634 टन आहे. 154 कर्मचार्‍यांनी पुलाचे प्रत्येक सुटे भाग तयार केले. स्ट्रक्चर उभारणी करताना सुमारे 78 हजार एएसएफजी (हाईट स्ट्रेंथ फ्रिक्शन ग्रीप) बोल्टचा उपयोग करण्यात आला.

Nagpur Surya | नागपुरातील सूर्याचा अस्त; आता बाँब शोधणार कोण? पोलीस दलाला चिंता

Nagpur | कोरोनाच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर कसा देणार?, मनपाच्या आरोग्य विभागाने सांगितला प्लान

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.