MLC Election| आपण करू ते तत्वज्ञान अन् दुसरे करतील तो घोडेबाजार; चंद्रकांत पाटील यांची काँग्रेसवर सडकून टीका

चंद्रात पाटील म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दोन जागांच्या निवडणुका झाल्या. मात्र, काँग्रेसने शब्द देऊनही तो पाळला नाही. त्यामुळे निवडणूक झाली.

MLC Election| आपण करू ते तत्वज्ञान अन् दुसरे करतील तो घोडेबाजार; चंद्रकांत पाटील यांची काँग्रेसवर सडकून टीका
चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष
Follow us
| Updated on: Dec 14, 2021 | 11:54 AM

पुणेः विधानपरिषदेच्या नागपूर आणि अकोला वाशिम बुलडाणा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातील निवडणुकीत (Maharashtra Vidhan Parishad Election Result) भाजपने जोरदार विजय मिळवला. अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया यांना भाजपचे वसंत खंडेलवाल यांनी धूळ चारली. तर नागपूरमध्ये छोटू भोयर यांच्या जागेवर काँग्रेसने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना चित करून भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) विजयी झाले. या विजयाचा आनंद भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रांत पाटील (Chandrakant Patil) यांना पेढा भरवून साजरा करण्यात आला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये पाटील यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. आपण करू ते तत्वज्ञान आणि दुसरे करतील तो घोडेबाजार, अशी काँग्रेसची दुटप्पी भूमिका आहे. विदाऊट मोदी या देशाचा विकास होणार नाही, हे लोकांना समजले आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक गुप्त पद्धतीने घ्या, मग तुम्हाला समजेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

काँग्रेसने शब्द पाळला नाही

चंद्रकांत पाटील म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दोन जागांच्या निवडणुका झाल्या. मात्र, काँग्रेसने शब्द देऊनही तो पाळला नाही. त्यामुळे निवडणूक झाली. चंद्रशेखर बावनकुळे खूप मोठ्या फरकाने विजयी झाले. दोन्ही विजेत्यांचे अभिनंदन करतो. शिर्डीच्या साईबाबाचे वाक्य आहे. श्रद्धा आणि सबुरी. याचा आम्हाला फायदा झाला. काँग्रेसने या निवडणुकीत पोरखेळ केला, अशी टीका त्यांनी यावेळी केली.

पटोले आणि केदार संघर्ष

चंद्रकांत पाटील म्हणाले, पटोले आणि केदार यांचा संघर्ष या निवडणुकीत दिसला. विधानसभा अध्यक्ष पदाची गुप्त मतदान पध्दतीने निवडणुकी घ्या, मग तुम्हाला समजेल. विदाऊट मोदी या देशाचा विकास होणार नाही, हे लोकांना समजले आहे. माझे तिकीट कापले म्हणून मी नाराज, असे आमच्या पक्षाने आम्हाला शिकवले नाही, सब्र का फल मिठा होता है, हे सांगायलाही ते विसरले नाहीत. आपण करू ते तत्वज्ञान अन् दुसरे करतील तो घोडेबाजार, अशी काँग्रेसची भूमिका असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दोन जागांच्या निवडणुका झाल्या. मात्र, काँग्रेसने शब्द देऊनही तो पाळला नाही. त्यामुळे निवडणूक झाली.

-चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष

इतर बातम्याः

MLC Election| हा तर नाना पटोलेंचा पराभव, विधान परिषदेच्या विजयानंतर बावनकुळेंचा टोला, काँग्रेसनं घोडेबाजार केल्याचाही आरोप

चर्चा तर होणारचः कट्टर राणे समर्थक अन् माजी झेडपी सदस्या आनंदी परब सहकुटुंब शिवसेनेत; जिल्हा बँकेची उमेदवारीही घोषित

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.