Solapur : निषेध करणारे सेनेचे नव्हे तर राष्ट्रवादीचे..! सेना उरलीच कुठे? चर्चेतले सावंत पुन्हा वादात

पुणे येथील तानाजी सावंत यांचे कार्यलय मध्यंतरी फोडण्यात आले होते. त्या दरम्यान देखील हे काम शिवसैनिकांचे नाहीतर यामध्ये राष्ट्रवादीचे पदाधिकारी होते असेच सावंत यांनी ठणकावून सांगितले. तर सोमवारी ते सोलापूर जिल्हा दौऱ्यावर असताना, माळशिरस तालुक्यात त्यांनी मार्गस्थ झालेल्या रोडवर गोमुत्र शिंपडण्यात आले . तर सोलापुरात देखील निषेध करण्यात आला.

Solapur : निषेध करणारे सेनेचे नव्हे तर राष्ट्रवादीचे..! सेना उरलीच कुठे? चर्चेतले सावंत पुन्हा वादात
आरोग्यमंत्री तानाजी सावंतImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 06, 2022 | 3:22 PM

सोलापूर : आरोग्यमंत्री वर्णी लागल्यानंतर प्रथमच (Tanaji Sawant) तानाजी सावंत हे (Solapur) सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात दाखल झाले आहेत. (Health Department) आरोग्य विभागाच्या दौऱ्यापेक्षा वेगळ्याच कारणांनी हा दौरा चर्चेत राहिलेला आहे. सोमवारी सावंत हे मंगळवेढा तालुक्यातील आरोग्य सेवेचा आढावा घेत असतानाच युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ते मार्गस्थ झालेल्या रोडवर गोमुत्र शिंपडले होते. तर सोलापूरात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले होते. पण याला देखील युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दुग्धाभिषेक घातला. यावर तानाजी सावंत यांनी ते पदाधिकारी हे राष्ट्रवादीचे होते. ठाकरे सेना आता शिल्लक राहिली नाही तर ते सर्व शिंदे गटात आल्याचे म्हटले आहे. यापूर्वी त्यांनी पुण्यात कोण आदित्य ठाकरे असा उल्लेख केला होता. आता त्यांनी थेट सेना ही संपल्याचेच सांगून टाकले.

हे सर्व षडयंत्र राष्ट्रवादीचेच..!

पुणे येथील तानाजी सावंत यांचे कार्यलय मध्यंतरी फोडण्यात आले होते. त्या दरम्यान देखील हे काम शिवसैनिकांचे नाहीतर यामध्ये राष्ट्रवादीचे पदाधिकारी होते असेच सावंत यांनी ठणकावून सांगितले. तर सोमवारी ते सोलापूर जिल्हा दौऱ्यावर असताना, माळशिरस तालुक्यात त्यांनी मार्गस्थ झालेल्या रोडवर गोमुत्र शिंपडण्यात आले . तर सोलापुरात देखील निषेध करण्यात आला. हे सर्व राष्ट्रवादीकडून घडवून आणले जात आहे. सुरवातीपासून राष्ट्रवादी आणि तानाजी सावंत यांच्यामध्ये कायम मतभेद राहिलेले आहेत. त्यामुळेच असे कृत्य केले जात असल्याचे सावंत म्हणाले.

ते सर्व आता शिंदे गटात..!

सोलापुरात दौरा करीत असताना तुम्हाला युवा सेनेकडून विरोध होत आहे, असा प्रश्न माध्यम प्रतिनिधींनी त्यांना विचारला होता. तर ठाकरे सेना आता शिल्लक राहिलेले नाही. ते सर्व पदाधिकारी शिंदे गटात दाखल झाले आहेत. त्यामुळे ते निषेध करु शकत नाही असेही सावंतांनी सांगितले.त्यामुळे त्यांच्या या वादग्रस्त विधानानंतर आता युवासेना काय उत्तर देणार हे पहावे लागणार आहे.

सोलापूरनंतर सावंत आता उस्मानाबाद जिल्ह्यात

आरोग्यमंत्री पदी निवड झाल्यानंतर तानाजी सावंत हे प्रथमच सोलापूर जिल्ह्यात दाखल झाले होते. त्यांनी माळशिरस, पंढरपूर आणि सोलापूर तालुक्यातील आरोग्य विभागाचा आढावा तानाजी सावंत यांनी घेतला. तर जिथे मनुष्यबळ कमी तिथे लागलीच पदभरती कऱण्याचे आदेश सावंत यांनी दिले आहेत. सोलापूरनंतर ते उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा, भूम आणि वाशी या आपल्या मतदारसंघात दाखल झाले आहे. येथील आरोग्य विभागाचा ते आढावा घेणार आहेत.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.